Agripedia

पिकाच्या चयापचयाच्या क्रियेत मॅग्नेशियम फार महत्वाची भुमिका पार पाडते.

Updated on 17 November, 2022 11:44 AM IST

पिकाच्या चयापचयाच्या क्रियेत मॅग्नेशियम फार महत्वाची भुमिका पार पाडते. याठीकाणी पिकातील महत्वाच्या चयापचयाच्या क्रियांचा उल्लेख करित आहोत.फोटोफॉस्पोरिलेशन - या क्रियेमध्ये सुर्याच्या उर्जेपासुन ए.टी.पी. (अडेनाइन ट्राय फॉस्फेट) या शक्तीशाली मुलद्रव्याची निर्मिती हरितलवकामध्ये होते. ए.टी.पी. वर त्यानंतर प्रक्रिया करुन शर्करा व

प्रथिनांची निर्मिती केली जाते. हे ए.टी.पी. तयार होण्यासाठी व पर्यायाने पिकाच्या वाढीसाठी अत्यावश्यक अन्नद्रव्ये तयार होण्यात मॅग्नेशियम गरजेचे आहे.

चेतावनी शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक विचारात घेणे गरजेचे

Alternatively, magnesium is essential in the formation of essential nutrients for crop growth.प्रकाशसंश्लेषणासाठी उपयुक्त कार्बन-डाय-ऑक्साईड चे स्थिरीकरण - हवेतील कार्बन शोषुन घेवुन त्याचे कर्बामध्ये रुपांतर करणे. (सेंद्रिय कर्ब)प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे निर्मित घटकांचा वापर

अन्ननिर्मितीसाठी करणे.मॅग्नेशियम पिकातील प्रकाश संश्लेषण क्रियेत अत्यंत महत्वाच्या अशा रिब्युलोझ १,५-बीसफॉस्फेट कार्बोक्झिलेज च्या अक्टिव्हेशनसाठी गरजेचे आहे.पिक संगोपनासाठी ज्याठिकाणी केवळ नत्र,स्फुरद व पालाश युक्त खतांचा वापर केला जातो आहे अशा सर्वच जमिनींमध्ये मॅग्नेशियमची कमतरता प्रकर्षाने जाणवते आहे.आपणास माहीत आहे काय?

आपणास माहीत आहे काय?ज्या बीटच्या रोपांना कमी किंवा मुळीच मॅग्नेशियम दिलेला नसतो त्यांच्या पानांमध्ये मॅग्नेशियम दिलेल्या पानांच्या ४ पट जास्त सुक्रोझ साठवली जाते. मॅग्नेशियम कमतरतेमुळे हि बहुमुल्य सुक्रोझ बीटच्या कंदांमध्ये पाठवलीच जात नाही. अर्थातच भरपुर खते घालुन देखिल कमी उत्पादन. (हेरमान्स २००४)मॅग्नेशियम कमतरता पानांवर दिसण्या अगोदरच पिकाची मुळांची आणि शेड्यांचीवाढ लक्षणिय रित्या कमी झालेली असते.

English Summary: What is magnesium doing in crops? And what happens when there is no crop?
Published on: 16 November 2022, 03:22 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)