Agripedia

आपल्याला माहित आहे की शेतामध्ये जर तणांचा प्रादुर्भाव जास्त झाला तर त्याचा थेट परिणाम हा पीक वाढीकडे आणि उत्पादनावर होतो. त्यामुळे आपण शेत तणमुक्त ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतो.

Updated on 30 December, 2021 9:48 AM IST

आपल्याला माहित आहे की शेतामध्ये जर तणांचा प्रादुर्भाव जास्त झाला तर त्याचा थेट परिणाम हा पीक वाढीकडे आणि उत्पादनावर होतो. त्यामुळे आपण शेत तणमुक्त ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतो.

परंतु आपल्याला माहीत आहे का या तणांचा  उपयोग शेतकरीवर्गालाच न होता अवतीभवती असलेल्या सगळ्या घटकांना होत असतो. या लेखात आपण शेतातील तणे व त्यांचे औषधी गुणधर्म तसेच त्यांचे काही उपयोग याबद्दल माहिती घेऊ.

 रासायनिक तणनाशकांचा वापराने तणेनामशेष होताना दिसत आहेत. परंतु या तनांचा उपयोग नुसता औषधी म्हणून न होता निसर्गातल्या अनेक जीवजंतू, बुरशी इत्यादींची हक्काची जगण्याची जागा आहे. जनावरांना सकस चारा म्हणून त्याचा उत्तम वापर करता येऊ शकतो.

जेव्हा आपण हे तने नष्ट करतो तेव्हा त्यावर अवलंबून असणारे असंख्य किड्यांच्या,बुरशीच्या प्रजातींचे जगण्याचे साधन संपल्याने ते पिकांवर येऊन जगण्याची धडपड करतात. परिणामी पिकांवर कीड व रोग पसरतात. म्हणून त्यांचे महत्त्व शेतीशी निगडीत तर आहेसपरंतु त्यांचे औषधी गुणधर्म जाणून घेणे महत्वाचे आहे.

 तसेच शेतातील तणे नांगरणी करून जमिनीत पुरल्या मुळे त्यांच्यापासून सेंद्रिय पदार्थ व अन्नद्रव्य मिळतात. अनेक तरुणांमध्ये नत्रयुक्त पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. त्यांचे उदाहरणच द्यायचे झाले तर गोखरु, भाऊची आणि धोतराइत्यादी तने फेकून न देता जमिनीत गाडली तर जमिनीतील नत्राचे स्थिरीकरण होण्यास मदत होते शेळ्या आणि मेंढी अनेक प्रकारच्या नैसर्गिक रित्या वाढणारे तन खात असल्यामुळे त्यांच्यामध्ये काटकपणा व निरोगी पण असतो. तसेच बऱ्याच तनांचा उपयोग औषधी निर्मितीसाठी किंवा प्रत्यक्ष औषध म्हणून देखील केला जातो. आत्ता आपण काही तणांचे प्रकार व त्यांचे औषधी उपयोग पाहू.

तणांचे प्रकार व त्यांचे औषधी उपयोग..

  • आघाडा- या तनाचा उपयोग हा पिसाळलेली जनावरे चावल्यास तसेच याच्या पानांचा रस व मूळ मूत्र रोगांवर उपयुक्त आहे.
  • कस्तुरी भेंडी- कस्तुरी भेंडीच्या बीचे तेल मज्जातंतूच्या अशक्तपणावर तसेच पोटाच्या विकारात उपयोगी असते.
  • धोतरा- धोत्र्याचे मूळ हे त्वचारोगांवर तसेच त्याचा पिवळा चिक कावीळ वर उपयोगी आहे.तसेच फोड, जखमेवर उपयुक्त आहे.
  • वासनवेल- या वेलाची उगडून पोटाच्या विकारात देतात.पानांचा रस दुधातून दिल्यास हा गर्मी वर व धातु पातावर उपयुक्त आहे. कावीळ वर देखील उत्तम असा याचा फरक आहे.
  • टाकळा- याच्या बिया व लिंबूरस एकत्र करून त्वचा रोगावर रामबाण उपाय आहे.
English Summary: weeder in crop many useful for land and medicinal properties
Published on: 30 December 2021, 09:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)