ज्या जमिनीचा सामु जास्त आहे, मात्र जमिन भारी आहे, अशा जमिनीत युरिया किंवा अमोनियम सल्फेट कशाचा ही वापर हा फायदेशिर ठरतो.
मात्र ज्या जमिनीचा सामु जास्त आहे, तसेच जमिन हलकी आहे अशा जमिनीत युरिया किंवा अमोनियम सल्फेटचा वापर हा जास्तीत जास्त वेळेस विभागुन असा करवा. हि खते सेंद्रिय पदार्थांसोबत एकत्र करुनच द्यावीत.
ज्या जमिनीचा सामु जास्त आहे, अशा जमिनीत अमोनियम सल्फेटचा वापर हा सामु कमी करणे आणि व्होलाटायझेशन कमी करणे यासाठी देखिल फायदेशिर ठरतो कारण अमोनिमय सल्फेट हे कोणत्याही परिस्थितीत 10 ते 14 टक्के ईतकेच व्होलाटायझेशन होते तर युरिया चे व्होलाटायझेशन हे 20 ते 30 टक्के इतके असते.जर ह्युमिक अँसिडचा वापर होणार असेल तर त्यात युरिया विरघळवुन त्याचा वापर करावा. कारण ह्युमिक अँसिडची कॅटायन एक्सचेंज कॅपेसिटी ही फार जास्त असते ज्यामुळे व्होलाटायझेशन तसेच जमिनीतल सामु वाढणे व कॅल्शियम कार्बोनेट तयार होणे, यास काही प्रमाणात प्रतिंबध घालता येईल.स्लरीचा वापर होणार असेल तर त्यात नत्र युक्त खतांचा वापर करुन नये, कारण अशा परिस्थितीत ज्यावेळेस स्लरी ही 7-8 दिवस कुजत राहते त्यावेळेस व्होलाटायझेशन हे वेगाने होते. स्लरीमधे सेंद्रिय स्वरुपातील नत्र हे नैसर्गिक रित्या जास्त असते, त्यामुळे त्यात वरुन नत्र युक्त खते देवुन फायदा नाही.ज्या जमिनीत अर्धवट कुजलेले किंवा न कुजलेले सेंद्रिय पदार्थ असतात अशा जमिनीत व्होलाटायझेशन चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जमिनीच्या थरात केव्हाही अर्धवट कुजलेले पदार्थ गाडु नयेत विशेष करुन तेव्हा जेव्हा शेतात पिक असते, अशा पदार्थांची कुजण्याची क्रिया ही पुर्ण झालेली असल्यानंतरच त्यांचा वापर शेतात करावा.
नत्र युक्त खते
हि जमिनीत काही अंतरावर खोलवर गाडुन अशा प्रकारेच द्यावीत.
नायट्रोजन (युरिया)नायट्रोजन हा हवेतील मुख्य घटक आहे. तो निसर्गात मोठ्या प्रमाणावर मुक्त स्थितीत आढळतो. नायट्रोजन हा रंगहीन वायू असून त्याला वास, चव नसते तो विषारी नाही तो पाण्यात अल्प प्रमाणात विरघळतो नायट्रोजन वायू विषारी नसला तरी अधिक दाबाखाली, माणसाच्या शरीरात गेल्यास वेड्यासारख हसू लागतो. व त्यांच्या १०% वातावरणीय दाबाने बेशुध्दी आणि मृत्यू संभोवतो.
विजा चमकत असताना, वातावरणातील नायट्रोजन आणि ऑक्सिजीन यांचा संयोग होऊन नायट्नीक ऑक्साईड ( छज २ ) तयार होतो. नायट्रोजन डायऑक्साईड पावसाच्या पाण्यात विरघळून नायट्न्स ऑक्साइड ि कछज३ र्े आणि नायट्नीक अॅसिड तयार होतात. ती अत्यंत विरल स्वरूपात पावसाबरोबर जमिनीवर आणली जातात. त्यांची जमिनीवर आम्ल धर्मी पदार्थांशी अभिक्रीया होते आणि शेवटी नायट्रेट क्षार तयार होतात त्याचा वनस्पतींच्या वाढीसाठी उपयोग होतो. वनस्पतिज अन्नातून प्राण्यांना नायट्रोजन मिळतो.
निमकोटेड युरियाचा वापर फायदेशीर
साध्या युरिया पिकांना उपलब्ध होण्याचे प्रमाण कमी असून, त्यावर निमकोटेड युरियाचा वापर फायदेशीर राहू शकतो.
पिकांच्या संतुलित वाढीसाठी नत्र, स्फुरद, पालाश ही अन्नद्रव्ये प्रामुख्याने आवश्यक असतात. त्यातही पिकाच्या सुरवातीपासून वाढीच्या विविध टप्प्यांमध्ये नत्राचा वापर अधिक प्रमाणात होतो. या अन्नद्रव्यांमुळे पीक हिरवेगार, तजेलदार दिसत असल्याने शेतकरी याचा वापर अनेकवेळा अंसुतलित व गरजेपेक्षा अधिक करत असल्याचे आढळले आहे. परिणामी पिकांची वाढ समतोल होत नाही. पिकांची वाढ खुंटते जमिनीचे आरोग्य बिघडते त्याचा दुष्परिणाम पिकांच्या उत्पादनावरही होतो.
युरिया वापरल्यानंतर होणारी प्रक्रिया
युरिया जमिनीत मिसळल्यानंतर त्याचा पाण्याबरोबर संपर्क होताच तो त्वरित विरघळतो त्यातील नत्र पिकांना उपलब्ध होण्याची क्रिया तत्काळ सुरू होते. मात्र, पाण्याचे प्रमाण अधिक असल्यास होणाऱ्या निचऱ्यासोबत जमिनीत खोलवर जातो किंवा प्रवाहासोबत वाहून जातो. परिणामी भूजल किंवा परिसरातील स्रोत प्रदूषित होतात जमिनीवर विरघळण्याच्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजनशी संपर्क झाल्यानंतर त्यातून नायट्रस ऑक्साइड तयार होऊन हवेत निघून जातो. यामुळे वातावरणामध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढले. नत्र या घटकाचा ऱ्हास होऊन, पिकासाठी त्याची उपलब्धता कमी होते. जमिनीतून दिलेल्या एकूण युरियापैकी केवळ ३० ते ४० टक्केच नत्र पिकांना उपलब्ध होते. उर्वरित नत्र हवेत किंवा पाण्यामध्ये मिसळून वाया जाते. यात शेतकऱ्यांचे नुकसान आहे.
युरियाचे दाणे पाहुन गोंधळून जाऊ नका, मोठे दाणे (ग्रॅन्युल्स) पिकासाठी फायद्याचेच.
आजच्या नकारात्मक आणि विरोधी सुरा मुळे काही चांगल्या गोष्टीं समोर ही प्रश्न चिन्ह लागतांना दिसत आहे. त्याचाच एक प्रत्येय आला आहे मध्यप्रदेश मधिल निमच, मन्दसौर, रतलाम येथे या जिल्ह्यातील शेतकर्यांच्याद्वारे काही दिवसापासुन छोट्या दान्यांच्या यूरियाची मांगनी जोर धरत आहे. परंतु भारत सरकार द्वारे शेतीसाठी लाभप्रद वैज्ञानिकां द्वारा प्रमाणित मोठ्या दान्यांचा नीम कोटेड यूरिया विदेशातुन मागवून उपलब्ध केला जात आहे.
शासनाने शेतकर्यांना विनंती करीत म्हटले आहे कि दोन्ही प्रकार चा यूरिया ४६% नत्र देतो.
काय आहे यूरिया चा फाॅर्मूला?
युरिया चार प्रकारच्या वायुंना एकत्र करून बनवला जातो. यूरियाचा रासायनिक फार्मूला "एन.एच.2 सी.ओ.एन.एच.2" (NH2CONH2)आहे. प्रथम N(नाईट्रोजन), H(हाईड्रोजन), C-(कार्बन) व O-(ऑक्सीजन) गैस. या प्रकारे या चार गॅसला मिळवुन यूरिया बनवला जातो. या चार प्रकार च्या वायूं मध्ये नाइट्रोजन हवेतून व बाकी तीन प्राकृतिक गॅस पासून घेऊन, निश्चित मात्रेत मिळवून यूरिया बनवले जातो. ज्याप्रकारे वायूला मुट्ठीत बांधून ठेवल्या जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे यूरियामधिल उपलब्ध वायुंना जमिनीत टाकल्यावर पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर कुणी बांधुन ठेवू शकत नाही. तेव्हा जो यूरिया शीघ्र विरघळेल तो तितक्याच लवकर हवा व पान्यात विरघळून नष्ट होवुन जाईल. मोठ्या दान्यांचा यूरिया देतो २०% अधिक नाइट्रोजनवैज्ञानिकांद्वारे अशा यूरिया पासुन नत्र (नायट्रोजन) हळूहळू पाण्यात विरघळून झाडांना मिळेल व ज्यास्त वेळेपर्यंत मिळेल अशी योजना केली आहे. याकरिता मोठ्या दान्यांचा यूरिया बनवायचा शोध वैज्ञानिकांनी लावला आहे. वैज्ञानिकांचे द्वारा पुर्ण देशात केलेल्या सर्वेक्षणा नुसार हा निष्कर्ष काढला आहे कि मोठ्या दान्यांचा यूरिया छोट्या दान्यांच्या युरिया पेक्षा २०% ज्यास्त नाईट्रोजन पिकांना प्राप्त करून देतो करिता मोठ्या दान्यांचा यूरिया ओलीत पिकासाठी अधिकच लाभप्रद आहे.
युरिया आणि सल्फर- एक जादुई रसायन
शेतकरी बंधूंनो गेल्या कित्येक दिवसापासून रासायनिक खतांचा अतिरिक्त भडिमार करून आपण आपल्या कसदार जमिनी जवळपास नापिकी करून ठेवल्यात आज जमिनीचा ph वाढलाय,पाण्याचा ph वाढलाय. यामुळे दिलेले खते पिकांना लागू होत नाहीये, जवळपास सर्वसाधारण 50% खते आणि त्यावरील खर्च वाया जात आहे. जमिनीची क्षारता वाढत आहे कडक जमिनी तयार होत आहे, पीक आणि उत्पादन खर्चाच्या माँनाने येत नाहीये मग यावर उपाय म्हणजे जमीनचा ph कमी करणे, क्षारता कमी करणे जमीन भुसभुशीत ठेवणे यासाठी प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने उपाय करताना कोणी सलफुरीक, फॉस्फोरीकचा वापर करत आहे, कोणी विविध प्रकारच्या सोईल कंडिशनरचा वापर करत आहे, कोणी सेंद्रिय उत्पादने आणून टाकत आहे, कोणी बॅक्टरीया वाढवत आहे, पाण्याचं नियोजन करून वाफसा आणत आहे असे एक ना अनेक प्रकारचे उपाय करत असताना एक अतिशय सहज सोपा आणि गुणकारी हितकारी उपाय म्हणजे युरिया आणि सल्फर एकत्र वापर करणे होय
काय होते यामुळें?
युरिया एकरी 3 किलो आणि सल्फर 3 किलो एकत्र केल्याने त्याचे रूपांतर युरेट ऑफ सल्फर ह्यामध्ये होते आणि हा द्रव्य जमिनीत अनेक प्रकारचे काम करायला लागतो
जमीन साफ करणे-जमिनीतील अतिरिक्त क्षार नको असलेले घटक यांना साफ करण्याचे काम होतें
मुळीला नवीन चाल किंवा गती मिळते, मुळी अक्टिव्ह होतें
अन्नद्रव्य उचलायला मदत मिळते
बॅक्टरीया किवा सेंद्रिय वस्तुंना अडथळा होत नाही
युरियामध्ये नत्र असले तरी सल्फर सोबत एकत्रित आल्याने अतिरिक्त नत्र वाढत नाही
नत्राचा वापर किंवा गरज ही पाहिल्यापासून तर शेवटपर्यंत लागते पिकाला ती गरजही थोडयाफार प्रमाणात भागते
युरिया दिल्यानंतर 3 आठवड्यात बहुतांश युरिया हा अशा प्रकारे वाया जातो तसेच युरिया दिल्यानंतर जमिनीचा पीएच देखिल त्या तेवढ्या भागापुरता वाढतो._
युरिया दिल्यानंतर 3 आठवड्यात बहुतांश युरिया हा अशा प्रकारे वाया जातो तसेच युरिया दिल्यानंतर जमिनीचा पीएच देखिल त्या तेवढ्या भागापुरता वाढतो._
CO(NH₂)₂ (Urea ) + H⁺ + 2H₂O------> 2NH₄⁺ + HCO₃⁻ (Hydrolysis – युरिएज Urease या एन्जाईम मुळे होते)
युरियाचे हायड्रोलिसीस झाल्यानंतर तयार झालेला बायकार्बोनेट (HCO₃⁻) हा जमिनीतील कॅल्शियम सोबत क्रिया होवुन कॅल्शियम कार्बोनेट तयार करते (CaCO₃), तसेच ह्या क्रियेत हायड्रोजन (H⁺) मुक्त होवुन सामु वाढण्यास प्रतिबंध देखिल होतो. त्यामुळे ज्या जमिनीत कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते अशा जमिनीत युरियामुळे सामु बदलास अटकाव घातला जातो. मात्र सततच्या युरियाच्या वापराने कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण देखिल वाढते. तरीदेखिल ज्या जमिनीचा सामु हा जास्त आहे अशा जमिनीत युरिया दिल्याने युरियाची उपलब्धता कमी होणे, सामु वाढणे या दोन क्रिया घडतात. ज्यावेळेस जमिनीत पाणी कमी असते तसेच जास्त तापमान असते त्यावेळेस हि क्रिया झपाट्याने होते.
श्री शिंदे सर
9822308252
Published on: 13 November 2021, 08:57 IST