सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. यामुळे पाण्याची कमतरता भासणार आहे. असे असताना मोठी पिके घेतली तर त्याचा कालावधी आणि खर्च देखील वाढणार आहे. यामुळे कमी कालावधीत जास्त पैसे कमवायचे असतील तर साधी काकडी हा एक चांगला पर्याय शेतकऱ्यांपुढे आहे. यामध्ये शेतकरी कमी दिवसात जास्त पैसे कमवू शळतो. यामुळे हा देखील एक चांगला पर्याय आपल्याकडे आहे.
काकडीही यंदा भाव खात आहे. त्यामुळे मुख्य पिकांमधून जे उत्पन्न मिळाले नाही, ते यामधून मिळाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगलाच फायदा होत आहे. काकडीत नैसर्गिक गारवा असतो त्यामुळे मागणीत वाढ होत आहे. सध्या काकडीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. सध्या 1 किलो काकडीसाठी 50 रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत. तसेच आता शेतकरी बाजारात उतरला आहे.
यामुळे शेतकरी व्यापाऱ्याला काकडी विकत नाही तर स्वत:च मार्केट जवळ करीत असून अधिकचा नफा घेत आहे. यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे जास्तीचे मिळत आहेत. यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कलिंगड, काकडी अशा हंगामी पिकांची लागवड केली आहे. याचा फायदाही शेतकऱ्यांना होत आहे. यामुळे काहीसा दिलासा यामधून शेतकऱ्यांना मिळत आहे.
काकडी, कलिंगड याची विक्री शेतकरीच करताना दिसत आहे. यामुळे कोणी मध्यस्ती राहत नाही शिवाय सर्व नफा शेतकऱ्यांच्या पदरी पडत आहे. ग्राहकांना चांगला माल कमी किंमतीमध्ये मिळाल्याचे समाधान होते. यामुळे शेतकरी सध्या याकडे वळाले आहेत. तसेच कलिंगडाच्या बाबतीत देखील असेच गणित शेतकऱ्यांनी अवलंबले आहे.
महत्वाच्या बातम्या;
अतिरिक्त उसावर अखेर अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा..
शेतकऱ्याचा नादच खुळा! तब्बल दीड एकरात खोदली विहीर, पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला..
कृषी प्रदर्शने ठरताहेत आधुनिक तंत्रज्ञानाची दालने, शेतकऱ्यांनो जाणून घ्या कसा होतो फायदा
Published on: 08 April 2022, 11:09 IST