Agripedia

माणसाच्या तीन अत्यावश्यक मूलभूत गरजा आहेत,

Updated on 27 August, 2022 7:10 PM IST

माणसाच्या तीन अत्यावश्यक मूलभूत गरजा आहेत, रोटी कपडा मकान (अन्न, वस्त्र, निवारा) या तिन्ही गरजा पूर्ण करण्यासाठी माणूस अहोरात्र झटत असतो, छोट्या घरात लहान चे मोठे होऊन लग्नानंतर दोन चे चार हात होतात, जस जसे कुटुंबातील सदस्य वाढतात तसे-तसे घर खर्च, व ईतर गरजा वाढतात त्या सोबत छोट्या घराची अडचण होऊ लागते, माणूस हा जन्मतःच महत्वाकांक्षी भविष्याचा विचार करणारा व त्या साठी नियोजन करणारा प्राणी असल्याने ब्रम्हांडातील सर्वश्रेष्ठ जीव म्हणून ओळखला जातो, स्वादिष्ट पोषक आहार, साजेसे

अंगभर कपडे, व सर्व सुविधा युक्त घर हे प्रत्येकाचे स्वप्नच असते अन् त्या आवश्यक गरजांची ईच्छा पुर्ण करण्यासाठी कष्टाची पराकाष्ठा करत असतांना स्वतःच घर हे एक खूप मोठं स्वप्न साध्य करण्यासाठी ईतर विलासाच्या ईच्छा मारून वेळ प्रसंगी फाटक्या कपड्यात अर्ध-पोट जेवून तर कधी पोटाला दगड बांधून जीवतोड मेहनत करून पैसा कमावतात.They earn money by eating half-full and sometimes by tying stones to their stomachs कित्तेक लोकांचे स्वतःचा प्लॉट घेऊन घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उभे आयुष खर्ची पडते. उन, वारा, पाऊस, कष्ट आपण सोसले ते दिवस आपल्या मुलांवर येऊ नये म्हणून जेंव्हा घर बांधण्यासाठी प्लॉट

घेतांना दलाल व रिअल इस्टेट धारक कडून फसवणूक होते तेंव्हा कधी न बनलेले घर छाताडावर कोसळल्या सारखे होते. प्लॉट, शेती खरेदी विक्री व्यवहारात अडमाप पैसा आहे अन् बक्कळ पैसा कमावण्यासाठी काही लाचखोर अधिकाऱ्यांना हाताशी धरून शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून प्लॉट शेती घेणाऱ्या व्यक्तींना गंडविल्या जाते. खर तर अज्ञान व गोड गोड बोलणाऱ्या पैसापिपासु (पैसा पिपासु हा माझा स्वनिर्मित शब्द रिअल इस्टेट एजंट व बोगस एनए च्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या लोकांसाठी आहे) लोकांच्या जाळ्यात अडकून प्लॉट,

शेती किंवा ईतर प्रॉपर्टी विकत घेतांना कोणतीही शहानिशा न करता जेंव्हा फसगत होते त्या नंतर स्वप्नांचा चुराडा झाल्याने केवळ पश्चाताप शिवाय काहीच उरत नाही. एक एक पैसा जमा करून लाखो रुपयाची प्लॉट शेती खरेदी मध्ये गुंतवणूक करतांना पाच दहा हजार वाचविण्याची कंजुषी करून लाखो रुपये धोक्यात घालवू नका. प्लॉट, शेती खरेदी करतांना, सावधानता बाळगणे आवश्यक आहे. शेती खरेदी करतांना आवश्यक आहे की ७/१२, नमुना आठ-अ, फेरफार, खोडतोड ७/१२, हक्क नोंद, ९-३,९-४, मोजणी शीट, डावे उजवे पान, गटाचा

नकाशा, ज्यांच्याकडून प्रॉपर्टी शेती घेत आहात त्यांची खरेदी प्रत घेऊन चातूर्सिमेतील लोकांची व शेती च्या चातूर्सिमेत असलेल्या लोकांची माहिती मिळवा. शेती पेक्षा प्लॉट घेणे मोठे अव्हानाचे काम आहे, एन ए, प्लॉट साइज, ७/१२, फेरफार, ताबा, सर्टी फाईड प्रत, प्लॉट चा नकाशा, अश्या असंख्य बाबी खूप काळजीपूर्वक तपासून पाहणे गरजेचे असते तसेच सर्च रिपोर्ट काढून घेणे आवश्यक आहे. काही व्यवहारामध्ये एजेंट वर्ग भ्रमात ठेवतात गोड गोड बोलून तुमचे मन वळवतात की ही प्रॉपर्टी खूप फायदेशीर आहे. तुम्हाला अशी दुसरी मिळणार नाही

खूप गिऱ्हाईक मागे लागले आहेत गाजावाजा झाला तर दुसरं कोणी घेऊन टाकेल अश्या भंपक गप्पा करतात तुम्हीं त्यांच्या बोलण्यावर फसू नका पूर्ण शहानिशा करूनच प्रॉपर्टी खरेदी करा, खरंच प्रॉपर्टी फायदेशीर वाटत असेल तर कमीत कमी रक्कम देऊन नोटरी करून घ्या व नंतर तुम्ही वरील पूर्ण कागद पत्रांची सखोल चौकशी करून प्रॉपर्टी खरेदी करा. कामाचा व्याप असल्याने तहसील भूमिअभिलेख ईतर कार्यालयाचे चक्कर मारणे शक्य नसल्यास हे काम तुम्ही स्वतः न करता ईतर

लोकांकडून चार पाच हजार देऊन कागद पत्रांची जमवा-जमव करून घेऊ शकता किंवा व्यवहारातील त्याच एजेंट कडून या सर्व कागद पत्रांची मागणी करू शकता.लक्षात ठेवा तुमच्या कष्टाचे पैसे कुठेही बुडू नये व फसगत होऊ नये हा आमचा प्रांजळ हेतू आहे, आवश्यक असल्यास ७०५७९११३११ वर संपर्क करून सखोल माहिती घ्या व आपण चिखली तालुक्यात कुठेही प्रॉपर्टी घेण्याचा विचार केला असेल व त्या प्रॉपर्टी संबंधी आवश्यक ती माहिती घेणे असल्यास नक्किच वरील नंबर वर संपर्क करा आम्ही विनाशुल्क मार्गदर्शन करू.

 

-मुख्तार शेख (7057911311)

English Summary: While buying plot, farm and other property, keep the following points in mind
Published on: 27 August 2022, 07:10 IST