Agripedia

भाजीपाला पिकवणारे शेतकरी मुख्यत्वेकरून जास्त

Updated on 26 July, 2022 8:47 PM IST

भाजीपाला पिकवणारे शेतकरी मुख्यत्वेकरून जास्त उत्पन्न मिळण्यासाठी बऱ्याच नवीन गोष्टींचा उपयोग करताना पाहायला मिळतात. पण उत्पन्न वाढवण्याबरोबरच रसायनांचा आरोग्यावर काय परिणाम होतो हे पाहणे तितकेच गरजेचे आहे.पिकाच्या वाढीसाठी किंवा कीड नियंत्रण करताना शेतकरी बऱ्याच वेळेला रासायनिक औषधांचा वापर करतात.पण कोणते रासायनिक औषध कधी आणि किती प्रमाणात वापरले गेले पाहिजे याची माहिती घेणे महत्वाचे आहे.शेतकऱ्यांना निर्यातक्षम दर्जाच्या शेतमाल उत्पादनाबरोबर अन्नसुरक्षेच्या दृष्टिकोनातून काळजी घेणें महत्वाचे आहे.

त्यादृष्टीने गुणवत्तापूर्ण उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. कृषी माल निर्यातीबरोबरच गुणवत्ता, कीड व रोगमुक्त, उर्वरित अंशाची हमी, अन्नसुरक्षा तसेच वेष्ठणे व निर्यात होणाऱ्या मालीच थेट शेतापर्यंतची ओळख इत्यादी बाबींना जागतिक बाजारपेठेबरोबरच स्थानिक बाजारपेठेतही विशेष महत्त्व आहे.सेंद्रिय घटकांचा वापर - भाजीपाल्याच्या वाढीसाठी किंवा कीड नियंत्रणासाठी आपल्याला सहज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय घटकांचा वापर करणे गरजेचे आहे.पिकांच्या वाढीसाठी गांडूळ खत,शेणखत,निंबोळी पेंड यासारख्या खतांचा वापर करू शकतो त्याचप्रमाणे जनावरांच्या मलमूत्रापासून तयार केलेली स्लरी पिकाच्या वाढीसाठी आपण वापरू शकतो. 

कीड नियंत्रण - कीड नियंत्रणाच्या दृष्टीने सुरुवातीपासून निल तेल,दशपर्णी अर्क,निंबोळी अर्क यासारख्या गोष्टींचा वापर करणे महत्वाचे आहे. तसेच सुरुवातीपासून मुख्य कीड नियंत्रणाच्या दृष्टीने कामगंध सापळे वापरणे तसेच रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी पिवळे निळे चिकट सापळे वापरावे. जैविक कीडनाशकांचा वापर कीड नियंत्रणामध्ये करणे गरजेचे आहेUse of biological pesticides is essential in pest control..यामध्ये तुम्ही या सर्व गोष्टीसोबत मित्रकिडीचा वापर करू शकता.लेबल क्लेम कीटकनाशकांचा वापर ग्राहकांमध्ये आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जागरूकता निर्माण झाली आहे.

कीटकनाशकांच्या उर्वरित अंशामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करता सेंद्रिय प्रमाणित शेतीमाल व कीडनाशके उर्वरित अंश मुक्त शेतीमालाच्या मागणीत वाढ होत आहे.केंद्र शासनाने प्रमुख फळे व भाजीपाला पिकावरील कीड आणि रोगांच्या नियंत्रणाकरिता फरिदाबाद येथील केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समितीने कायदेशीर प्रमाणित केलेल्या (लेबल क्लेम) कीडनाशकांचा वापर करण्याचे बंधनकारक केले आहे. म्हणून येथून पुढे फळे व भाजीपाल्यातील कीडनाशके उर्वरित अंशमुक्तची हमी देण्याकरिता लेबल क्‍लेम कीडनाशकांचा वापर करणे आवश्यक आहे.या सर्व गोष्टीचा एकत्रित उपयोग करणे गरजेचे आहे. रसायनांचा कमीत कमी वापर आणि एकात्मिक व्यवस्थापन पद्धतिचा उपयोग करून अवशेष मुक्त उत्पन्न नक्की घेऊ शकता.

 

IPM SCHOOL

English Summary: What is important in residue-free vegetable production?
Published on: 26 July 2022, 08:46 IST