Agripedia

ट्रायकोडर्मा ही जमिनीत आढळणाऱ्या अनेक उपयुक्त बुरशींपैकी एक नैसर्गिक बुरशी आहे.

Updated on 28 May, 2022 2:41 PM IST

याच्या विरिडी, हर्जानियम अशा अनेक प्रजाती आहेत. या बुरशीचे वैशिष्ट्ये म्हणजे जमिनीत ही बुरशी अत्यंत वेगाने वाढते आणि दुसऱ्या कोणत्याही रोगकारक (फायटोफ्थोरा, फ्युजारियम, पिथियम, rizoctonia इत्यादी) बुरशीना वाढू देत नाही. या तंत्र प्रणालीचे कारणे अशी.१) इतर बुरशीच्या तुलनेत जलद वाढ होते २) ही बुरशी वाढत असताना काही संप्रेरके तयार होता असतात, त्यामुळे हानिकारक बुरशीचा नायनाट होतो.३) यातील काही संप्रेरके पीक वाढीला पोषक म्हणून मदत करतात (याला बायोप्रायमिंग असे म्हणतात).४) ही बुरशी सेंद्रिय पदार्थ म्हणजे शेणखत, पाला पाचोळा यावर वाढते.

Tricoderma कोणत्या स्वरूपात उपलब्ध होतो?द्रवरूप आणि भुकटी दोन्ही स्वरूपात उपलब्ध असतो.कोणत्या पिकांना व रोगांवर काम करतो?चिकू, आंबा, नारळ, डाळींब, द्राक्ष, लिंबूवर्गीय सर्वच फळपिके, इतर भागात होणारी सर्व फळे व यांना होणारा रोग जसे मूळकुज, फळकुज, फळे काळी पडणे. सर्व प्रकारचा भाजीपाला उदा. मिरची, वांगी, वेलवर्गीय भाज्या यांना होणारा मूळकूज, शेंडामर रोग ई. तसेच मोगरा, सोनचाफा, जाई, झेंडू इ. फुलपिके.कसा वापर करावा?१) फळपिकांना वर्षातून एक किंवा दोन वेळा जमिनीतून द्यावा. प्रमाण एक एकर साठी २ लिटर

२) भाजीपाला व एक वर्षीय फुलपिकांना रोपे लागवड करताना मुळे बुडवून किंवा लागवड झाल्यावर पाण्यासोबत आळवणी करून द्यावे. एक महिन्याच्या अंतराने दोन वेळा द्यावे. मर रोग येत नाही.३) पोलीहाऊस मधील सर्व पिके प्रमाण: एक एकर साठी 2 लिटर आळवणी करताना 10 लिटर पाण्यात 100 मिली वापर कसा करावा 1) फळबागेला देताना एक एकर साठी २०० किलो कंपोस्ट खत घ्यावे, त्यात २ लिटर tricoderma व थोडे पाणी टाका. आठ दिवस सावलीत राहू द्या. यावेळी या बुरशी ची वाढ होते.नंतर Tricoderma मिश्रित कंपोस्ट खत सर्व जमिनीवर टाकून द्या.

2) भाजीपाला लागवड झाल्यानंतर पहिल्या आठ दिवसात एकरी २ लिटर Tricoderma २०० लिटर पाण्यात टाकून प्रत्येक रोपाच्या मुळाजवळ हे द्रावण ५० ते १०० मिली द्यावे.किंवा drip system ने द्यावे.केव्हा द्यावे?पावसाळ्याच्या सुरुवातीला द्या, जेव्हा जमिनीत ओलावा आहे. उन्हात जमीन तापली असते तेव्हा देऊ नये.Trichoderma हे रोग येण्याआधीच वापरावे. रोग आल्यानंतर रासायनिक बुरशी नाशकाचा वापर करावा.ट्रायकोडर्मा हवा असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा.9503537577 (गोपाल उगले) 

 

लेखक - श्री संजय पाचकवडे

पीक संरक्षण तज्ञ

कृषी विज्ञान केंद्र, अमरावती , घातखेड , जिल्हा अमरावती 

English Summary: What is Trichoderma? Learn why
Published on: 28 May 2022, 02:41 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)