Agripedia

आज मार्केटमध्ये उपलब्ध असणार्‍या तणनाशकामध्ये पॅराक्वाट

Updated on 09 September, 2022 8:35 PM IST

आज मार्केटमध्ये उपलब्ध असणार्‍या तणनाशकामध्ये पॅराक्वाट (ग्रामोक्झोन), ग्लायफोसेट (ग्लायसेल) आणि मिरा ७१ अशी तणनाशके सरसकट सर्वच तणांचा बंदोबस्त करण्यासाठी वापरतात. ही तणनाशके ऊसाच्या पिकामध्ये वापरणे धोक्याचे असते. पण बांधावरील तण, मोकळ्या जागेतील तण नियंत्रण करण्यासाठी काळजीपूर्वक वापरल्यास याचा उपयोग चांगला होतो. ग्रामोक्झोन हे स्पर्शजन्य आहे. कुठल्याही हिरव्या वनस्पतीवर फवारले असता काही तासातच त्याचा परिणाम दिसू लागतो. परंतु ग्लायफोसेट, मिरा - ७१ ही तणनाशके आंतरप्रवाही आहेत. फवारणीनंतर पानाद्वारे

वनस्पतीच्या शरीरभर भिनतात. वनस्पतींचा शारीरिक समतोल बिघडवून तण मरून जाते.Weeds die by disrupting the physiological balance of plants. मातीवर पडले तर या रसायनाचा काही परिणाम होत नाही.

हे ही वाचा - जिवाणू खत माहिती मालिका विशेष अ‍ॅॅझोटोबॅक्टर"

निष्क्रिय होते.तणनाशकाचा दुसरा एक प्रकार आहे. ती काही विशिष्ट वनस्पती किंवा तणांना मारु शकतात. त्यांना सिलेक्टीव्ह हर्बिसाईड असे म्हणतात. ही तणनाशके आंतरप्रवाही याच प्रकारातील असतात. त्यांचा तपशील खाली दिला आहे.निवडक तणनाशके (सिलेक्टीव्ह हर्बिसाईड) : १) मेट्रिब्युझीन : (4 - amino-6 terbutyl 1-3 (Methylthio) 1, 2, 4, trizin - 5 (4 H) - One)मार्केटमध्ये बायर कंपनीचे सेंकॉर या नावाने मिळते.

ऊसाची लागण केल्यानंतर आठवडाभरात शेतामध्ये पुरेशी ओल असताना याची फवारणी केली तर गवतवर्गीय तसेच रुंदपानाचे (गोडे तण) सर्व प्रकारच्या तणांचे बीज उगवण्याची क्रिया थांबते. तण नुकतेच उगवून आले असले तरी सेंकॉरच्या फवारणीने मरते. विशेषतः गवतवर्गीय तणांचे उगवणीनंतर फवारणीने चांगले नियंत्रण होते.वनस्पतीच्या प्रकाशसंश्‍लेषण या क्रियेवर जलद परिणाम होतो. उगवून येणार्‍या अंकुरांची अंकुरण क्रिया बंद पडते. याचा परिणाम २ महिने टिकून राहतो. विशेष म्हणजे ऊसावर याचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही. पण याची फवारणी केली तर कोणतेही आंतरपीक टिकत नाही.डोस : ४०० ग्रॅम क्रियाशील घटक/एकर

२) ऍट्राझिन : (2 chloro-4-ethylamino-6 isopropylamin - 5- trizine)ट्रायझाईनस् मधला हा दुसरा प्रकार आहे. मार्केटमध्ये ऍट्रॅटाफ किंवा जेसॅप्रिम (सीबागायगी) या नावाने मिळते. उगवणपूर्व (प्रीइमर्जन्स) किंवा तणांची उगवण झाल्यानंतर या दोन्ही वेळेला वापरता येते. जमिनीत कमी ओलावा असला तरी काम करते. ऊस, मका, ज्वारी या पिकांना कोणतीही हानी करीत नाही. तणांच्या बियांची उगवण होण्यास प्रतीबंध करते. तणांच्या मुळातून प्रवेश करून तण नष्ट करते. पानावरची फवारणी तितकीच प्रभावी असते. दीर्घकाळ परिणाम राहतो.डोस : ८०० ग्रॅम क्रियाशील घटक/एकर

३) सिमॅझाईन : (2 chloro- 4, 6 bis ethyl amino 1, 3, 5 trizines)सिबागायगी निर्मित ‘गॅसॅट्रॉप’ किंवा टॅफॅझाईन या नावाने मार्केटमध्ये मिळते. हे तणनाशक तणांची उगवण होण्यापूर्वीच वापरावे लागते. तणांच्या बीजअंकुरणावर याचा परिणाम होत नाही. पण उगवणीनंतर मुळामार्फत सर्व भागात पसरते. पाने पिवळी पडून हळूहळू मरून जातात. प्रकाश संश्‍लेषणामध्ये ‘हिल रिऍक्शन’ नावाची क्रिया घडत असते. सिमॅझिनमुळे ही क्रिया बिघडून जाते. विशेष म्हणजे ऊसाच्या पानावर जरी हे तणनाशक पडले तरी ते निष्क्रिय होऊन जाते. मातीमध्ये मात्र दीर्घकाळ अवशेषाने राहून कार्य करते.डोस : ८०० ग्रॅम क्रीयाशील घटक / एकर

४) डाययुरॉन : (3-(3, 4-Dichlorophenyl)-1, 1- dimethylurea) मार्केटमध्ये कारमेक्स या नावाने मिळते. उगवणपूर्व तणनाशक म्हणून कार्य करते. युरियामध्ये थोडा रासायनिक बदल करून याची निर्मिती केली आहे. तणांच्या मुळातून शोषण झाल्यावर ते झायलेम या अन्नवाहिकेतून पानात पसरते. क्लोरोफिल तयार करण्याची क्रिया थांबवते. पाने पिवळी पडून पुढे कोळपून करपून जातात. मातीमध्ये अवशेष दीर्घकाळ राहातो. कारण पाण्यामध्ये ते कमी प्रमाणात विरघळते. वाहून किंवा निचर्‍याने नष्ट होत नाही.डोस : १.६० किलोग्रॅम क्रियाशील घटक/एकर

५) २-४ डी : (2, 4-Dichlorophenoxy acetic acid)मार्केटमध्ये फरनोक्झेन, वीडमार, वीडर या व्यापारी नावाने उपलब्ध आहे. त्याचे तीन फॉर्म्युलेशन्स आहेत.१) सोडियम सॉल्टस् २) अमिनो सॉल्टस् ३) एस्टर्स सोडियम सॉल्टस्१) हे सफेद पावडरच्या स्वरूपात असतात. पाण्यात पूर्णपणे विरघळतात.२) अमिनो सॉल्टस हे संपृक्त जलद्रावण स्वरूपात मिळतात. सोडियम सॉल्टस्पेक्षा जास्त प्रभावी असतात.३) एस्टर्स हे टू-फोर-डी ऍसिड आणि अल्कोहोल यांच्या परस्परक्रियेने तयार केलेले असतात. 

 

डॉ. बी. एम. जमदग्नी (सर), M.Sc. (Agri), Ph.D.

वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ निवृत्त शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

English Summary: Weed control in crops, their types and functions
Published on: 09 September 2022, 08:10 IST