Agripedia

यंदा पावसाळा हा कमी प्रमाणात असेल असे म्हटले जाते. असे असताना मान्सून देखील उशिरा दाखल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशात पावसाचे प्रमाण, तीव्रता आणि जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन पिकांची लागवड रुंद वरंबा सरी पद्धतीने केल्यास फायदेशीर ठरते.

Updated on 30 June, 2023 3:03 PM IST

यंदा पावसाळा हा कमी प्रमाणात असेल असे म्हटले जाते. असे असताना मान्सून देखील उशिरा दाखल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशात पावसाचे प्रमाण, तीव्रता आणि जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन लागवड रुंद वरंबा सरी पद्धतीने केल्यास फायदेशीर ठरते.

रुंद वरंबा व सरी पद्धतीमुळे पावसाचे पाणी मुरते. यामुळे पिकांना कमी पाणी लागते. मुलस्थानी जलसंवर्धन होऊन त्याचा उभ्या पिकास तसेच पुढील हंगामातील पिकास लाभ होतो.

हे यंत्र सोयाबीन, तूर, भुईमूग, ज्वारी, बाजरी, उडीद इत्यादी पिकांच्या टोकण पद्धतीने पेरणीसाठी उपयुक्त आहे. यंत्राच्या सांगाड्यावर दोन्ही बाजूला सरी यंत्र असल्यामुळे पडलेल्या सरींमुळे पाण्याचे संवर्धन आणि निचरा होतो.

मोठी बातमी! राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या..

रुंद वरंबा सरी यंत्रामुळे रुंद वरंबा सरी यंत्राद्वारे केलेल्या पेरणीत व पारंपारिक पद्धतीपेक्षा ओलावा जास्त काळ टिकतो. उत्पादनामध्ये पारंपारिक पद्धतीपेक्षा १५ ते २० टक्क्यांनी वाढ होते. पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा सरीद्वारे निचरा होतो.

तसेच योग्य प्रमाणात पडलेल्या पाऊस जमिनीत मुरतो. पेरणीचा वेळ वाचतो. यामुळे हे फायदेशीर आहे. यासाठी टोकण यंत्राच्या साहाय्याने आपण चार ओळीतील एक सरी याप्रमाणे पेरणी करतो. त्यासाठी ट्रॅक्टर चालविण्याच्या विविध पद्धतीचा वापर करता येतो.

समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य

यंत्राच्या रुंदीनुसार ट्रॅक्टरच्या मागील आणि पुढील दोन चाकातील अंतर मोजून घ्यावे. त्याप्रमाणे त्यात बदल करावा. दोन सऱ्यांमध्ये एक १.२ ते १.५ मीटर रुंदीचा वरंबा तयार होतो. त्यावर टोकण यंत्राच्या साहाय्याने एकाच वेळी खत आणि बियाणे पेरता येते.

जुलैमध्ये साखर विक्रीचा कोटा वाढवला, केंद्र सरकारचा निर्णय
शेळीच्या दुधापासून खवा, पनीर, चीज, आरोग्यासाठी आहे फायदेशीर
सुक्या चाऱ्याची योग्य साठवण कशी करावी जाणून घ्या..

English Summary: Wide varamba sari system causes rain evaporate, amount rainfall, beneficial
Published on: 30 June 2023, 03:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)