(आमच्याच भाग भांडवलदार शेतकरी बांधवांच्या मागणी वरून 'निसर्ग फाऊंडेशन' द्वारे स्वस्त व परिणाम कारक पोटॅशियम ह्युमेट-98% [ह्युमिक ॲसीड], फळमाशींचे सापळे, 'मासोळी, निम, करंज व पॅराफीन [खणीज] तेल', 'तेल विघटक', 'फळमाशीचे सापळे', 'सौर प्रकाश सापळे', 'पिवळे/निळे चिकट सापळे', 'हाड-मासाचे खत', 'निंबोळी चुरी', 'द्रवरूप जिप्सम' व 'जिप्सम पावडर' देण्यात येते. इतर जिल्ह्यातील पुरवठा संबंधित कोणताही खर्च घेण्यात येत नाही.)
जवळपास वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांची (मग ते तेल प्राणीजन्य असो कि वनस्पती पासुनचे किंवा कोणत्याही तेलयुक्त पदार्थाचे) किटका विरुद्ध च्या विनाशाची कार्यवाहक गुणधर्मीता हि जवळपास सारखीच असते. ती अशी.तेल फवारणी द्वारे किटकांच्या शरीरावर तैल पडले की त्यांना त्रास होतो.Insects suffer when oil gets on their bodies through oil spraying. स्पर्श विषा (क्वान्टॅक्ट पॉइझन) सारखा दाह केला जातो,दुषित वायू निर्मित करून (गॅस पॉइझन)किटकांची स्वास प्रक्रिया खराब केली जाते, किटकांच्या शरिराच्या सेल मेंबरेनची चिकनाहट घालवून त्या किटकाची कातडी कोरडी करून मारले जाते.
त्याबरोबरच ज्या पिकावर ते फवारले जाते त्या पिकांच्या पानांना जेंव्हा किटक खातात किंवा त्यातील रस शोषन करतात, त्याद्वारे सुद्धा पोटविष (स्टमक पॉइझन) माध्यमातून किडिंचे खच्चीकरण केले जाते.अशा अनेकविध विषगुणा द्वारे तेलांचा जगातील कृषी क्षेत्रात कीटकनाशक म्हणून उपयोग वाढतो आहे.अशाप्रकारे तेलवर्गीय किटक नाशके हि किटकांच्या भवती बाह्यअंगी विनाषक वातावरण निर्मितीस अतिशय पोषक असतात. म्हणूनच प्रत्येकच रासायनिक औषधीच्या सोबत किंवा स्वतंत्र रीत्या अशा तेलांचा वापर अवश्य करावा.
कीटकनाशक म्हणूनच फक्त किडिंच्या विरुद्धच यांचे महत्त्व नाही.तर तेल फवारणी द्वारा पानावर जी चिकनाहट तयार होते त्यामुळे बुरशीच्या बिजांचे पर्णरंध्रात रूजण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो व बुरशी जन्य रोगाचा पायबंद होतो. करिता अशी तेल फवारणी बुरशीनाशक म्हणू जरी नसली तरी बुरशी जन्य रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार थांबवतात.
संकलन- पंकज काळे (M.Sc. Agri.), निसर्ग फाऊंडेशन, अमरावती
संपर्क क्र.- 9403426096, 7350580311
Published on: 20 August 2022, 04:49 IST