भारतात आपल्याला ज्ञात आहे की, शेती ही तीन हंगामात केली जाते. खरीप हंगामातील लागवड आपटली आहे आणि त्याचे पिक काढणीसाठी सज्ज झाले आहे तसेच देशात आता रब्बी हंगामाला सुरवात होणार आहे. शेतकरी आता वावरात रबीची पिके पेरण्यासाठी तयारी करत आहेत. गहु हे रब्बी हंगामातील एक प्रमुख पिक आहे आणि गव्हाची लागवड ही संपूर्ण देशात भल्या मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रात देखील रब्बी हंगामातील गव्हाचे क्षेत्र लक्षणीय आहे. तसेच ह्यावर्षी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे ह्या वर्षीच्या रबी हंगामतील गव्हाच्या उत्पादणासाठी सरकारने हमीभावात वाढ केल्याची बातमी समोर येत आहे.
सरकारने जवळपास गहुचा हमीभाव हा 40 रुपयानी वाढवल्याची बातमी प्रसारमाध्यमातून समोर येत आहे. आता गव्हाचा हमीभाव हा 2051 रुपये क्विंटल एवढा होणार आहे, ह्याआधी हा भाव 2011 प्रति क्विंटल एवढा होता.
मित्रांनो कोणत्याही पिकाची उत्पादन क्षमता आणि गुणवंत्ता ही त्या पिकाच्या बियाण्यावर सर्वस्वी अवलंबून असते. जर त्या पिकाची वाण किंवा जात ही सुधारित असेल तर त्यापासून मिळणारे उत्पादन हे अधिक असते शिवाय त्याची गुणवत्ता चांगली असते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो आणि उत्पन्नात अधिक भर पडते. बियाणे जर दर्जेदार असेल तर पिकाची गुणवंत्ता सुधारते, उत्पादन अधिक मिळते, पिकांमध्ये रोग कमी लागतात, लागवडीसाठी किंवा पेरणीसाठी येणारा खर्च हा कमी होतो आणि त्यातून शेतकऱ्यांचे आर्थिक हित होते.
शेतकऱ्यांच्या हितासाठी उत्तर प्रदेश राज्यातील मेरठ मधील मोदीपुरम येथील सरदार वल्लभभाई पटेल कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ ह्यांनी गव्हाच्या सुधारित जाती विकसित केल्या आहेत. ह्या जाती जरी उत्तर प्रदेश राज्यासाठी विकसित केल्या गेल्या असल्या तरी वैज्ञानीकांचा सल्ला घेऊन त्या देशाच्या इतर भागात देखील पेरल्या जाऊ शकतात. एवढेच नाही तर कृषी विद्यापीठाणे ही बियाणे विक्रीची देखील व्यवस्था केली आहे.
विद्यापीठाच्या नोडल बियाणे अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, गव्हाची लागवड करणारे शेतकरी, शेतकरी उत्पादक संघटना (FPOs), स्वयंसेवी संस्था, बचत गट, सरकारी संस्था, कृषी विभागाचे अधिकारी आणि कृषी विज्ञान केंद्र यांना कृषी विद्यापीठाच्या गव्हाचे बियाणे संदर्भात माहिती देण्यात आली आहे. 1 नोव्हेंबरपासून बियाणे विक्री केंद्रावर विक्रीसाठी उपलब्ध होतील. या केंद्रांवर गव्हासह मोहरीचे बियाणेही विक्रीसाठी उपलब्ध असतील.
गहू आणि मोहरीचे पायाभूत बियाणे बियाणे केंद्रांवर उपलब्ध असतील. गव्हाचे फाउंडेशन बियाणे DBW 187, DBW 222, HD 3226, DBW 173, DBW 71, DBW 99, WB 02 आणि PBW 226 येथे खरेदी करता येथील.
गव्हाच्या नवीन वानांची किंमत
DBW 187, DBW 222 आणि HD 3226 या नवीन गव्हाच्या वाणांचे पायाभूत बियाणे 50/किलो दराने खरेदी करता येतील. इतर गव्हाच्या जाती DBW 173, DBW 71, DBW 90, WB 02 आणि PBW 226 च्या पायाभूत बियाण्याची किंमत 45 रुपये प्रति किलो ठेवण्यात आली आहे. गव्हाचे बियाणे हे 20 आणि 40 किलोग्रामच्या पॅकिंग मध्ये उपलब्ध आहेत.
Source news18
Published on: 17 October 2021, 09:37 IST