Agripedia

आधुनिक व तांत्रिक शेती करत असताना पारंपरिक शेती चे काही अनुभव असल्यास आजदेखील त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच होईल,

Updated on 02 April, 2022 8:54 PM IST

आधुनिक व तांत्रिक शेती करत असताना पारंपरिक शेती चे काही अनुभव असल्यास आजदेखील त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच होईल, यात काही तिळमात्र शंका नाही. ज्याप्रमाणे शेती च तंत्र बदलत आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने निसर्ग बदलत चाललेला आहे. निसर्गावर मात करण्यासाठी नवं नविन प्रयोग करून आज प्रत्येक शेतकरी वेगवेगळे प्रयत्न करून आधुनिक तर्हेने पिकं उत्पादन घेण्याचे स्वप्न बघतो आहे, पण या क्षेत्रात आपल्या मनासारखं काहीच होत नाही.हे लक्षात ठेवा

याचे कारण म्हणजे आपन शेती आधुनिकीकरणावर दिलेला भर हे होय. असे करून काहीच चालणार नाही राव 

या मध्ये थोडा बदल करून शेतीसाठी लागणाऱ्या जैविक व सेंद्रिय घटकांच्या कार्यशैलीची जाणीव करून घेऊन त्यांचा पीक उत्पादनात उपयोग करावा लागेल

आपल्या पिक उत्पादन वाढीचा करावा लागणारा खर्च कमी होऊन नफ्यात वाढ होईल. 

त्याच बरोबर आपल्या जवळ जानावरे असावी लागता व एखादं गांडूळ खत युनिट तयार करावे. गोमूत्र साठवणूक टाकी असावी.जीवामृत तयार करण्यासाठी टाकी असावी.

 आपल्या शेती मध्ये मधमाश्यांच्या पेट्या लावाव्यात

जैविक बुरशींचा अभ्यास असावा व त्याच बरोबर.पिवळे व निळे चिकट सापळे आणि प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.कामगंध सापळे वापरावेतशेतात वापरली जाणारी जैविक खते व औषधे साठवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षित थंड जागेची उपलब्धता असणे.खास करून माती परीक्षणानुसार सुपीकतेचा अभ्यास करूनच सुधारित वाणांची निवड करावी.सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा.पिकास ठरवून दिलेल्या मात्रेतच खतांचा वापर करावा. त्याच बरोबर दुसऱ्याच्या शेतामधील पाणी आपल्या शेतात आलेनाही पाहिजे ही खबरदारी घ्यावी

कारण पाण्याद्वारे आपल्या शेतात केमिकलचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.वापरण्यात येणारे पाणी देखील शुद्ध आहे कि नाही? याची चाचणी करूनच पाण्याचा वापर करावा.शेणखताचा वापर करावयाचा झाल्यास त्यात कुठल्याही केमिकलचे अंश आहेत कि नाही? याची खात्री करावी.गोठ्यामध्ये जनावरे व गोठा स्वच्छ करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या केमिकलचा वापर करू नये.वापरण्यात येणारी सैंद्रिय, जैविक उत्पादने व इतर क्षेत्रासाठी वापरावयाची औषधे वेगळी ठेवावीत.गटारीच्या पाण्याचा वापर कोणत्याही परिस्थितीत करू नये.फवारणी करताना पंप स्वच्छ आहे कि नाही, याची खात्री करून घ्यावी.सैंद्रिय खते वापरताना १००% सैंद्रिय आहेत कि नाही, याची खात्री करूनच वापरावीत. शक्यतो गांडूळ खताचा वापर करावा.शेताच्या कडेला मित्रकिडी आकर्षित होतील अशी छोटी मोठी झाडे लावावीत.बागेत सापळा पिकलागवड करावी.

मुळकुज या रोगनियंत्रणाकरित जैविक बुरशीनाशके सोडावीत.वापरण्यात येणारा काडीकचरा कुजवून कंपोस्ट करून वापरावा.कीडनियंत्रणासाठी शक्यतो जीवमृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्काच्या वापरावर भर द्यावा

उत्पादनवाढीसाठी खालील तंत्राचा वापर करा रस रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होताच कीडनियोजन करा.

पिकास शुद्ध पाणीपुरवठा होण्यास प्रथम प्राधान्य द्या.

अतिपाण्याचा वापर टाळा.शेतातील पिकाचे अवशेष शेतातच गाडा.शून्य मशागत तंत्राचा वापर करा.शेतात गांडूळ खत, शेणखत, कंपोष्ट खतांचा वापर करा व शेतात मोठ्या संख्येने गांडुळांचे संगोपन करा.शेणखतांचा वापर करताना हुमनीची लागण झालेल्या खतांचा वापर टाळा.फुलपाखरे व मधमाशी यांच्या मदतीने परागीभवनाचे काम योग्य दिशेने कसे चालेल याकडे लक्ष द्या.पिकांचे सुयोग्य नियोजन करा.

छोट्या किटकांचे नियंत्रण मिळवण्याकरिता वेगवेगळ्या रंगाच्या सापळ्यांचा उपयोग करा.

तणनियंत्रण करतेवेळी तणनाशकाचे अंश पिकावर पडणार नाही, याची घ्यावी.

 

Mission agriculture soil information

Milind j gode

विचार करा आणि जाणून घ्या शेती च तंत्र 

English Summary: When doing modern farming, apply these traditional farming techniques to reduce the cost of farming
Published on: 02 April 2022, 08:48 IST