भारतात गव्हाची लागवड खूप मोठ्या प्रमाणात करण्यात येते, राज्यात देखील याची लागवड लक्षणीय आहे. राज्यात अवकाळी व त्यानंतर बदललेल्या हवामानामुळे अनेक पिकांवर रोगराईचे सावट दिसत आहे, सध्या राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. या वातावरणाचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसताना दिसत आहे. रब्बी हंगामातील सर्वात महत्त्वाचे पीक म्हणजे गव्हाचे पीक या पिकाला देखील ढगाळ वातावरणाचा खूप मोठा फटका बसलेला दिसत आहे या बदललेल्या वातावरणामुळे गव्हाचे पीक हे पिवळे पडू लागले आहे.
गहू उत्पादक शेतकरी गव्हाचे पीक पिवळे पडत आहे म्हणून खूप हैराण झाले आहेत, आधीच खरीप हंगाम पुरता शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे त्यामुळे रब्बी हंगामात खरीप हंगामाची भरपाई काढण्याचा शेतकऱ्यांचा मानस आहे, पण जर असे वातावरण राहिले तर रब्बी हंगामात देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. गव्हावर आलेले हे पिवळे संकट दूर करण्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे ठरले आहे.
कृषी वैज्ञानिकांचे मते गव्हाचे पिवळे पडणे हे दोन प्रकारचे असू शकते. अनेकदा गव्हाचे फक्त पाने पिवळी पडतात आपल्याही गव्हात फक्त गव्हाचं पानेच पिवळे पडले असतील तर याचे कारण थंडी व त्यामुळे निर्माण झालेले धुके असते. अशा परिस्थितीत गव्हाच्या पानांना हात लावल्यास पिवळी पावडर हाताला लटकते, जर असे असेल तर हे गव्हाच्या पिकासाठी घातक ठरू शकते व याचा परिणाम सरळ उत्पादनावर देखील होऊ शकतो. वैज्ञानिकांच्या मते जर अशा प्रकारचे पिवळेपण आपल्या गव्हावर असेल तर कडक ऊन पडताच हे निघून जाईल. तरी देखील कृषी वैज्ञानिकांनी असे पिवळे पण असेल तर गव्हाच्या पिकाला युरिया टाकण्याचा सल्ला दिला आहे, तसेच युरिया सोबत झिंक सल्फेट मारण्याचा देखील कृषी वैज्ञानिकांनी सल्ला दिला आहे.
रब्बी हंगामातील गहू तसे बघायला गेले तर चांगल्या परिस्थितीत आहेत याचे प्रमुख कारण म्हणजे गव्हासाठी चांगल पोषक वातावरण निर्माण झाले आहे. गव्हाची पाने पिवळी पडणे वातावरणातील बदल यामुळे झाले आहे, तसेच कृषी वैज्ञानिकांचे मते हा कुठल्याही प्रकारचा रोग नाही हे प्रामुख्याने गव्हात झिंकची कमतरता असल्याचे लक्षण आहे, जेव्हा गव्हाची पेरणी केली जाते तेव्हा जमिनीत झिंक टाकण्याचा सल्ला कृषी वैज्ञानिक देतात. एकरी दहा किलो झिंक हे प्रमाण घेऊन पेरणीच्या वेळेस झिंक लावण्याचा सल्ला दिला गेला आहे. सध्याच्या परिस्थिती साठी अर्धा किलो झिंक आणि अडीच किलो युरिया यांचे एकत्रित द्रावण तयार करून पिकाला फवारणी करण्याचा सल्ला कृषी वैज्ञानिकांनी दिला आहे.
Published on: 21 December 2021, 12:11 IST