Agripedia

वनस्पतीजन्य जैव कीटकनाशके हा सध्याच्या काळात आपल्या सर्वांसाठी नवीन विषय वाटत असला, तरी तो अजिबात नवा नसून याचे दाखले आपल्याला इतिहासात अगदी ठसठशीतपणे मिळतात.

Updated on 11 December, 2021 8:39 PM IST

मानवाच्या म्हणजेच प्राण्यांच्या उपचारांसाठी ज्याप्रमाणे आयुर्वेद अशी एक स्वतंत्र शाखा आहे, त्याचप्रमाणे वृक्षांच्या आरोग्यासाठी पुरातन काळी वृक्षायुर्वेद अशी शाखा होती. वृक्षायुर्वेद म्हणजे सर्व जातीच्या वनस्पतींच्या कीडमुक्त, रोगमुक्त व पिकांच्या उत्पादन वृद्धीसाठी असणारी एक स्वतंत्र शाखा. वृक्षायुर्वेदाच्या माध्यमातून नैसर्गिकरीत्या पिकांची उत्पादकता वाढवण्यासोबतच त्यांवरील कीड व रोग नियंत्रण सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने होते, ज्याचा पर्यावरणाला कोणताही धोका पोहोचत नाही त्यामुळे आपण याचा शाश्वत उपाय म्हणून वापर करू शकतो. वृक्षायुर्वेदाचा ऐतिहासिक मागोवा घ्यायचा झाला तर इसवी सन पूर्व ४०० च्या काळात 'सलिहोत्र' यांनी या विषयावर विवेचन केले होते, त्या नंतर इसवी सन १००० मध्ये 'सुरपाल' यांनी सुद्धा यावर आपले विवेचन लिहिले होते. यामध्ये बी च्या मातीमध्ये रुजविण्यापासून पिकाच्या परिपक्वतेपर्यंत तसेच पिकसंरक्षणाचे सुद्धा तपशीलवार वर्णन आहे. सुरपालांनी पानांवर लिहिलेली वृक्षायुर्वेदाची एकच हस्तलिखित प्रत उपलब्ध होती, जी ऑक्सफोर्ड विद्यापीठात नुकतीच इंग्रजीमध्ये अनुवादित करून जतन केली गेली.

आपल्या आजूबाजूला सहजपणे आढळणाऱ्या वनस्पतींच्या अल्कोलॉइड्स पासून बनवली असल्यामुळे ही औषधे पूर्णतः पर्यावरणपूरक असतात व याच्या माध्यमातून रसायनमुक्त शेती करता येते, तसेच किडी व रोगांवर सुद्धा याचा उत्तम परिणाम दिसून येतो. या औषधांमध्ये नैसर्गिकरित्या पोषकद्रव्ये (नत्र, स्फुरद, पालाश, इत्यादी) समाविष्ट असतात, परिणामी ही वनस्पतीजन्य औषधे ज्या पिकांवर फवारली जातात त्यांवर फायटोटॉनिक परिणाम दिसून येतात ज्यांमुळे पिकांची शाखीय वाढ उत्तमपणे होऊन उत्पादनात वाढ होते साहजिकच या औषधाचा वापर केल्यामुळे रासायनिक शेती करताना शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे टॉनिक फवारण्यासाठी जो खर्च होत होता तो वाचतो. रासायनिक खतांमध्ये किडी व रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिशय घातक अश्या रसायनांचा वापर केला जातो, ज्यांच्या फवारणीमुळे पिके तणावामध्ये जातात व याचा उत्पादनावर नकारात्मक परिणाम होतो. मात्र वनस्पतीजन्य औषधांच्या फवारणीमुळे पिकांना कोणत्याही प्रकारचा ताण बसत नाही, याऊलट पिकांना याचा वाढीत फायदा होतो व फवारणीनंतर पिके एकदम तजेलदार दिसतात व पिकावर काळोखी येते. त्याचप्रमाणे रसायनांच्या वापरामुळे फवारणीनंतर मधमाशी जी फळधारणेसाठी अत्यंत आवश्यक असते ती त्या रसायनांच्या उग्र वासामुळे व विषामुळे पिकांपासून दूर जाते, ज्यामुळे फलधारणा कमी प्रमाणात होते व साहजिकच याचा फटका उत्पादनाला बसतो. वनस्पतीजन्य औषधांमुळे मात्र मधमाशीवर चांगला परिणाम दिसून येतो, ही औषधे पर्यावरणपूरक असल्यामुळे जीवसृष्टीला याचा धोका नसतो ज्यामुळे यांच्या फवारणीनंतर मधमाशी पिकांकडे आकर्षित होते परिणामी पिकांमध्ये परागीकरण वाढते. रासायनिक उत्पादनांचा विचार केल्यास ती फक्त रोग व कीड नियंत्रणापर्यंत मर्यादित राहतात त्यामुळे त्यांची उपयुक्तता वनस्पतीजन्य औषधांच्या तुलनेत खूप कमी असते.

तसेच वनस्पतीजन्य औषधांचा पिकांवर वापर केल्यास मिळणारे उत्पादन हे रसायनमुक्त व अवशेषमुक्त असल्याकारणाने या कृषीमालाची निर्यात करण्यात कोणतीही अडचण येत नाही आणि निर्यातीमुळे शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळतो.

के. बी. बायो ऑरगॅनिक्सने याच सर्व बाबींचा विचार करून तसेच शेतकऱ्यांचे हीत डोळ्यासमोर ठेऊन ५ वर्षांच्या अथक संशोधनानंतर पिकातील जवळ जवळ सर्व रोगांवर व किडींवर प्रभावी ठरणारी आणि उत्पादन वाढीत फायदेशीर ठरणारी वनस्पतीजन्य उत्पादने बाजारात दाखल केली आहेत. या उत्पादनांचा वापर करून आज महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांसोबतच इतर राज्यातील शेतकरी सुद्धा या उत्पादनाच्या वापरामुळे समाधानी आहेत. डाळींबातील तेल्या नियंत्रणासाठी ‘बॅक्टो रेझ’, द्राक्षातील डाऊनी म्हणजेच केवडा नियंत्रणासाठी ‘डाऊनी रेझ’, पिकांवरील व्हायरस नियंत्रणासाठी ‘व्हायरो रेझ’ तसेच रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी ‘पेस्टो रेझ’, पिकांवरील बुरशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘फंगो रेझ’, मर रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी आणि पांढऱ्या मुळांच्या सक्षम वाढीसाठी ‘रूट फिट’, पिठ्या ढेकणाच्या प्रभावी नियंत्रणासाठी ‘मिली रेझ’,

सर्व प्रकारच्या अळ्यांचा नायनाट करण्यासाठी ‘लार्वो रेझ’, किडी व अळ्यांच्या नियंत्रणासाठी ‘ऑरगा नीम’ फुलकिडींच्या प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी ‘थ्रिप्स रेझ’, मातीतील सामू नियंत्रणासाठी आणि पिकांच्या मुळांना पोषकद्रव्य शोषण्यास मदत होण्यासाठी ‘पी एच ट्यूनर’ याचसोबत प्रभावशाली स्टिकर ‘बॅलनस्टिक’ जो सिलिकॉनयुक्त असून पाण्याचा सामू सुद्धा नियंत्रित करतो, ज्यामुळे औषधांची परिणामकारकता वाढते. या उत्पादनांच्या सहाय्याने शेतकरी निरोगी व निर्यातक्षम कृषी मालाचे उत्पादन घेऊन त्यांना चांगला परतावा मिळत आहे. रसायनांचा अतिरेकी वापर अशी झालेली शेतीची ओळख के. बी. बायो ऑरगॅनिक्सच्या वनस्पतीजन्य औषधांच्या सहाय्याने आपण नक्कीच बदलूया आणि या पिढीला रसायनमुक्त आणि सकस कृषीमाल पुरवून भविष्य सुरक्षित करूया.

-शब्दांकन - प्रतिक काटकर 

के. बी. बायो ऑरगॅनिक्स प्रा. लि.

English Summary: What exactly is a plant pesticide?
Published on: 11 December 2021, 08:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)