पिकातील तण नियंत्रणासाठी पेरणी झाल्यानंतर तीन , सहा , व नऊ आठवड्यांनी कोळपे या अवजाराच्या सहाय्याने शेतीची कोळपणी केली जाते. सुरूवातीची पिकांची वाढ संथ गतीने होत असते. त्यामुळे पिकाव्यातिरिक्त तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो. तसेच पेरणी नंतर सुरुवातीच्या दोन तीन आठवड्याच्या कालावधीत तण नियंत्रण न केल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता असते , यासाठी कोळपणी करणे हिताचे मानले जाते.पिकांतील आतील मशागतीसाठी तसेच पिकला भर देण्यासाठी वापरण्यात येणा-या अवजाराला कोळपे असे म्हणतात. कोळपे हे खूप लहान अवजार असल्याने एका बैलजोडीच्या सहाय्याने तिन किंवा चार कोळपी चालविता येतात. पिकांची पेरणी ज्या रांगेत केलेली असते तेथे कोळपी त्या अ-यामध्ये शेतकरी वरच्या वर न दाबता कोळपे चालवत असतो.
म्हणून बैलांनाही जास्त शक्ती लावण्याची गरज नसते. त्यामुळेच एका जुवाला तीन किंवा चार कोळपे लावावे जास्त कोळपी लावल्यावर कोळपणी चांगली होत नाही कोळपणीचे फायदे : 1)कमीत कमी खर्चात व वेळत तण निंयञण होते.2) जमिनीत हवा खेळती राहते उत्पादनात वाढ होते3)जमिनीची सुपिकता वाढते4)सुक्ष्म जीवाणुच्या संख्येत वाढ होते..5)मशागतीचा खर्च कमी होतो..6)कीड, रोग यांच्यापासून बचाव करता येतो...7) शेतातील बुरशीचा फैलाव कमी होते.. 8)सोयाबिन ,ज्वारी, या पिकास कोळपणी केल्यावर त्यांचा भर भसल्यावर पिकांची वाढ चांगली होते.. 9)जमिनीतील ओल या कारणांनी कमी होते...जमिनीत साठलेली ओल पिकांद्वारे वापरली जाते.पृष्ठभागावरून बाष्पीभवनामुळे ओल उडून जाते.
जमिनीला भेगा पडल्यामुळे त्यातून बाष्पीभवनाचे प्रमाण वाढते.तणे स्वतःच्या वाढीसाठी ओल घेतात.वरील ओल नष्ट होण्यातील सर्वाधिक वाटा (सुमारे ६० टक्के) हा बाष्पीभवनाचा असतो.एक कोळपणी आणि अर्धे पाणीशेतामध्ये पिकासोबतच तणांचीही वाढ होत असते. ही तणे पाणी, अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश याबाबतीत पिकांशी स्पर्धा करतात. पीक उगवून आल्यावर त्यात ठरावीक दिवसानंतर कोळपणी केली जाते. त्याचा मुख्य उद्देश तण नष्ट करणे आणि वाया जाणारी ओल थोपवणे हा असतो. याशिवाय कोळपणीमध्ये माती हलवून ढिली केली जाते. त्यातून जमिनीच्या पृष्ठभागावर एक पोकळ थर तयार होतो, त्यामुळे उडून जाणारी ओल थोपवता येते.खरिप हंगाम किंवा रब्बीहंगाम तर कोळपणी अत्यंत महत्त्वाची ठरते.
ग्रामीण भागात “एक कोळपणी म्हणजे अर्धे पाणी ’’ अशी म्हण आहे.कोळपणी केली तर पाणी दिल्याप्रमाणेच फायदा होतो. या तत्वांच्या अवलंबातून कोरडवाहू शेती तंत्रामध्ये ज्वारीकरिता तीन वेळेस कोळपणी करण्याची शिफारस केली आहे.सोयाबिन ला पण दोन वेळस कोळपणी करावी कोळपणी १)- पीक तीन आठवड्याचे असताना फटीच्या कोळप्याने करावी. त्यामुळे तण काढले जाऊन त्याद्वारे होणारा पाण्याचा अपव्यय टाळता येतो.कोळपणी २) - पीक पाच आठवड्याचे झाल्यावर पासच्या कोळप्याने करावी. या काळात जमिनीतील ओल कमी झाल्याने जमिनीला सुक्ष्म भेगा पडण्यास सुरू होता. त्या कोळपणीमुळे बंद होतात. बाष्पीभवनाची क्रिया मंद होते. कोळपणीमुळे पृष्ठभागावर मातीचा हलका थर तयार होतो. त्याला इंग्रजीमध्ये ‘डस्ट मल्च’ म्हणजेच धुळीचे आच्छादन असे म्हणतात.
Published on: 14 July 2022, 07:41 IST