Agripedia

कोणतेही पीक उत्तम यायचे असेल तर "जमिनीची सुपकता" अत्यंत महत्वाची आहे.

Updated on 21 March, 2022 7:56 PM IST

कोणतेही पीक उत्तम यायचे असेल तर "जमिनीची सुपकता" अत्यंत महत्वाची आहे.

ज्या जमिनीचा सामू 6.5 आहे.ज्या जमिनीचा EC 0.5 च्या आत आहे.ज्या जमिनीची सेंद्रिय कर्बाची पातळी 0.8 च्या पुढे आहे.ज्या जमिनित क्षारांची पातळी योग्य आहे असे खुप महत्वाचे घटक आहेत.पिकास आवश्यक असणारे " मूळ अन्न द्रव्ये - घटक " 16 आहेत. आपल्या सोयी साठी याचे 4 भाग पाडले आहेत. नैसर्गिक अन्न घटक = 3 ; 1 कार्बन 2 हैड्रोजन 3 प्राणवायु 

हे नैसर्गिक उपलब्ध आहेत.

 नत्र 2 स्फुरद 3 पालाश.

 प्रमाण जास्त लागते म्हणून मुख्य अन्न द्रव्ये म्हणतात.दुय्यम अन्न द्रव्ये = 3;  1 कैल्शियम 2 मैग्नेशियम 3 गंधक. मुख्य अन्न द्रव्याच्या मानाने खुप कमी पुरवावे लागते म्हणून म्हणून याचे नाव दुय्यम अन्न द्रव्ये म्हणतात.

सूक्ष्म अन्न द्रव्ये = 7;1 फेरस = लोह, 2 झींक = जस्त, 3 कॉपर = तांबे , 4 मंगेनिज, 5 मोलाब्द , 6 बोरॉन, 7 निकेल 

ही 7 अन्न द्रव्ये , मुख्य आणि दुय्यम अन्न द्रव्याच्या मानाने खुप कमी किंवा अति सूक्ष्म प्रमाणात आवश्यक असतात म्हणून याना सूक्ष्म अन्न द्रव्ये असे म्हणतात.

      1 क्रमांकाचे अन्न द्रव्ये नैसर्गिक रित्या पिकासा मिळतात . त्याची फारशी चिंता करावी लागत नाही. मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्न द्रव्ये या तिन्ही द्रव्य बाबत लक्ष्य द्यावे लागते.

      हे 13 अन्न द्रव्ये जमिनीत काही प्रमाणात उपलब्ध असतात, ते वजा जाता आवश्यक अन्न द्रव्ये पुरवावी लागतात. हे पुरवलेले अन्न घटक जसेच्या तसे म्हणजे दिलेल्या स्वरुपात पिकास "अपटेक्" "शोषण" करता येत नाहीत. म्हणून या स्वरूपास "स्थिर स्वरूप" किंवा Fix Form असे म्हंटले जाते. ही अन्न द्रव्ये पिकास "अपटेक्" करण्या योग्य स्वरुपात रूपान्तर व्हावे लागते . हे रूपान्तरणाचे कार्य जमिनीतिल जीवाणु करीत असतात. ह्या विविध प्राकारच्या जीवाणुंची 'संख्या आणि कार्यक्षमता' ही अत्यंत महत्वाची असते.

या साठी त्याना त्यांचे खाद्य योग्य प्रमाणात पुरवावे लागते. आणि ते म्हणजे " सेंद्रिय कर्ब " होय. जमिनित सेंद्रीय कर्बाची पातळी योग्य असावी लागते. जी आपल्या कड़े फारच कमी आहे. सरसरी 0.3 ते 0.5 एवढीच असते. ही पातळी वाढवणे साठी जैविक कर्ब द्यावा लागतो. जैविक कर्ब हा सेंद्रिय खतातून उपलब्ध होत असतो.

जीवामृत, वेस्ट डी कंपोझर, इ एम ,जीवामृत स्लरी ,ऍझो, रायझो, पीएसबी हि जैविक खतेच आहेत, स्वस्त आणि कमी खर्चात ती देता येतात.या जैविक खतामुळेच किंवा जीवणूमुळेच आपल्याला उत्पन्न मिळते.आपल्या जमिनीत जिवाणू नसतील तर तुम्ही कितीही रासायनिक खते द्या उत्पन्न खूप कमी मिळते.

   याचे एक उदाहरण देतो ज्या जमिनीची लेव्हल केलेली असते त्या जमिनीत 2/3 वेष उत्पन्न मिळतच नाही, कारण जसे दूध तापवून थंड झाल्यावर त्याला साय येते म्हणजे साय हा दुधाचा पौष्टीक पदार्थ असतो.

त्यातच सर प्रकाचे जिवाणू असतात आणि हाच 1 विथ जमिनीचा ठार लेव्हल केल्यामुळे खोल गाडला जातो व जिवाणू नसलेला मातीचा थर वर टाकला जातो .रासायनिक पदार्थ ,सेंद्रिय कर्ब यांचा झाडाला पुरवठा करणारे जणू उपलब्ध नसल्यामुळे ते पदार्थ झाडाला ,पिकांना मिळत नाहीत आणि म्हणून लेव्हल केलेल्या जमिनीत 2/3 वर्ष उत्पन्न मिळत नाही 2/3वर्षानंतर नैसर्गिक रित्या जिवाणूंची वाढ झाली की अशा लेव्हल जमिनीतून उत्पन्न मिळायला लागते.

 मित्रानो वारी उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला जे जमिनीतून उत्पन्न मिळते ते फक्त आणि फक्त जीवणूमुळेच मिळते, आणि म्हणूनच जैविक खतांचा वापर वाढवा उत्पन्न आपोआप वाढेल.

 फुकटचे वेस्ट डी कंपोझर विरजण, इ एम जिवाणू आणि इतर जैविक खतांच्या वापर आणि मार्गदर्शनासाठी भेटा.

 

श्री दिलीप शिंदे सर

भागवती सीड्स, चोपडा

भ्रमणध्वनी 9822308252

English Summary: Why and how to use organic manure? Doing so will be of great benefit.
Published on: 21 March 2022, 07:55 IST