Agripedia

भारतात सर्वत्र मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पादन घेतले जाते. देशात पंजाब हरियाणा या राज्यात मोठ्या प्रमाणात गव्हाची शेती (Wheat Farming) केली जात असून आपल्या राज्यातही गव्हाची शेती विशेष उल्लेखनीय आहे. गहू हे रबी हंगामातील (Rabbi Season) एक मुख्य पीक (Rabbi Crop) आहे.

Updated on 28 April, 2022 2:47 PM IST

भारतात सर्वत्र मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पादन घेतले जाते. देशात पंजाब हरियाणा या राज्यात मोठ्या प्रमाणात गव्हाची शेती (Wheat Farming) केली जात असून आपल्या राज्यातही गव्हाची शेती विशेष उल्लेखनीय आहे. गहू हे रबी हंगामातील (Rabbi Season) एक मुख्य पीक (Rabbi Crop) आहे.

भारत गहू उत्पादनाच्या बाबतीत जगात शीर्षस्थानी विराजमान आहे. गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी शासनाद्वारे तसेच कृषि शास्त्रज्ञद्वारे नेहमीच वेगवेगळे प्रयोग केले जातात. आता नुकताच कृषी शास्त्रज्ञांनी (Agricultural scientists) असाच एक प्रयोग करीत गव्हाची एक खास आणि अनोखी जात (New Wheat Variety) विकसित केली आहे.

या जातीचा गहू चवीसाठी सर्वोत्कृष्ट असल्याचा वैज्ञानिकांनी दावा केला आहे. या जातीच्या गव्हाचे पीठ रोटीची चव बदलेल आणि ती कडक नाही तर मऊ होईल. कृषी शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या या गव्हाच्या जातीमुळे देशातील बहुसंख्य शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.

Important News :

लिंबाची शेती ठरली शेतकऱ्यासाठी वरदान!! लिंबाच्या शेतीतून कमविले लाखो

मेहनत केली पण वाया नाही गेली!! पुरंदरचे अंजीर युरोपात दाखल

अनेक राज्यासाठी गव्हाची ही जातं विशेष फायदेशीर ठरेल, कारण की, भारतात सर्वाधिक गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या चपातीचे सेवन केले जाते. गहू प्रथिने आणि कॅलरीजचा स्वस्त आणि प्राथमिक स्त्रोत आहे. तसेच, हे उत्तर पश्चिम भारतात मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते आणि देशाच्या इतर भागांमध्ये देखील याचे सेवन केले जाते.

या जातीच्या गव्हापासून मऊ आणि गोड चपात्या तयार होणार असल्याचा संशोधकाचा दावा आहे. 'PBW-1 चपाती' (PBW-1 Chapati) नावाची ही गव्हाची जात पंजाबमध्ये राज्य स्तरावर सिंचनाच्या परिस्थितीत वेळेवर पेरणीसाठी जारी करण्यात आली आहे.

गव्हाच्या या जातीची शेती व्यावसायिकदृष्ट्याही फायदेशीर ठरणारं असल्याचे शास्त्रज्ञांनी नमूद केले आहे. निश्चितच गव्हाची ही जात भारतीय लोकांसाठी फायदेमंद ठरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसमवेतच सामान्य नागरिकांना देखील मोठा फायदा होणार आहे.

English Summary: Wheat Variety: Scientists Develop New Wheat Variety; Wheat growers will benefit greatly
Published on: 28 April 2022, 02:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)