Agripedia

क्लोरोपायरीफॉस 20% EC हे स्पर्शजन्य कीटकनाशक आहे.

Updated on 26 October, 2022 8:59 PM IST

क्लोरोपायरीफॉस 20% EC हे स्पर्शजन्य कीटकनाशक आहे. हे सर्व प्रकारच्या पिकांमध्ये वापरले जाते.क्लोरोपायरीफॉस 50% EC चा वापर प्रामुख्याने पिकांवरील किडींना किंवा जमिनीतील वाळवी कीटकांना मारण्यासाठी केला जातो. क्लोरोपायरीफॉस 20% EC हे सहसा पानांच्या खालच्या बाजूने लपलेल्या कीटकांना नियंत्रित करण्यासाठी सर्वात उपयुक्त आहे.ब्रॉड स्पेक्ट्रम असल्याने ते पानांवरील सर्व कीटकांवर नियंत्रण ठेवते.

हे कीटकांच्या संपर्कात येताच त्यांना मारून टाकते.It kills insects on contact.यामध्ये कीटकांना जलद मारण्या सोबत जास्त वेळ त्याचा प्रभाव राहण्याची क्षमता आहे.लेपिडोप्टेरन कीटकांच्या नियंत्रणासाठी हे प्रभावी औषध आहे.

शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा राजा: चक्रवर्ती महासम्राट बळीराजा, इडा पिडा टळो । बळीचे राज्य येवो !!

क्लोरोपायरीफॉस 20% EC कीटकनाशकाचा वापर जवळपास सर्व पिकांमध्ये करता येतो. परंतु पिकाच्या स्थितीनुसार हे कीटकनाशक वापरले जाऊ शकते. हे एक संपर्क कीटकनाशक आहे जे कीटकांच्या संपर्कात येताच त्याचा नाश करते. त्यामुळे क्लोरोपायरीफॉसचा वापर कीटकनाशकांपर्यंत थेट न पोहोचणाऱ्या कीटकांना मारण्यासाठी केला जातो.

वापर :- भात पिकामध्ये क्लोरोपायरीफॉस 20% EC चा वापर - खोड कीडीच्या नियंत्रणासाठी.- सर्व कीटकांपासून नियंत्रण करण्यासाठी- पाने गुंडाळलेल्या किडीच्या नियंत्रणासाठी.गहू पिकामध्ये क्लोरोपायरिफॉस 50% ec चा वापर1.गव्हाच्या मुळामध्ये वाळवी मारण्यासाठी.2.खोडावर असलेल्या अळीला मारण्यासाठी.3.मातीत पसरणारे कीटक मारणे.सोयाबीन पिकामध्ये क्लोरपायरीफॉस 20% EC चावापर- खोड किडीच्या नियंत्रणासाठी.- पाने गुंडाळलेल्या किडीच्या नियंत्रणासाठी. 

मूग पिकामध्ये क्लोरपायरीफॉस 20% EC चा वापर –मूग पिकातील डास नियंत्रणासाठी वापर केला जातो.क्लोरोपायरीफॉसचा वापर मूग पिकामध्ये आढळणाऱ्या अनेक प्रकारच्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी केला जातो, जसे की पाने खरी अळी, उंटअळी, फळे पोखरणारी अळी.हे संपर्क कीटकनाशक असल्याने, त्याचा प्रभाव 2 किंवा 3 दिवस टिकतो.चहा पिकामध्ये क्लोरपायरीफॉस 20% EC चा वापर

लाल कोळी कीटक,गुलाबी किडे,चहामधील अळी इ. किडींच्या नियंत्रणासाठी करु शकतो.कापूस पिकामध्ये क्लोरपायरीफॉस 20% EC चा वापर केला जातो -बोंडअळी,फुलकिडे,पांढरी माशी इ.भाज्यांमध्ये नागअळी,फुलकिडे,पाने कुरतड्णारी अळी,लष्करी अळी ,कोबी उंटअळी,बीटल,हिरव्या भाज्यावरील लहान किडे ,कोळी, खोडकीड, सुत्रकृमी,गोगलगाय यांच्या नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस चा वापर केला जाऊ शकतो.

English Summary: What exactly is chlorpyrifos used for?Let's know this first
Published on: 25 October 2022, 06:14 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)