ठिबक सिंचन ही एक आधुनिक व शास्त्रीय पद्धत असून या पद्धतीचे फायदे आता सगळ्यांना माहिती आहेत.विविध पिकांच्या बाबतीत ठिबक सिंचनाचा वापर यांमध्ये महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो. तरी या पद्धतीला काही मर्यादा देखील आहेत. काही कारणामुळे ठिबक संच बंद देखील पडू शकतात किंवा त्यांच्या कार्यक्षमतेत व्यतेयनिर्माण होऊ शकतो.
आपल्याला वाटते की ठिबक सिंचन जास्तीत जास्त काळ टिकायला हवा. त्यासाठी आपल्याला काही प्रकारे काळजी घेणे महत्वाचे असते. या लेखात आपण ठिबक सिंचनाची काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती घेणार आहोत.
ठिबक सिंचन वापरतांना घ्यावयाची काळजी
- शेतामध्ये ठिबकसंच बसण्यापूर्वी माती व पाणी याबाबत शास्त्रीयदृष्ट्या पृथक्करण करून घ्यायला हवे.
- पाण्यामध्ये लोहाचे प्रमाण तीन ते चार पीपीएम एवढे असते ते पाणी ठिबक सिंचन करता वापरणे घातक असते. कारण त्यामुळे ठिबकचे ड्रीपर बंद पडू शकतात.असे बंद पडलेले ड्रीपर पुन्हा सुरू करणे अतिशय जिकिरीचे होऊन बसते.
- मुख्य पंपसेट, दाबमापक यंत्रे, खत देण्यासाठीच्या यंत्रणा, पाणी मोजण्याचे मीटर व गाळण यंत्रणा नियमितपणे तपासून घ्याव्यात.
- पाण्यामध्ये असलेल्या मातीचे व क्षारांचे प्रमाण लक्षात घेणे गरजेचे आहे व त्याद्वारा गाळण यंत्रणा स्वच्छ तसेच कार्यक्षम ठेवावी.पाण्याची दिशा उलट मार्गे करून गाळण यंत्रणा स्वच्छ करता येते. गाळन यंत्रणेवर बसवलेल्या दाबमापक यंत्रातीलदाबाचे दहा टक्क्यांपेक्षा जास्त पतन झाल्यास पाण्याची दिशा बदलवून बॅक फ्लशिंग करावे. लहान जलवाहिनीतून थोड्या जास्त दाबाखाली पाणी जाऊ दिल्यानेत्यामध्ये वाळू,माती व इतर केरकचरा निघून जातो.
- ठिबक सिंचन संचाच्या पीव्हीसी किंवा एचडीपिईउपमुख्य नळ व मुख्यनळशक्यतो दीड फुटापर्यंत जमिनीमध्ये गाडावे. असे केल्याने पाइपवर सूर्यकिरणांचा परिणाम होत नाहीव त्याचे आयुष्यमान वाढते.
- एक हंगाम संपल्यानंतर पुढील येणाऱ्या हंगामासाठी ठिबक संच वापरणे अगोदर त्यावर क्लोरीन किंवा मला ची आवश्यकतेनुसार प्रक्रिया करणे फायद्याचे असते. रासायनिक प्रक्रियेद्वारा तयार झालेल्या स्थानासाठी उपाय म्हणून आमलप्रक्रिया करतात. तर जिवाणूमुळे तयार झालेले अडथळे दूर करण्यासाठीक्लोरिन प्रक्रिया करतात.
- आम्ल प्रक्रिया किंवा क्लोरिन प्रक्रिया झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण ठिबक पाण्याने स्वच्छ करून घेणे आवश्यक असते.
- रासायनिक द्रव्य पाण्यामध्ये सोडण्याची साधने ही प्रक्रिया प्रतिबंध पदार्थांपासून बनवलेल्या असाव्यात.
- आमलपाण्यात मिसळण्यासाठी पाण्यात आमल टाकावे.पाणी आमलात टाकू नये.क्लोरीन वायू विषारी असल्याने त्याची हाताळणी माहितगार व्यक्ती ने करणे फायद्याचे असते.
- आठवड्यातून एकदा वाळू गाळणे च्या टाकीचेझाकण उघडावे. त्यातील वाळू हाताने ढवळून काढावी. नंतर बंद करून उलट्या दिशेने पाणी पाठवून त्याची टाकी देखील स्वच्छ धुवून काढावी. टाकी स्वच्छ झाल्याने पाणी उत्तम प्रकारे गाळल्या जाते व तोट्या किंवा उपनळ बंद पडत नाही.
- वाळू फिल्टरच्या प्रक्रियेमध्ये 75 टक्के वाळू असावी. वाळू नसल्यास त्यामध्ये वाळू टाकणे आवश्यक असते.
- जाळीचे फिल्टर उघडून त्यातील गाळणी काढावी.त्यानंतर ती पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी व नंतर बसवावी.
- कोणत्याही पाईप अथवा लेटर मधून पाण्याची गळती होऊ देऊ नये.
- लॅटरलमध्ये तुटली असता ती जॉइंटरच्या साह्याने पुन्हा जोडावे.
- ठिबक संचाद्वारे खते देतांना खतेही पाण्यात 100% विरघळणारी असावीत.
- याद्वारे पिकांना पाणी देताना ते शास्त्रीयदृष्ट्या पाहिजे तेवढेच द्यावे कारण पाणी किती लागेल हे पिकाचे वय व बाष्पीभवन तसेच पीक कोणते आहे यानुसार बदलत असते. म्हणून जे पीक घ्यावयाचे आहे त्याला किती पाणी लागेल यासाठी तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन मिळवावे.
Published on: 26 November 2021, 07:33 IST