Agripedia

मायकोरायझा म्हणजे वनस्पतीच्या मुळांवर वाढणारी,

Updated on 09 November, 2022 7:58 AM IST

मायकोरायझा म्हणजे वनस्पतीच्या मुळांवर वाढणारी,आणि डोळ्यांना स्पष्ट दिसणारी मोठ्या आकाराची बुरशी असे आपण म्हणु शकतो. पिकाच्या मुळांवर वाढुन हि बुरशी एक प्रकारे मुळांचा विस्तार वाढवत असते, ज्यामुळे पिकांना जास्त प्रमाणात अन्नद्रव्ये ग्रहण होते.ह्या वर्गातील बुरशींना व्हॅस्क्युलर अर्ब्युस्कुलर मायकोरायझा म्हणजेच व्हॅम असे देखिल म्हणतात. ह्या बुरशी पिकांच्या मुळांच्या वर वाढतात.पिकाच्या

मुळांत असलेल्या पेशींच्या आत ह्या बुरशी शिरत नाहीत तर पेशी भित्तिकेच्या आत वाढतात.These fungi do not enter the cells in the roots but grow inside the cell wall. त्या ठिकाणी ह्या बुरशी काहीशा

पिकांवर "तेल फवारणी" : पद्धती, वैशिष्ट्ये व परिणामकारकता

फुग्याच्या आकाराची वाढ करतात तर काही वेळेस अनेक फांद्या उप फांद्या असल्या सारखी वाढ करतात.मायक्रोरायझा एक उपयुक्त बुरशी आहे जी मातीपासून पोषक द्रव्ये कॅप्चर करुन व्हॅस्क्युलर झाडांच्या मुळांना प्रवेश करते. हे बुरशी वैज्ञानिकदृष्ट्या सुदृढ आणि खनिज पोषणद्रव्ये

मातीपासून थेट यजमान वनस्पतीच्या मुळांपर्यंत पोहोचवण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहेत. अंदाजे 80% ज्ञात वनस्पतींच्या प्रजाती, ज्यामध्ये सर्वात जास्त आर्थिकदृष्ट्या नगदी पिके सोयाबीन, कापुस,ऊस,केळी,पपई हळद,वैगरे आहेत, त्यांच्याशी सुसंगत सहजीवन पद्धतीने जगते. झाडे आणि माती मायक्रोरायझा हे परस्पर फायदेशीर भागीदार आहेत.मायक्रोरायझा बुरशी मुळे प्रणालीची वसाहत करते, तंतूंचा एक विशाल नेटवर्क तयार करते. हे बुरशीजन्य

पध्दत आर्द्रता टिकवून ठेवते आणि नैसर्गिक मूलद्रव्य शोषण करण्यासाठी नैसर्गिकरित्या खनिज व पोषक द्रव्ये आणी अनलॉक करणारी शक्तिशाली एन्झाईम प्रणाली तयार करते.अतिरिक्त पाणी आणि पोषक द्रव्य वनस्पतींना पुरवून,मायक्रोरायझा हे वनस्पतींची प्रतिकारशक्ती आणि आरोग्यासाठी योगदान करते. या बुरशी मुळे आपन चांगल्या नैसर्गिक जीवनसत्त्व आसलेले पोषकद्रव्ये असलेले अन्न धान्य पीकवु शकतो.

 

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु-हा, अमरावती.जैविक शेती मित्र निखिल मधुकर तेटू.9529600161

English Summary: What is mycorrhiza? Let's know the benefits and importance.
Published on: 08 November 2022, 09:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)