Agripedia

आपल्या पीकांच्या वाढीसाठी अठरा अन्नद्रव्यांची आवश्यकता असते . त्यापैकी एखादे जरी मातीत कमी किंवा जास्त झाले तर

Updated on 01 February, 2022 4:01 PM IST

आपल्या पीकांच्या वाढीसाठी अठरा अन्नद्रव्यांची आवश्यकता असते . त्यापैकी एखादे जरी मातीत कमी किंवा जास्त झाले तर त्याचा परिणाम लगेचच झाडावर दिसून येतो .जसे पाने पिवळी पडणे ,पान गळणॆ ,शिरा सोडून इतर पानांचा सर्व भाग वाळून जाणॆ इत्यादी लक्षणॆ अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे किवा अभावामुळे वनस्पतीमध्ये दिसून येतात .अठरा अन्नद्रव्याशिवाय पीकांची वाढ पूर्ण होत नाही . ती अन्नद्रव्ये मिळताच खुंटलेली वाढ परत सुधारते .

विशेषत: या अन्नघटकांचा वनस्पती वाढीच्या एखाद्या जैविक कार्यात प्रत्यक्ष सहभाग असतो. त्यामुळे माती परिक्षण करणॆ आवश्यक आहे .त्याद्वारे शेतक-यांना समजेल की मातीत कोणत्या अन्नद्रव्याचे प्रमान कमी आहे किंवा जास्त आहे . मुख्य आणि महत्त्वाचा उद्देश म्हण्जे माती परीक्षणावरुन जमीनीत पीक वाढीसाठी कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे व ती कमतरता नाहीशी करण्यासाठी काय करणं आवश्यक आहे हे ठरवता येते.

माती परीक्षण व पीक उत्पादन यांच्या संबंधावरून पीकांना जमीनीतून किती प्रमाणात अन्नद्रव्ये मिळतात व कम्पोस्ट ,हिरवळीचे खत ,गाडूळ खत इत्यादी खतापासून किती प्रमाणात अन्नद्र्व्ये द्यावयास पाहिजेत ही माहिती मिळ्ते.

 मातीच्या नमून्याचे प्रयोगशाळेत सामू ,विद्राव्य क्षार ,सेंद्रिय कर्ब ,उपलब्ध नत्र ,स्फुरद आणि पलाश यासाठी परीक्षण केले जाते .जमीन पीक वाढीसाठी चांगली आहे किंवा नाही ते समजते .

विद्राव्य क्षाराच्या प्रमाणावरून पीकांच्या वाढीवर होणा-या परिणामाचा अंदाज होतो.

त्यामुळे माती परीक्षण ही काळाची गरज बनले आहे अन्यथा शेतकऱ्यांना खूप मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागणार आहे. नेमका पिकांना रोग कोणता लागतो कशामुळे लागतो हे समजायला मार्ग नाही. आणि हे समजेल फक्त माती परीक्षण केल्यामुळेच. आपण जसे आजारी पडल्यानंतर दवाखान्या मध्ये  गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला सांगतात की तुमचे रक्त तपासून घ्या त्यानंतर पुढची प्रक्रिया आपण करूयात. असेच मातीचे सुद्धा आहे मातीत तपासल्यानंतर सर्व आपल्याला माहिती पडेल.

 

मिलिंद जि गोदे

English Summary: Why need of soil testing
Published on: 01 February 2022, 04:01 IST