Agripedia

सध्या पिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी विहीर आणि बोरवेल मधून अमर्यादित स्वरूपात पाण्याचा उपसा करण्यात येतो.त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात खालावत आहे.ज्या वेगाने पाण्याचा उपसा होतो त्याच वेगाने पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी प्रयत्न केले जात नाही.

Updated on 18 October, 2021 10:28 AM IST

सध्या पिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी विहीर आणि बोरवेल मधून अमर्यादित स्वरूपात पाण्याचा उपसा करण्यात येतो.त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात खालावत आहे.ज्या वेगाने पाण्याचा उपसा होतो त्याच वेगाने पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी प्रयत्न केले जात नाही.

परिणामी भूजल साठा कमी होऊनविहीर आणि बोरवेल ची पाणी पातळी लक्षणीयरीत्या घटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर सर्वात उत्तम उपाय म्हणजे जलपुनर्भरण हे होय.या लेखात आपण विहीर पुनर्भरणाचे तंत्र जाणून घेणार आहोत.

विहीर पुनर्भरणाचे तंत्र

  • या तंत्रामध्ये पावसाळ्यात शेत जमिनीतून वाहणारे पावसाचे पाणी एकत्रितपणे वळवून विहिरीजवळ आणावे.या वळलेल्या पाण्याचा उपयोग विहीर पुनर्भरणासाठी करावा. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे वाहणारे पाणी सरळ विहिरीत सोडू नये. कारण त्यामुळे वाहणाऱ्या पाण्यासोबत आलेली माती आणि गाळ विहिरीत साठवू शकतो.
  • कोरडवाहू शेती संशोधन केंद्राने विहीर पुनर्भरण तंत्रज्ञान विकसित केले आहे.या तंत्रामध्ये दोन प्रकारच्या गाळण यंत्रणा आहेत.त्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर येणारा गाळ अडविला जातो व शुद्ध पाणी विहिरीत सोडले जाते.
  • शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या रचनेनुसार व उतारानुसार पावसाचे वाहते पाणी गाळणे यंत्रणेकडे वळवावे.शेतातील पाणी सरळ टाक्यात घेण्याऐवजीटाक्याबाहेर एक साधा खड्डा करून त्यात दगडगोटे, रेती भरावी. त्यामधून एक पीव्हीसी पाईपणे पाणी प्रथम प्राथमिक गाळण यंत्रणेत घ्यावे. शेता कडील चारी द्वारे वाहणारे पाणी प्रथम प्राथमिकगाळण यंत्रणेत घ्यावे.
  • मुख्य गाळण यंत्रणेचा अलीकडे 1.5 मीटर बाय एक मीटर बाय एक मीटर आकाराची दुसरी टाकी बांधावी.त्याला प्राथमिक गाळण यंत्रणा म्हणतात.शेतातून वाहत येणारे पाणी प्रथम या टाकीत घ्यावे. तेथे जड गाळ खाली बसतो आणि थोडे गढूळ पाणी पीव्हीसी पाईप च्या माध्यमातून किंवा खाचे द्वारे मुख्य गाळण यंत्रणेत सोडावे.
  • विहीर पुनर्भरण मॉडेल च्या दुसऱ्या भागाला मुख्य गाळण यंत्रणाअसे म्हणतात. यंत्रणा विहिरीपासून दोन ते तीन मीटर अंतरावर बांधावी. यासाठी दोन मीटर लांब × दोन मीटर रुंद आणि दोन मीटर खोल खड्डा करावा.
  • या खड्ड्याला आतून सिमेंट विटांचे बांधकाम करून टाकी सारखे बांधून घ्यावे. याद मुख्य गाळण यंत्रणेच्या खालील भागातून  4 इंच व्यासाचा पीव्हीसी पाईपविहिरीत सोडावा.या टाकीत 30 सेंटिमीटर उंचीपर्यंत मोठे दगड,30 सेंटिमीटर उंचीपर्यंत छोटे दगडआणि त्यावर 30 सेंटीमीटर जाडीचा वाळूचा थर टाकावा. असे 90 सेंटिमीटर जाडीचे गाळन थर असावे.  त्यावरील 60 सेंटिमीटर भागात पाणी साठते. या गाळण यंत्रणेमार्फत पाणी  गाळले जाऊनविहिरीतसोडावे.

( स्त्रोत- ॲग्रोवन)

English Summary: well recharge techniqe is important for the growth of land water
Published on: 18 October 2021, 10:28 IST