ऑक्टोबर महिन्या मध्यावर आला पण अजूनही पावसाने आपला मुक्काम हलवलेला नाही. मागील तीन दिवसांपासून राज्यभरात पावसाने धुमशान घातले आहे. राज्यातून 20 ऑक्टोबरपर्यंत पाऊस पूर्णपणे माघार घेऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातून
पावसाचा परतीचा प्रवास शुक्रवारपासून सुरू झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली.The Meteorological Department informed that the return journey of rain has started from Friday.
वाचा हळद पिकामध्ये कोणत्या रोगांचा प्रादुर्भाव होतो? अणि त्यावरील योग्य उपाय
या काळामध्ये गडगडाटासह महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली.राज्याच्या अनेक भागात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यातून २० ऑक्टोबरपर्यंत पाऊस पूर्णपणे माघार घेऊ शकतो,
असा अंदाज हवामान खात्याने वर्तवण्यात आला आहे.उत्तर महाराष्ट्रात शनिवारपासून पावसाचा जोर कमी होईल. तर दिवाळीदरम्यान मुंबई आणि दक्षिण कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकेल.रम्यान, परतीच्या पावसानं पिकांचं मोठं नुकसान
झालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. सोयाबीन, कापूस, मूग, यासह भाजीपाला आणि द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. परतीच्या या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
Published on: 19 October 2022, 02:58 IST