Agripedia

सेंद्रिय शेती/कुजणाऱ्या पदार्थांच्या वापराचे महत्त्व आता सर्वांनाच समजत आहे.

Updated on 27 August, 2022 7:37 PM IST

सेंद्रिय शेती/कुजणाऱ्या पदार्थांच्या वापराचे महत्त्व आता सर्वांनाच समजत आहे. परंतु अशा कुजणाऱ्या खतांतून निर्माण होणाऱ्या ह्युमस (ह्युमिक ॲसिड) निर्मितीची प्रक्रिया हळू किंवा मंद असते. त्याशिवाय माती, पाणी, हवा या घटकांचा अधिक प्रभावीपणे वापर शेतीमध्ये करणे शक्यच होत नाही. अशा परिस्थितीत यासर्व घटकांचा पुरेपुर वापर होण्यासाठी ह्युमस / पोटॅशियम ह्युमेट-98% (ह्युमिक अँसिड) चा वापर करणे अत्यावश्यक आहे. 

ह्युमस' म्हणजे काय?ह्युमस म्हणजे सेंद्रिय घटक म्हणजेच पालापाचोळा, जनावरांची विष्टा, शेतातील इतर सेंद्रिय पदार्थ यांच्या विघटनातुन तयार होणारा पदार्थ आहे.It is a substance produced by the decomposition of other organic matter in the field.  हा पदार्थ म्हणजे अनेक सेंद्रिय घटकांचे मिश्रण असुन हे पिकांच्या सर्वांगिण वाढीसाठी अतिशय आवश्यक आहे.पोटॅशियम ह्युमेट किंवा ह्युमिक ॲसिड' म्हणजे काय?पोटॅशियम ह्युमेट-98% (ह्युमिक ॲसिड) हे खत नसुन यात अतिशय अल्प प्रमाणात सुक्ष्म व मुख्य अन्नद्रव्ये असुन मातीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारणारे भुसुधारक आहे. हे नुसतेच मानवनिर्मीत नसुन पुर्णपणे 'लिग्नाइट' (दगडी कोळसा) आधारीत

नैसर्गिक पदार्थ आहे. पोटॅशियम ह्युमेट-98%(ह्युमिक अँसिड) मध्ये कार्बनचे प्रमाण अधिक असुन हायड्रोजन अतिशय अल्प प्रमाणात असतो. तसेच त्यात ४% पर्यंत नत्र असते.पोटॅशियम ह्युमेट-98%(ह्युमिक ॲसिड) हे मुख्य करुन पावडर, दाणेदार तसेच द्रवरुपातही वापरता येते.पोटॅशीयम ह्युमेट-98% (ह्युमिक अँसिड) चे फायदे कोणते आहेत.• ह्युमिक अँसिडमुळे मातीची रचना सुधारते तसेच पिकाची नत्र, स्फुरद, पालाश शोषण्याची क्षमता ही सुधारते.

• फायदेशिर नत्र स्थिरिकरण क्षमतेला चालना देऊन मातीतील नत्राची कमतरता भरुन काढते. याचाच परिणाम म्हणून त्या मातीतील पीक सशक्त, हिरवे व टवटवीत रहाण्यास मदत होते.• ह्युमिक अँसिडचा वापर केल्यास पिकांसाठी आवश्यक असणा-या बुरशींची वाढ होऊन ह्या बुरशीमुळे मातीपासुन उद्भवणारे रोगांपासुन संरक्षण मिळण्यास मदत होते.• ह्युमसयुक्त मातीमधील जलधारण क्षमता साधारण मातीच्या सातपट अधिक असते म्हणुनच दुष्काळयुक्त भागात ह्युमिक अँसिडचा वापर खुप महत्वाचा आहे.

• जमिन हलकी होउन त्यात हवा खेळती राहते व पांढऱ्या मुळांची वाढ झपाट्याने होते. याच्या वापरामुळे जमिनीतील स्फुरद, कॅल्शिअम, लोह यांचे उपलब्ध रुप तयार होते व पिकास हि अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरुपात मिळतात.• ह्युमिक ॲसिडच्या वापरामुळे जिवाणुंना कार्बन पुरविला जातो व त्यामुळे जिवाणुंची संख्या वाढते.• पोटॅशियम ह्युमेट-98% (ह्युमिक ॲसीड) मुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता व उपलब्धता ३०%

पर्यंत वाढते. त्यामुळेच रासायनिक खतांसोबत याचा वापर केल्यास खर्चात बचत होते व दिलेली खते वाया जात नाहीत.सर्वात महत्वाचे म्हणजे पिकांच्या पांढ-या मुळींची वाढ जलद होत असल्यामुळे पिकांचे पोषणमुल्य वाढते.हे पुर्णपणे सेंद्रिय असल्यामुळे याच्या अतिवापरामुळे जमीनीवर कोणताही दुष्परिणाम होत नाही.

 

संकलन - पंकज काळे (M.Sc. Agri), निसर्ग फाऊंडेशन, अमरावती

संपर्क - ९४०३४२६०९६, ७३५०५८०३११

English Summary: What is potassium humate-98%' and why should it be used in agriculture?
Published on: 27 August 2022, 07:37 IST