तर वांगी पिकामध्ये येणाऱ्या मुख्य किडी खालील प्रमाणे:-
शेंडे व फळ अळी(Leucinodes orbonalis)
पांढरी माशी(Bamicia tabcai)
तुडतुडे
लाल कोळी
अगदी अपवादात्मक वेळी पाने खाणारी लष्करी अळी (Spodoptera litura) किंवा अमेरिकन लष्करी अळीचा(Spodoptera fruhiperda) प्रादुर्भाव पहायला मिळतो
एकात्मिक व्यवस्थापन:-
रस शोषणारी कीड(पांढरी माशी,तुडतुडे,कोळी):-
या रसशोषक किडींचे नियंत्रण व प्रतिबंध उपाय करणे खूप महत्वाचे असते कारण ह्या किडी पर्णगुच्छ सारख्या विषाणूजन्य रोगांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो.
या किडी पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पानाच्या कडा वरील बाजूस वळतात या किडीचे प्रमाण कोरड्या हवामानात जास्त आढळते.
शेत व बांध तणमुक्त ठेवावे.
सुरवातीपासून नियंत्रणासाठी 3 पिवळ्या सापळ्यांमागे एक निळा या प्रमाणात एकरी 30 ते 40 पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत,
एखादी निम तेलाची फवारणी घ्यावी.
तरीही उपद्रव जास्त जाणवला तेव्हाच खालील कीटकनाशकांचा आधार घ्यावा.डायमेथोएट ३०% ईसी २० मिली किंवा फेनप्रोपॅधीन ३०% ई.सी. ५ मिली या कीटकनाशकाच्या आलटून पालटून फवारण्या कराव्यात फवारणी करताना पावसाळी वातावरणात चिकट द्रव्याचा (०.१%) वापर जरूर करावा.
शेंडा व फळे पोखरणारी अळी(Lucinodes orbonalis):
ही कीड वांगी पीक सोडून इतर कोणत्याही पिकामध्ये येत नाही.
वांग्यावर विशेषत: शेंडे पोखरणारी अळी जास्त प्रमाणात दिसून येते.
यामध्ये अळी प्रथमत फळे नसताना कोवळ्या शेंडयात शिरून आतील भाग खाते. त्यामुळे शेडे वाळतात. नंतर फळे आल्यावर फळात शिरुन आतील भाग खाते. त्यामुळे अशा फळांना बाजारात किंमत मिळत नाही
या किडीमुळे फळाचे ४०-५० टक्के नुकसान होवू शकते.
प्रभावी नियंत्रनासाठी एकरी 10 ते 12 कामगंध सापळे लावावेत.
लागवडीनंतर २० दिवसांनी किंवा दर आठवड्याला किडलेले शेंडे व फळे आढळल्यास ती गोळा करून नष्ट करावीत. किंवा खोल खड्ड्यात पुरून टाकावी.
तरीही उपद्रव जाणवला तरच खालील कीटक नाशकांचा वापर करावा.
तसेच ४ टके निंबोळी अर्क किंवा सायपरमेथ्रिन २५ ई.सी. ५ मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २०% ई.सी. २० मिली. किंवा डेल्टामेथ्रीन + ट्रायझोफॉस (संयुक्त किटकनाशक) २० मिली.प्रति 10 लिटर.
फक्त कीटकनाशकांवर अवलंबून न राहता या उपायांचा एकत्रित अंमल केल्यास प्रभावी कीड नियंत्रण होते.
संकलन - IPM school
महेश कदम हातकणंगले
Published on: 06 October 2021, 08:00 IST