मागील मृगबाग लागवड केलेल्या केळी बागेची मुख्य वाढीची अवस्था आहे. कांदे बाग लागवड झालेली आहे. हिवाळ्यात तापमान 16 अंश सेल्सिअसच्याही खाली जाते. अशा तापमानाचा केळीच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.
थंडीचा लागवडीवर होणारा परिणाम
- उती संवर्धित रोपे जमिनीत रूजण्यासाठी 16 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान लागते.
- सध्या कांदेबाग लागवड झालेली आहे. जसजसा या लागवडीस उशीर होईल, तसतसे थंडी वाढल्याने रोपांच्या वाढीवर परिणाम होईल.
- केळीच्या झाडावर पनामा रोग, शेंडे झुपका इत्यादी महत्वाचे हानीकारक रोग विशेष करुन पडतात. किड त्या मानाने कमी पडते.
रोग व किडी विषयांची माहिती संक्षेपात खालीलप्रमाणे आहे.
रोग व किड : पनामा (मर) रोग
नुकसान : पाने वाढतात. फळे खराब होतात, अयोग्य निचरा व भारी जमिन यामुळे जास्तीत जास्त अपाय होतो. हा रोग कवकामुळे होतो.
उपाय : बसराई, लालकेळ, हरीसाल व पुवन या जाती रोगप्रतिकारक आहेत. मॅक्युरी, क्लोराईड (2000 पीपीएम) किंवा व्हापाम (112 ग्रॅम) दर 20 लिटर पाण्यात मिसळून वापरावे.
शेंडा झुपका (बंचीटॉप )
नुकसान : रोग विषाणुमुळे होतो. झाडे खुजी पाने तोकडी होतात. या रोगाचा प्रसार रोगट कंद व मावा किडीमळे होतो.
उपाय : निरोगी कंद व मुनवे वापरावेत. रोग प्रतिकारक जाती बसराई लागवड करावी. मावा किडीचा बंदोबस्त करावा. रोगट झाडे नष्ट करावीत.
घडांच्या दांडयाची सडण
नुकसान : मुख्य दांडा सडतो व काळा पडतो. कवकामुळे रोग पडतो सुर्याकडील घडावील जास्त स्पष्ट चिन्हे
उपाय : उपाय घडावर झाडाची पाने बांधावित. 4.4.50 च्या बोर्डो मिश्रणाच्या घड लहान असताना फवारा द्यावा.
किड व खोड भुंगा
नुकसान : या भुंग्याची अळी केंद व खोड यांचा भाग पोखरते.
उपाय : झाडावर 0.05 टक्के एंडोसल्फान फवारावे. पॅरीसगीन औषध अधिक धान्याचे पीठ (1.5) यांच्या विषारी गोळया करुन कंदाचे जवळ टाकतात. दुषित कंद नष्ट करावेत.
हेही वाचा : उन्हाळी चवळी च्या बंपर उत्पादन देणाऱ्या जाती,जाणून घेऊ या जातीची वैशिष्ट्ये
पानावरील भुंगे
नुकसान : पावसाळयातील पाने व फळे कोरतात आणि खातात
उपाय : गुप्तरोल 550 (250 ग्रॅम औषध 1000 लिटर पाणी फवारावे.)
पानावरील मावा
नुकसान : उष्ण व सर्द दिवसात पाने व कोवळया फळातील रस पितात.
उपाय : वरीलप्रमाणे
फळावरील तुडतुडे
नुकसान : फळाच्या सालींना रस पितात साल फाटते.
उपाय : एंडोसल्फान 150 मिलि 100 लिटर पाणी हे मिश्रण फवारावे.
गुप्तेरॉल 5500 हे औषध फवारावे.
Published on: 12 February 2022, 02:30 IST