ज्या वेळेला शेतात बुरशीची अटॅक होता आणि पिकांचे नुकसान होण्यास सुरुवात होते त्या वेळी आपले विषमुक्त शेती करणारे जवळपास सर्वच शेतकरी हे सरास ट्रायकोडर्मा चा वापर करत असतात आणि त्याचे उत्तम परिणाम ही मिळतात पण येणाऱ्या काळात ट्रायकोडर्मा चा अति वापर हा घातक ठरू शकतो.आज जमिनीचा ऑर्गनिक कार्बन हा अत्यंत कमी आहे, त्या मुळे जमिनीतील जिवाणूंची संख्या ही तशी कमीच आहे आणि सोबत मित्र बुरशीची संख्या पण कमीच आहे, मित्र बुरशी संख्या कमी असल्या कारणाने शत्रू बुरशीचा अटॅक हा खूप मोठया प्रमाणात होत आहे,
ह्या शत्रू बुरशीना नियंत्रित करण्यासाठी आपण ट्रायकोडर्मा चा वापर हा करत असतो, पण ट्रायकोडर्मा बुरशी ही अत्यन्त आक्रमक आहे, जर समजा तुम्ही एका भांड्यात सर्व प्रकारचे जिवाणू जर टाकले आणि सोबत तुम्ही जर ट्रायकोडर्मा टाकला तर काही दिवसांनी त्या भांड्यात फक्त ट्रायकोडर्मा च जिवंत राहतो कारण ट्रायकोडर्मा हा बाकी सर्व जीवांना खाऊन टाकतो. शेतीमध्ये देखील तसच आहे, जर ट्रायकोडर्मा ला अन्य काही खाण्यासाठी मिळाले नाही तर तो मित्र जीवाणूंनाच खात सुटतो. आज जमिनीमध्ये मित्र बुरशीना पोषक वातावरण नाही.
मित्र बुरशी संख्या कमी असल्या कारणाने शत्रू बुरशीचा अटॅक हा खूप मोठया प्रमाणात होत आहे, ह्या शत्रू बुरशीना नियंत्रित करण्यासाठी आपण ट्रायकोडर्मा चा वापर हा करत असतो, पण ट्रायकोडर्मा बुरशी ही अत्यन्त आक्रमक आहे, जर समजा तुम्ही एका भांड्यात सर्व प्रकारचे जिवाणू जर टाकले आणि सोबत तुम्ही जर ट्रायकोडर्मा टाकला तर काही दिवसांनी त्या भांड्यात फक्त ट्रायकोडर्मा च जिवंत राहतो कारण ट्रायकोडर्मा हा बाकी सर्व जीवांना खाऊन टाकतो. शेतीमध्ये देखील तसच आहे, जर ट्रायकोडर्मा ला अन्य काही खाण्यासाठी मिळाले नाही तर तो मित्र जीवाणूंनाच खात सुटतो.
आज जमिनीमध्ये मित्र बुरशीना पोषक वातावरण नाही. त्या जास्त काळ जमिनीत जिवंत राहत नाहीत. पण येणाऱ्या काळात आपण जसे जसे विषमुक्त शेती करत राहू,ठोस काडीकचरा टाकत राहू तस तस आपल्या जमिनीचा ऑर्गनिक कार्बन हा वाढत जाईल आणि मित्र बुरशीना पोषक वातावरण निर्माण होईल त्या वेळी ट्रायकोडर्मा चा वापर हा कमी कमी करत जावा लागेल,नाहीतर ट्रायकोडर्मा हा मित्र जीवांनाच खात सुटेल व जमिनीत ट्रायकोडर्मा चे प्रमाण जातीत जास्त वाढत जाईल आणि ही गोष्ट घातक सिद्ध होईल. हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. आणि आज सुद्धा ट्रायकोडर्मा चा वापर हा गरजेनुसार च करावा आणि योग्य मात्रेत च करावा ही सर्व शेतकऱ्यांना विनंती.
- माऊली
Published on: 22 June 2022, 01:24 IST