Agripedia

सलाम किसानच्या मदतीने भारतातील शेतकऱ्यांना एकंदरीत ज्ञान

Updated on 16 December, 2022 4:57 PM IST

सलाम किसानच्या मदतीने भारतातील शेतकऱ्यांना एकंदरीत ज्ञान वाढवून कृषी ज्ञानाबरोबरच आर्थिक बाबीने ही श्रीमंत करण्याचा मानस धनश्री मानधने या भारतीय तरुणीचा आहे. मानधने या तरुणी भारतातून अमेरिकेत शिक्षणासाठी गेले असता त्यानंतर अचानक भारतीय शेतकऱ्यांबद्दलचा आदर आणि अस्तित्वाविषयी भावना जागृत झाल्या. आणि त्यानंतर धनश्री मानधने या तरुणीने ठरवले की

भारतीय शेतकऱ्यांना आज कृषी विषयक ज्ञानाची खूप मोठी गरज आहे Indian farmers today have a great need for agricultural knowledge आणि त्या माध्यमातून या तरुणांनी सलाम किसान नावाच्या कृषी ज्ञान भंडार असलेले पोर्टल चालू केले. या अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीविषयक खडाणखडा माहिती मिळणार त्यामध्ये प्रामुख्याने मातीनुसार पिके कोणती घ्यावीत त्या पिकांचे नियोजन कसे करावे? वातावरणाानुसार पिके कोणती घ्यावी वातावरणानुसार नियोजन कसे करावे? आज भारतामध्ये शेतीसाठी वेगवेगळे

भौगोलिक क्षेत्र आहेत त्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कोणती पिके कोणते घ्यावीत अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन तथा माहिती उपयुक्त असणार आहे. सातत्याने हवामान अंदाजद्वारे शेतकऱ्याला दररोज बदलणाऱ्या हवामान अंदाजाबाबत माहिती मिळेल, पीक दिनदर्शिकाद्वारे शेतकऱ्याला पिकांबद्दल लागवडीपासून तर काढणीपर्यंत संपूर्ण माहिती मिळेल, कमी वेळेत व कमी खर्चात मातीचे परीक्षण करता येणार, ड्रोनमुळे शेतात फवारणी करणे सोपी

होईल, कीड व रोग शोधून त्यावर नियंत्रण करता येईल, शेतीबद्दल वेळोवेळी कृषी तज्ज्ञानंचा सल्ला घेता येणार, शेतकऱ्याला बाजारा बद्दल तसेच दररोज बदलणाऱ्या बाजार भावाबद्दल माहिती मिळेल, दळणवणासाठी लागणाऱ्या वाहतुकीचा प्रश्न मिटेल, आता दररोज घडणाऱ्या कृषी क्षेत्रातील बातम्याबद्दल माहिती मिळेल, सलाम किसान शॉपद्वारे आता शेतीसाठी लागणारी सर्व उत्पादने एकाच जागेवर मिळेल आणि वित्त आधार मिळून देण्यासाठी मदत करेल. अश्याप्रकारे सलाम किसानचा शेतकऱ्याला शेतीसाठी फायदा होणार.

 

(गोपाल उगले)

English Summary: What magic will Salam Kisan do for farmers? Know, Indian farmers will now be rich with agricultural knowledge
Published on: 16 December 2022, 04:57 IST