आपली शेती ही मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे कोणते पिक घ्यावयाचे व कोणते पिकं योग्य राहील तो निर्णय घेतांना येथे आपन डगमगतो व तसेच आपन शेतकरी करत नाही तर पडणारा पाऊस करतो. त्यामुळे आपल्या पेरण्यासाठी सर्वजण एकदमच तयार होतो. शेतातील सर्वांचे धान्य एकदमच तयार होते व ते तयार झाल्याबरोबर सर्वच आपन शेतकरी बाजारात विकतो . परिणामत: बाजारात आवक अचानक वाढते व आपल्या शेतमालाचा किंमती सपाटून पडतात. येणारा उत्पादन लागत व शेतमालाच्या किंमती यांचा काहीच ताळमेळ राहातच नाही व आपल्या समोर नुकसानीत आपला माल विकण्याशिवाय पर्याय उरत नाही. या कमी किंमतीचा सर्व फायदा व्यापारी घेतात.आपल्या मुद्दा लक्षात आला असेल मित्रहो
आपल्याला सर्व बाजूनेच संकटे आहे. परीक्षा शेतकर्याची होते पर्जन्यमानाचा सर्वात विपरित परिणाम धान्य शेतीलाच भोगावा लागतो. एका हंगामाचा भाग सर्वसाधारणपणे चार महिन्याचा राहतो. या चार महिन्यात हवामानातील सर्व बदल पिकाला झेलता झेलता नाकी नऊ येतात राव. कधी जास्त पाऊस तर कधी पावसाचा ताण, कधी रोगांची लागण तर कधी आवश्यक ओल नसल्यामुळे कमी उगवण या सर्वांचा उत्पादनावर विपरित परिणाम होतो हे सर्व करुन आवश्यक उत्पादन न मिळाल्यामुळे आपला शेतकरी वर्ग पार खचून जातो. इतक्या सर्व संकटातून पार पडत पडत जेव्हा त्याच्या पदरी शेती चे उत्पादन हाती पडते त्यावेळी बाजारभाव त्याला मारक ठरतात.
त्याचा उत्पादन खर्चसुध्दा भरून निघत नाही. जसा आपण स्वस्त भावाने धान्य पुरविण्याचा ठेका घेतला की काय ? ही बाब लक्षात ये की आपन स्वत:च्या गरजेपुरतेच धान्य निर्माण करावे पण असे करणे कठीण असते कारण बाकिचे ही व्यवहार असतात .कोठे कोठे आपलंही चुकते आपन वारंवार तेच पिकं पद्धती, शेणखताचा अभाव एकच एक पीक घेतो त्या मुळे जमिनीत उत्पत्तीसाठी कर्बाचे प्रमाण कमी होते व उत्पादन घट हे निश्चित असतें.
बदलते पर्जन्यमान, उत्पादन खर्चावर आधारित नसलेले बाजारभाव, डोक्यावर कर्जाचे डोंगर, कमी उत्पादकता, शेतमजूरीचे वाढते दर, निविष्ठांच्या सतत वाढत जाणाऱ्या किंमती यामुळे सध्या आपला शेतकरी हैराण झाला आहे. शेती व्यवसाय परवडेनासा झाला आहे अशी हाकाटी सर्वत्र पिटली जात असतांना शेतीद्वारे उन्नती ही संकल्पना मृगजळ वाटावयास लागली आहे. पण शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला तर मात्र शेतकऱ्यांची शेतीद्वारे आर्थिक उन्नती होऊ शकते.आपल्याकडून एकच महत्वाची चूक होते आहे की ते पाणी आपण योग्यपध्दतीने अडवत नाही.
हे पाणी अडविण्याचे काम कोण करणार ? तुम्हाला असे वाटते काय की एखादा अदृष्य हात येऊन हे काम करून जाईल ? असे आपल्याला वाटत असेल तर आपण मूर्खांच्या नंदनवनाचे नागरिक आहात असे म्हणावेसे वाटते. हे काम आपले आपल्यालाच करावयाचे आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या शेताचा विकास आपल्यालाच करावयाचा आहे.
आज आपल्या घरचे लोक शेतावर काम नाही म्हणून शहरात रोजगारासाठी जातात. शहरात त्यांना अगणित अडचणींना तोंड द्यावे लागते. जर त्यांना गावातल्या गावात रोजगार मिळू शकला तर त्यांना शहरात जाऊन या सर्व अडचणींना तोंड देण्याची गरजच पडणार नाही. जनावरांची शेती करण्याला (Protein Farming) असे म्हणतात. त्यांच्यापासून मांस, दूध यासारखे जे पदार्थ मिळतात त्यात प्रथिनाचे प्रमाण जास्त असते.शेतकरी म्हणून आपल्याला काय हवे ?
आपल्या मालकीच्या शेतावर आपला जीव लागावा, त्याने आपल्याला वर्षभर कायम स्वरूपाचे उत्पन्न द्यावे, आपली पतक्षमता वाढावी, आपल्या घरच्या सभासदांना रोजगार मिळवून द्यावा, आपल्याला सुखासमाधानाने जगता यावे या गोष्टी जर त्याला मिळू शकल्या तर त्याला आणखी काय हवे आहे ?
विचार बदला जिवन बदलेल
मिलिंद जि गोदे
Published on: 04 January 2022, 06:20 IST