सूक्ष्म अन्नद्रव्ये फार कमी प्रमाणात पिकांना लागत असली तरी त्यांपैकी प्रत्येकाची पिकाच्या वाढीसाठी जरुरी असते. यांपैकी एखाद्या अन्नद्रव्याचे प्रमाण कमी झाले अगर वाढले तर त्याचा पिकाच्या वाढीवर व उत्पादकतेवर वाईट परिणाम होऊन पिकाचे उत्पादन घटते. पूर्वी आपण शेतात दरवर्षी शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत, निरनिराळ्या पेंडी टाकायचो ,गायी ,शेळ्या मेंढ्या बसवायचो बोनमील भरपूर वापरत होतो. या खतांत सेंद्रिय कर्ब असल्याने त्याचा विविध प्रकारच्या जीवाणूंना अन्न म्हणून पुरवठा होत होता,{सेंद्रिय कर्ब हे जमिनीतील जिवाणूंचे मुख्य खाद्य आहे} त्यामुळे आपल्या जमिनीत कोट्यावधी जिवाणूंची संख्या असायची गांडूळ असायचे व म्हणून आपले पीक प्रतिकार क्षम राहत असे.
याशिवाय जमीन पड ठेवणे, पिकांची फेरपालट करणे यामुळेही जमिनीत असणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण व सेंद्रिय कर्बाचे प्रमाण पूर्वीच्या काळी कमी होत नसे. परंतु गेल्या २०-२५ वर्षात अधिक उत्पादन देणाऱ्या, संकरीत जातींच्या पिकांची आपण लागवड करीत आहोत. तसेच पाणीपुरवठ्याची सोय वाढल्यामुळे एकाच शेतातून वर्षातून दोन-तीन पिके घेऊ लागलो. नत्र, स्पुरद व पालाशयुक्त रासायनीक खते देऊ लागलो. सेंद्रिय खते कमी वापरू लागलो. या सर्वांचा परिणाम म्हणजे आपल्या जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण व सेंद्रिय कर्बाचे कमी झाले. त्याचा पिकावर वाईट परिणाम दिसू लागला. भरगोस प्रमाणात नत्र, स्पूरद, पालाश, कॅलशियम, मॅग्नेशियम, गंधक खते देवूनही उत्पादन घटू लागले. आपल्या जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्याची आणि सेंद्रिय कर्बाची कमतरता असल्यास असे घडू शकते ,हे संशोधनातून सिद्ध झाले आहे.
मित्रानो त्यासाठी रासायनिक खते 50% कमी वापरा आणि सेंद्रिय खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करून तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवा,तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढल्याशिवाय तुमच्या शेतीची उत्पादकता वाढणार नाही.आणि तुमच्या शेतीतील पिके प्रतिकारक्षम झाल्याशिवाय , त्यावर रोगांचे प्रमाण कमी होणार नाही. {या संदर्भाची एक पोस्ट मी 7/8 दिवसांपूर्वी टाकली आहे *वाढवा झाडाची प्रतिकार क्षमता * हि पोस्ट वाचा} त्यासाठी उच्च प्रतीची सेंद्रिय खते वापरली तर उत्पादनात 25 ते 50 % उत्पन्न वाढ सहज शक्य आहे.[ चांगल्या प्रतीची सेंद्रिय खते बाजारात उपलब्ध आहेत,खते अनुभव आणि ज्यांनी पूर्वी वापर केलेला आहे,अशा व्यक्तीला विचारून करा ]पिकांना सेंद्रिय खते देतांना त्यात एकरी 4 किलो PSB, व 4 किलो ऍझोटोबॅक्टर चे जिवाणू द्यावेत.
ठिबक मधून प्रति एकर 1 लिटर liquid हे जिवाणू सोडावेत, हे जिवाणू 150 रुपये किलो प्रमाणे उपलब्ध आहेत, त्याच प्रमाणे वेस्ट deecompozar ह्या फुकटच्या जिवाणूंचा वापर करावा त्यासाठी फवरणाऱ्या मानसाची मजुरी लागते.वर मी सांगितल्या प्रमाणे सेंद्रिय खते, PSB, azotobactor, वेस्ट decompozar .हे सगळे जिवाणू नॅनो तंत्र ज्ञानावर आधारित बनविलेले असतात,यांचा आपल्या अर्ध्या शेतात वापर करून पहा व अर्ध्या शेतात करू नका आणि परिणाम स्वतः पहा. या सगळ्यांचा सेंद्रिय खतासह एकरी खर्च 2000 ते 2200 रुपया पेक्षा जास्त येणार नाही पण उत्पन्नात निश्चितच वाढ होईल हे मी खात्रीने सांगतो.
श्री शिंदे सर,भगवती सीड्स, चोपडा
जिल्हा जळगाव भ्रमणध्वनी
9822308252
Published on: 25 June 2022, 09:31 IST