Agripedia

जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट. हे एक चांगले प्रकारचे भूसुधारक आहे. चोपण जमिनीची सुधारणा त्याचप्रमाणे पिकांच्या वाढीसाठी जिप्सम चांगला उपयोगी पडतो. जिप्सम वर्षातून एकदा २०० ते ३०० किलो/एकरी जमिनीत टाकावा त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. चोपण जमीन सुधारित जमिनीत रुपांतरीत होते.

Updated on 17 June, 2021 6:25 AM IST

जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट. हे एक चांगले प्रकारचे भूसुधारक आहे. चोपण जमिनीची सुधारणा त्याचप्रमाणे पिकांच्या वाढीसाठी जिप्सम चांगला उपयोगी पडतो. जिप्सम वर्षातून एकदा २०० ते ३०० किलो/एकरी जमिनीत टाकावा त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. चोपण जमीन सुधारित जमिनीत रुपांतरीत होते.

 

जिप्सममुळे खालील फायदे होतात.

  • जिप्सममुळे जमिनीची सुपीकता वाढवते.
  • जमीन भुसभुशीत होते.
  • जमिनीची रचना बदलण्यास मदत होते.
  • क्षारपड जमिनीतील सोडियम क्षारांचे कण जिप्सम मुळे सुटे होतात. त्यामूळे ते बाहेर फेकले जाऊन जमीन सुधारते.
  • बियाण्याची उगवण चांगली होते.
  • पाण्याबाहेर येणारे क्षार जिप्सम मुळे कमी होतात.
  • जमिनीची धूप कमी होते.
  • पाण्याचा निचरा होऊन जमीन पाणथळ होत नाही.
  • जमिनीतल्या कॅल्शियम – माग्न्येशियामचे प्रमाण सुधारते.
  • सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात.
  • जिप्सममुळे पिकाची अन्नद्रव्य शोषण क्षमता वाढते.
  • जिप्सममुळे फळांची गुणवत्ता सुधारते.
  • भुईमुग, कलिंगड, टोमाटो, बटाटा या पिकांची गुणवत्ता सुधारते हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे.
  • जिप्सम मुळे पिकांना गंधक मिळतो. तो पिकांना आवश्यक असतो.
  • जिप्सम मुळे पिकांची बाह्य कक्षा सुधारते आणि अन्नद्रव्ये जास्त शोषली जातात.
  • जमिनीत वाढणाऱ्या कंद पिकांसाठी जिप्सम फायदेशीर आहे. त्यामुळे माती कंद पिकला चिटकत नाही.
  • जमिनीतील हुमणीचे नियंत्रण होते.

 

  • जिप्सम मुळे पिक वातावरणातील जास्त तापमान सहन करू शकतात.
    अशा प्रकारे जिप्समचे विविध फायदे आहेत. पण शेतकरी त्याचा वापर आपल्या शेतात करत नाहीत कारण त्याचे महत्त्व अजून शेतकरयांना माहित नाही. कमी खर्चामध्ये फायदा म्हणजे जिप्समचा वापर त्यामुळे शेतकऱ्यांनी यांचा वापर करावा.

माहिती दाता – रासकर स.स.
संदर्भ – कृषी प्रवचने – प्रल्हाद यादव
प्रतिनिधी गोपाल उगले

English Summary: What is gypsum? Learn the benefits of what happens
Published on: 17 June 2021, 06:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)