Agripedia

पिकाची प्रतिकार क्षमता वाढवली तर रोग कमी पडतात,

Updated on 28 July, 2022 7:23 PM IST

पिकाची प्रतिकार क्षमता वाढवली तर रोग कमी पडतात, त्यासाठी शेतकऱ्यांनी अतिशय नियोजन पूर्वक शेती केली पाहिजे .पीक मग ते कोणतेही असो तो सुद्धा एक जीव आहे, ज्याप्रमाणे माणसाला चांगले जीवन जगण्यासाठी सर्व प्रकारच्या प्रथिने आणि वेगवेगळ्या जीवन सत्वांची आवश्यकता असते ,त्याप्रमाणेच पिकानाही ,वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते.चांगले उत्पन्न घेण्यासाठी सर्व प्रकारच्या खतांची संतुलित मात्रा वेळेवर देणे आवश्यक असते .आपण 4/5 महिने कालावधीची पिके घेत असतो, कमी कालावधीची पिके घेत असल्यामुळे खते वेळेवर देणे अत्यन्त महत्वाचे आहे.आणि खते दिल्यावर त्यांचा पाण्याशी संपर्क झाल्यावर लागण्याचा कालावधी विचारात घेऊन योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खते

दिली पाहिजे.या संदर्भाची चर्चा खतांचे नियोजन हि पोस्ट मी काल टाकली होती त्यात केलेले आहेच. आपल्या भागातील मुख्य पीक हे कापूस आहे जवळजवळ 60/70% म्हणून आपण कापूस या पिकाचाच विचार करू.कापसाची प्रतिकार क्षमता वाढवली तर निश्चितच रोग कमी पडतात. त्यासाठी खतांचा बेसल डोस द्यावा ,एका एकरला 2.5 बॅग 10/26/26 , एक एकर कापसाला 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाशची आवश्यकता असते,आणि 60 किलो नत्राची .नत्र हे युरिया, अमोनिअम सल्फेट, आणि कॅलसियम नायट्रेट या स्वरूपात द्यावे, फक्त युरिया देऊ नये.युरिया हा निमकोटेडच वापरावा कापूस या पिकाला बेसल डोस दिल्यानंतर सेंद्रिय खतांचा दुसरा डोस पीक 25 दिवसाचे झाल्यावर द्यावे. सेंद्रिय खते दिल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते,आणि सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळेच झाडाची जमिनीतून अन्न ग्रहण करण्याची क्षमता वाढते.

तसेच वेस्ट डीकंपोझर, इ एम , ऍझो रायझो, पीएसबी या जैविक खतांचा योग्य पद्धतीने वापर केल्यामुळे पीक प्रतिकार क्षम होते.रोग कमी पडतात.साधारणतः 40/45 दिवसांनी खतांचा 3 रा डोस द्यावा ,त्यात अर्धी बॅग 10/26/26 अमोनिअम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, कॅलसियम नायट्रेट,फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, आणि बोरानं,निबोली पेंड, करंज पेंड प्रमाणानुसार द्यावे,आणि शेवटी युरिया 60/70 दिवसांनी 1 बॅग द्यावा व 3 किलो सल्फर द्यावे.Finally, after 60/70 days, 1 bag of urea and 3 kg of sulfur should be given.(यासाठी खत नियोजन हि काल टाकलेली पोस्ट वाचावी)मित्रानो आपण म्हणतो वेळेलाच केळे लागते, खतांची योग्य वेळ साधली तर पिकाची प्रतिकार क्षमता वाढून ,रोगांचे प्रमाण आपण कमी करू शकतो, पण बऱ्याच वेळा आपण खते वेळेवर देत नाहीत , खते दिल्यावर ती मातीने झाकून टाकली पाहिजे, आपण खते देत नाही ती फेकतो,खते

उघड्यावर पडल्यामुळे युरिया सारख्या घटकाचे बाष्पीभवन होऊन हवेत उडून जातो,अतिपाण्यामुळे स्फुरद ,पालाश जमिनीत खोल झिरपून जाते ,या सर्व गोष्टींचा विपरीत परिणाम झाल्यामुळे पीक कुपोषित होते ,आणि अशा कुपोषित पिकावर रोगांचे प्रमाणही वाढते.कापूस लागवड केल्यापासून 40 दिवसाच्या आत आपण 2/3 वेळा कीटकनाशकांची फवारणी करतो ,40 दिवसाच्या आतच 1/2 वेळा थोडा थोडा युरियाचा डोस देतो ते चुकीचे आहे त्यामुळे आपण आपल्या पिकावर रोग पडण्यासाठी किडींना मदत करून देतो, मित्र कीटक मारून टाकतो, मित्र किटक साधारणतः 50 ते 55 दिवस पिकावर राहिलयास त्यांची झाडावरील उपस्थिती रसशोशक किळ नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते,आणि कीटकनाशक फवरणीतील अंतर 5/7 दिवसांनी वाढते, ( 12/14 दिवस), मित्र किळ संख्या कमी असल्यास 8/8 दिवसात फवारणी करावी लागते, आपला खर्च वाढतो. कुपोषित पिकावरच रोग जास्त पडतात. 

मित्रानो किळ नाशक फवारणी संदर्भाचे 1 उदाहरण सांगतो ,2 वर्षांपूर्वी लासुर ताल.चोपडा जिल्हा जळगाव येथील शेतकरी श्री तुषार दामोदर पाटील (भैय्यादादा) यांनी ठरवून एकही किटकनाशक फवारले नाही ,तरी त्यांना 10 जूनला लावलेल्या कोरडची कपाशी उत्त्पन्न एकरी 11 क्विंटल आले होते. माझ्या मते हि किमया मित्र किळीमुळे झाली असावी.त्यासाठीच मी नेहमी सांगत असतो की, लागवडीपासून 40/45 दिवस किटकनाशके फवारू नये, मित्र किळ संख्या वाढू द्यावी. साधारणतः 50 दिवसानंतर 120 दिवसापर्यंत कापूस पिकाला कीटक नाशकांची अळी साठीची फवारणी केलीच पाहिजे, आणि या वर्षी बीटी बियाण्यातच 25 ग्रॅम नॉन बीटीचे बियाणे मिक्स केलेले आहे, त्यामुळे नॉन बीटी बियाण्याच्या झाडावर अळी पडणारच आहे, ती झाडे शेतात विखुरलेल्या स्वरूपात असल्यामुळे संपूर्ण शेतात अळी नाशक फवारणी करावीच लागेल.

(यावर्षी बऱ्याच कंपन्यांनी 450 ग्रॅम ऐवजी 475 ग्रॅम बियाणे दिले आहे त्यात 25 ग्रॅम बियाणे नॉन बीटीचे आहे हे लक्षात ठेवा)साधारणतः लागवडीपासून 40 दिवस ते 125 दिवस या कालावधीत कमीत कमी 7/8 फवारे अळी नाशकांची करावीच लागतील,(पूर्वी बीटी कापूस नव्हता त्यावेळ सारखी),त्यातही 10 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत फवारे काळजी पूर्वक मारावे लागतील तरच सेंद्री अळीचे नियंत्रण होईल,अन्यथा मागच्या 2 वर्षा सारखीच परिस्तिथी उद्भवेल.सेंद्री अळी नियंत्रणासाठी 45/50 दिवसांनी एकरी 6/कामगंध सापळे लावावेत. या वर्षी 25 जुलै पासून 1 ऑगस्ट दरम्यान लावा. डोम कळी दिसू लागली की अळी नाशक फवारणी करावी,70/75 दिवसांनी एक उभारीच पाणी भरावे, कारण याच काळात पिकाला पाण्याची अत्यन्त गरज असते.रील सर्व विवेचनावरून तुमच्या असे लक्षात येईल की पिकाची प्रतिकार क्षमता वाढवली तर, रोग कमी पडतील आणि उत्पन्नात हमखास होईल हे मी खात्रीने सांगतो.

 

संपर्क श्री शिंदे सर, भगवती सीड्स चोपडा, भ्रमणध्वनी 9822308252

English Summary: Yes, first the resistance of such crops should be increased, then the diseases will be reduced
Published on: 28 July 2022, 07:23 IST