Agripedia

केसरचे नाव ऐकल्यावर, सर्वात आधी मनात येणारी गोष्ट म्हणजे ती लाखो रुपये प्रति किलोने विकली जाते. तसे, सोन्याप्रमाणे विकले जाणारे केशर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि धार्मिकदृष्ट्या याला खूप महत्त्व आहे आणि अन्नाची चव देखील वाढवते. तुम्हाला माहित आहे की केशर खूप महाग आहे, परंतु तुम्हाला माहित आहे की केशर इतके महाग का आहे?

Updated on 10 September, 2021 9:43 PM IST

केसरचे नाव ऐकल्यावर, सर्वात आधी मनात येणारी गोष्ट म्हणजे ती लाखो रुपये प्रति किलोने विकली जाते. तसे, सोन्याप्रमाणे विकले जाणारे केशर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि धार्मिकदृष्ट्या याला खूप महत्त्व आहे आणि अन्नाची चव देखील वाढवते.  तुम्हाला माहित आहे की केशर खूप महाग आहे, परंतु तुम्हाला माहित आहे की केशर इतके महाग का आहे?

वास्तविक, केसरच्या लागवडीपासून बाजारात विक्री होईपर्यंत ही प्रक्रिया खूप कठीण आहे. केसर शेतात तयार होण्यापासून तर हवाबंद डब्ब्यात पॅक होईपर्यंत खुप मेहनत लगते. अशा स्थितीत जाणून घ्या, त्याची लागवड कशी केली जाते, कारण यांचमुळे ती खूप महाग आहे ... केसराशी संबंधित अनेक खास गोष्टी जाणून घ्या ….

केसरचे उत्पादन खूप कमी आहे

केसरचे भाव कानाला ऐकायला खूप जास्त वाटतात, पण जेव्हा केसरची लागवड केली जाते, केसरचे पिक हे निघण्यास खुप वेळ घेते, आणि एवढे असूनही खूप कमी प्रमाणात उत्पादन होते. असे मानले जाते की जर साडेपाच हजार चौरस फुटांमध्ये लागवड केली तर फक्त 50 ग्रॅम केशर येतो. साहजिकच, एक किलो केशर मिळविण्यासाठी, त्याची लागवड खूप जास्त जमिनीत करावी लागते.

 

बियाणे 15 वर्षे टिकतात

तसे, केशर बियाण्याची पेरणी 15 वर्षांतून एकदाच करावी लागते आणि दरवर्षी त्याला फुले येत राहतात. 15 वर्षांनंतर, बिया पुन्हा काढून घ्यावे लागते आणि त्यानंतर प्रत्येक बियापासून आणखी अनेक बिया तयार होतात.

केशर कसा तयार होतो ?

कैसरच्या बीपासून कोणतेही झाड वगैरे वाढत नाही. यामध्ये, फक्त एक फूल पानासारखे निघते आणि फुल डायरेक्ट उगवतो. केसर हे लसूण आणि कांद्याच्या पिकासारखेच दिसते.  याला एक फूल येते आणि एका फुलाच्या आत, पानांच्या मध्यभागी आणखी 6 पाने निघतात, जी फुलाच्या पुंकेसर सारखी असतात, जसे गुलाबाच्या फुलाला लहान पाने असतात.  ही वनस्पती दोन-तीन इंच वर येते. यात केशराची दोन-तीन पाने असतात, जी लाल रंगाची असतात. त्याच वेळी, तीन पाने पिवळ्या रंगाची असतात, जी काही उपयोगाची नाहीत.

अरारारारा खतरनाक! एक ग्रॅम केशरसाठी इतकी मेहनत

प्रत्येक फुलातून फक्त केसरची पाने वेगळी केली जातात व तेच उपयोगाची पण असतात.

असे म्हटले जाते की, जेव्हा सुमारे 160 केशरची पाने बाहेर काढली जातात तेव्हा त्यापासून फक्त एक ग्रॅम केशर बनवता येते.

  म्हणजेच, एक ग्रॅम केशरसाठी केशर अनेक फुलांपासून वेगळे करावे लागते, जे खूप मेहनती काम असते. आणि हो, या मेहनतीतून काढलेले एक ग्रॅम केशर 100 लिटर दुधात पुरेसे आहे.

 केसरची शेती कधी होते?

केसरची लागवड ऑगस्टमध्ये केली जाते आणि फुल येण्याची सुरवात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होते. या फुलांच्या प्रक्रियेस फक्त एक महिना लागतो. असे मानले जाते की ते 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान होते. त्याच वेळी, केसरला पाणी हे नैसर्गिकरित्या दिले जाते म्हणजे पावसाच्या पाण्यावर केसरची शेती केली जाते आणि त्यामुळे फुले काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि श्रम खर्च खूप जास्त असतो. काश्मीरच्या फक्त एका भागात केसरची जास्त लागवड केली जाते, कारण तेथे विशेष लाल रंगाची माती आहे, ज्यामध्ये केशराची लागवड केली जाते.

English Summary: why saffron is much expensive?reason
Published on: 10 September 2021, 09:43 IST