Agripedia

महाराष्ट्रातील कुंदेवाडी ता. निफाड( नाशिक) येथील कृषी संशोधन केंद्रावर असलेल्या अखिल भारतीय कृषी समन्वय प्रकल्पांतर्गतगहू पिकाच्या विविध वाणांच्या संदर्भात संशोधन सुरू असते.आता कुंदेवाडी कृषी संशोधन केंद्राने बिस्किटा साठी उपयुक्त आणि कमी पाण्यात चांगले देणाऱ्या गव्हाचा फुले सात्विकवाण विकसित केला आहे.

Updated on 08 July, 2021 8:58 AM IST

 महाराष्ट्रातील कुंदेवाडी ता.  निफाड( नाशिक) येथील कृषी संशोधन केंद्रावर असलेल्या अखिल भारतीय कृषी समन्वय प्रकल्पांतर्गतगहू पिकाच्या विविध वाणांच्या संदर्भात संशोधन सुरू असते.आता कुंदेवाडी कृषी संशोधन केंद्राने बिस्किटा साठी उपयुक्त आणि कमी पाण्यात चांगले देणाऱ्या गव्हाचा फुले सात्विकवाण विकसित केला आहे.

 या वाणाच्या संदर्भातील चाचणी आहे 2016 ते 19 दरम्यान घेण्यात आल्या होत्या. या वाणास अखिल भारतीय गहू संशोधकांच्या बैठकीत शिफारस केल्यानंतर केंद्र सरकारच्या केंद्रीय वान प्रसारण समितीच्या बैठकीत हा वाण प्रसारित करण्याची मान्यता देण्यात आली आहे. यातील पहिला भाग म्हणजे उत्तर पश्चिमी मैदानी प्रदेश यात पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश ही मुख्य राज्य येतात. तसेच दुसरा भाग म्हणजे द्वीपकल्पीय विभाग  या विभागात महाराष्ट्र आणि कर्नाटक ही राज्ये येतात आता याचे उत्पादन घेतल्या सुधारित वाण सहज उपलब्ध होणार आहे.

 फुले सात्विक वानाचे ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे

1-फुले सात्विक वनात प्रथिनांचे प्रमाण हे 11 ते 12 टक्के असते.

2- या गव्हाच्या दाण्याचा कडकपणा फक्त 28 टक्के आहे. तर सर्वसाधारण गव्हा मध्ये तो 75 ते 80 टक्के असतो.

3- बिस्किट स्प्रेड मानक दहापेक्षा जास्त

4-

याचा ब्रेड गुणवत्ता स्कोर 7.0 ते 7.5 आहे.

5-याची पाणी शोषण्याची क्षमता 55 टक्के पेक्षा कमी आहे.तर खाण्याच्या गावांमध्ये पाणी शोषण्याची क्षमता 60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असते.

6- या वाणाच्या पिठाची विस्तार क्षमता इतर सर्व वाणांपेक्षा जास्त आहे.

7- याचा ग्लुटेन इंडेक्स 80 ते 85 टक्के आहे. लोह 35 ते 40 टक्केआहे. झिंक तीस ते पस्तीस टक्के आहे.

English Summary: wheat species fule satwik
Published on: 08 July 2021, 08:58 IST