Agripedia

शेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवुन घ्यावे.

Updated on 29 May, 2022 9:53 PM IST

कोरडवाहु परिसरातील शेतकरी, हे पुर्णतः पावसाच्या लहरीपणावर अवलंबुन असतात, एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही,आणि पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात.उगवणीपुर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीत २ ते ३ इंच खोल अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे. पेंडीमेथिलिन, सारखेच ट्रायफ्लुरॅलिन हे तणनाशक देखिल पेरणीपुर्वी वापरता येते.

सोयाबीन पिकांत वापरता येणारी तणनाशके, हि तणनाशके वापरतांना कंपनी प्रतिनाधी, कृषी तज्ञ, किंवा दुकानदार यांचा सल्ला घेवुन, रोपांवर फवारणी होणार नाही याची काळजी घेवुन वापरावे.तणनाशक केव्हा वापरावेपॅराक्वेट आणि पेंडीमेथिलिन लागवडीनंतर २ दिवसांच्या आत वापारवे.पॅराक्वेट आणि ब्युटॅक्लोर लागवडीनंतर २ दिवसांत वापरावे.फुसिलेड फोर्टी लागवडीनंतर २१ ते २८ दिवसांनी वापरावे.तण उगवणीनंतर वापरण्याचे तणनाशक -टरगा बहुवार्षिक तणांच्या नियंत्रणासाठी दोन वेळेस वापारवे लागु शकते.परस्युट (इमिझाथायपर)तण उगवणीनंतर वापरता येते. तणाच्या वाढीचा काळ सक्रिय हवा. 

सोयाबीन पिकाच्या मुळांवरती रोयझोबियम हा उपयुक्त जीवाणू राहत असल्याने या पिकांस वरुन नत्र खताची फारशी गरज भासत नाही. सोयाबीनच्या मुळांवरील गाठी निट तयार होण्यासाठी पेरणी सोबत किंवा रोप उगवल्यानंतर लागलीच १० किलो फेरस सल्फेट १ एकरात जमिनीतुन द्यावे. या शिवाय सोयाबीन पिकांस खालिल प्रमाणे अ्नद्रव्ये द्यावीत.लागवडीनंतर दिवस नत्र स्फुरद पालाश मॅग्नेशियम सल्फेट कॅल्शियम नायट्रेट सल्फर झिंक सल्फेट फेरस सल्फेट मँगनिज सल्फेट५-१० दिवस १० २५ २५ ०० ०० ०० ०० १० ००३०-३५ दिवस ०० ०० ०० १० ०० २ ०० १० ००एकुण १० २५ २५ १० ०० २ ०० १० ००सोयाबीन पिकांत शेंगा पोसत असतांना सल्फर (गंधक) युक्त खतांचा वापर करावा. 

मात्र या कतातुन पिकांस उपलब्ध होईल अशा स्वरुपात गंधक मिळविण्यासाठी सल्फर ऑक्झिडाझिंग बॅक्टेरियाचा वापर करणे गरजेचे आहे. या काळात पिकांस बोरॉन आणि पालाश ची गरज फवारणीतुन पुर्ण करावी.पिकाच्या वाढीची अवस्था फवारणीच्या खतांचा प्रकार प्रमाण प्रती लिटर पाणी लागवडीनंतर १० - १५ दिवसांत 19-19-19 2.5 -3 ग्रॅम सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5-3ग्रॅम वरिल फवारणीनंतर १५ दिवसांनी२० टक्के बोरॉन 1 ग्रॅम सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5-3 ग्रॅम फुलोरा अवस्थेत00-52-34 4-5 ग्रॅम मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २)2.5-3 ग्रॅम शेंगा पासत असतांना00-52-34 4-5 ग्रॅम बोरॉन 1 ग्रॅम वरिल फवारणीनंतर ७ दिवसांनी

 

विनोद धोंगडे नैनपुर

ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर

९९२३१३२२३३

English Summary: Weedicides that can be used in soybean crop
Published on: 29 May 2022, 09:53 IST