Agripedia

मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.

Updated on 24 October, 2022 3:48 PM IST

मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. कापूस, सोयाबीन, तूर यासारखी पिके पाण्याखाली गेली आहेत. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी केली जात आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच लवकरात लवकर शेतकऱ्यांना आर्थिक मदत

द्यावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.Such a demand is being made by the opposition. याच पार्श्वभूमीवर आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार का? कृषीमंत्री सत्तार स्पष्टच बोलले

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही, असे सत्तार म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.राज्यात ओल्या दुष्काळासारखी स्थिती निर्माण झालेली नाही. मात्र शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले

आहे,त्याचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे पंचनामे वस्तुनिष्ठ पद्धतीने केले जातील. आता दिवाळीच्या सुट्या लागणार आहे. एक-दोन दिवस शासकीय कर्मचारी सुटीवर असतील. मात्र १५ दिवसांच्या आत सरकारकडे नुकसानीचे आकडे येतील.त्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल,असे सत्तार यांनी स्पष्ट केले आहे.

ओल्या दुष्काळासंदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा केली जाणार का? या प्रश्नाचे थेट उत्तर देण्याचे सत्तार यांनी टाळले आहे. मंत्रीमंडळ बैठकीत काय काय बोलावे, काय नाही हे गोपनीय ठेवावे लागते. मंत्रीमंडळाचा तो अधिकार आहे. मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा होईल. त्यानंतर चर्चा तसेच घेतलेले निर्णय सार्वजनिक केले जातील, असेही सत्तार यांनी स्पष्ट केले.

English Summary: Will there be a wet drought in the state? Agriculture Minister Sattar spoke clearly
Published on: 23 October 2022, 07:58 IST