Agripedia

कोणतेही पीक असो त्यामध्ये किडींचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमानात असतोच.आपण फक्त किटकनाशकांवर अवलंबून न राहता,एकात्मिक व्यवस्थापन पद्धती अवलंबली पाहिजे त्यामुळे खर्चात,वेळेत,कष्टात बचत होते. असे अनेक फायदे होतात.

Updated on 11 October, 2021 6:23 PM IST

जेव्हा एखाद्या पीकात किडीचे प्रमाण आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या वर जातेय असं जाणवले तेव्हाच रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा.

 

कीटकनाशकांचा वापर करत असताना एकदा खरेदी केलेले कीटकनाशक पीक काढणीस येऊ पर्यंत तेच फवारत असतो,असे करणे टाळावे.

कारण जेव्हा आपण एखादं कीटकनाशक फवारतो तेव्हा सर्वच कीड जाते असं नाही.या फवारणीतून वाचलेल्या काही अळ्या किंवा पतंगाची अंडी पुन्हा जीवणासाखळी पूर्ण करून पिकावर येतील.तेव्हा त्यांच्या शरीरात मागे फवारलेल्या गेलेल्या कीटकनाशकांप्रति प्रतिरोधक क्षमता तयार झालेली असते.परत पुन्हा एकदा तेच कीटकनाशक मात्रा वाढवून फवारले तरी म्हणावे तितके कीडनियंत्रण होत नाही.

पुन्हा त्या किटकनाशका प्रति प्रतिरोधक क्षमता वाढत जाते.फवारणीसाठी सर्वप्रथम मवाळ कीडनाशकांची म्हणजेच ज्या कीडनाशकांच्या बाटलीवर हिरवा किंवा निळा त्रिकोण आहे, अशाच कीडनाशकांची निवड करावी. त्यानंतर गरज भासल्यास शेवटी जहाल (लाल, पिवळा त्रिकोण असलेले) कीडनाशके वापरावीत. एकच एक किंवा एकाच गटातील कीडनाशके वारंवार फवारणी न करता आवश्यक तेव्हा वरील उल्लेखीत बाबींचा विचार करून कीडनाशकांची फेरपालट करून शिफारशीत मात्रेतच व केंद्रीय कीटकनाशक मंडळाने शिफारशीत केलेली (लेबल क्लेम) कीडनाशकांची फवारणी करावी.

तणनाशके, बुरशीनाशके, रोगनाशके व इतर कोणतेही घटक शिफारस असल्याशिवाय मिसळून फवारू नयेत. तसेच शक्यतो दोन घटकांचे द्रावण फवारणीसाठी टाळावे.

उदा.सोयाबीन पिकावर तुम्ही सुरवातीस क्लोरोपायरीफॉसची फवारणी केली. पुन्हा काही दिवसाच्या अंतराने क्लोरोपायरीफॉसचं फवारले  तर किडीमध्ये या औषधासाठी प्रतिरोध क्षमता तयार झालीच म्हणून समजा.

क्लोरोपायरीफॉस ऐवजी रायनॅक्सिपायर किंवा ट्रायझोफॉस फवारल्यास किडीमध्ये प्रतिरोधक क्षमता निर्माण न होता किडीचे व्यवस्थित निर्मूलन होईल.

अशा प्रकारे कीटकनाशकांची आलटून पालटून  फवारणी करावी.

 

-लक्ष्मण अनंदे जालना

 

English Summary: Why spray a single pesticide or a single group of pesticides frequently
Published on: 11 October 2021, 06:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)