Agripedia

उन्हाळ्यात विहीरीत पोहणारी पोरं आता अंघोळीला पाणी मिळत नाही

Updated on 21 April, 2022 12:42 PM IST

शक्यतो डोंगर भागात पाणी टंचाई नसते,अशी एक पूर्वी धारणा होती.परंतू मागील ४०/५० वर्षात हळहळू पाणी नाहीसं झालं.उन्हाळ्यात विहीरीत पोहणारी पोरं आता अंघोळीला पाणी मिळत नाही म्हणून त्रस्त झाली आहेत.

अनेक वस्त्यावर पाणी टंचाई आहे.पाऊस किती ही पडला तरी उन्हाळ्यात पाणी टंचाई होतेच.याची कारणे आहेत. 

१) पोखरलेले बोडके डोंगर.

डोंगर हे जमिनीतील पाणीसाठ्याचे बाह्य कवच असते. उन्हाळ्यात डोंगराचे बाह्य आवरण तापते.माञ भूपृष्ठापर्यंत उष्णता पोहचू न शकल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही.या उलट डोंगर फोडला तर उष्णता थेट पोहचते व डोंगराच्या पोटातील ओलावा संपुष्टात येतो.

२) जंगल

 पाणी जमिनीत दोन प्रकारे साठले जाते. एक मृत साठ्याचे पाणी आणि दुसरे जिवंत साठ्याचे पाणीमत साठ्याचे पाणी हे दहा फुटावर पाझरते तर जिवंत साठ्याचे पाणी दहा ते १०० व त्यापेक्षा अधिक पाळीवर आढळते.जेेंव्हा पाऊस पडतो तेंव्हा नदी नाल्याचे पाणी मृत साठ्याच्या स्वरूपात जमिनीत साठले जाते.जे कि एकदा उपसले कि संपून जाते. आणि जोपर्यंत ओढे वगळ वहात असतात तोपर्यंतच विहीर व बोअरला पाणी असते.  तर जिवंत साठ्याचे पाणी आज तरी भूगर्भातून संपलेले आहे.कारण जिवंत पाणी खोलवर जाण्यासाठी नैसर्गिक यंञणा हवी असते.एक पाण्याचा थेंब खडकातून पाझरून भूगर्भात जाण्याठी एक वर्षाचा कालावधी लागतो.म्हणजेच दहा फुटावर जाण्याठी दहा वर्ष लागतात.

आणि झाडे असतील तर एक झाड एका दिवसाला ५० फुटावर दहा लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते.कारण झाडं हे जमिनीच्या वर जेवढ्या उंचीपर्यंत असेल तेवढीच खोलवर त्याची मुळे असतात.म्हणून झाडं हे निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन आहे,जमिनीत पाणी घेऊन जाण्यासाठीची..! म्हणून ज्या ज्या गावात वनराई उभी राहिला आहे,जंगल निर्माण केले आहे तिथले पाण्याचे प्रश्न संपल्याचे चिञ तुम्हाला सोशल मिडीयातून पहायला मिळते.रब्बी हंगामासाठी किमान तीन वेळा पाणी पिकांना द्यावे लागते.पन्नास फुट खोल असलेल्या विहीरीची अंदाजे क्षमता एक लाख लिटर असते. म्हणून दोन एकर बागायतीसाठी कमीत कमी तीन लाख लिटर किंवा तीन विहीरीचे उपसे आवश्यक असतात.

एक विहीर खोदण्यासाठी तीन ते पाच लाख रूपये लागतात.परंतू या विहीरी आज तरी मृत साठ्याचे पाणी धारण करतात. आणि फेब्रुवारी नंतर कोरड्या पडतात. एक लिंबाचे झाडं दहा हजार लिटर पाणी एकुण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते.याचा अर्थ आपल्या परिसरात किमान ३० झाडं लिंब,चिंच,जांबळ,अंबा, मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असतील.म्हणून मृत साठ्याचे पाणी पाझरत रहात असावे.एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाडं एका हंगामासाठी एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते.आणि ते ही पन्नास फुटाच्या ही खाली.वडाची व पिंपळाचे मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात.

विचार करा,एक कोटी लिटर म्हणजे रब्बीची शंभर भरणे किंवा विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी.याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो. म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक झाडं हे अशा महावृक्षाचे लावा.

 आपण एक बोअरवेलसाठी एक लाख खर्च करतो.एका विहीरीसाठी पाच लाख खर्च करतो.पण पाण्याचा कुठलीच शाश्वती नाही'. कारण आपली नियत ही धुर्त असते,डोंगर संपुष्टात आणण्याची,डोंगारावरील झाडं तोडण्याची,बांध संपवून बोडके करण्याची म्हणून पाणी तरी कुठून येणार?

म्हणूनचं म्हणतात नियत तिथे बरकत निसर्गाविषयी व झाडाविषयी नियत ठेवा..शेतीला व तुमच्या जीवनाला बरकतं व बहार येईल.पाण्याचे दुर्भिक्ष हे मानव निर्मित आहे.देवाला दोष देण्यात अर्थ नाही.खरे दोषी आपण व आपला स्वार्थ आहे. 

हवा ही ऊर्जा आहे.

पाणी हे अमृत आहे

तर माती ही जननी आहे.

तर झाडं हे जीवनदायी आहेत.

झाड नसेल तर हवा रोगट होते.पाणी विषासमान होते आणि माती वांझ होवून शापीत होते.स्ञी व माती समान आहेत.लाभली तर लक्ष्मी नाहीतर अवदसा ! आपल्या दारिद्र्याची कारणे ही आहेत.बाकी ईतर घटना ह्या निमित्त माञ आहेत.

झाडांचं मूल्य समजून घ्या.आणि दहा रूपयाचं फक्त एक झाडं शेत असेल तर शेतात नाहीत तर माळरानावर,डोंगरावर कुठे ही जगविण्याची जबाबदारी घ्या. या शिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नाही.तुम्ही गावाचे समाजाचे आणि स्वहिताचे जर काही देणं लागत असाल तर एवढचं साध काम करा. झाडं मानसाचं मन, मस्तिष्क व जीवन हिरवंगार करत असतात.

(झाडांची पाणी पाठवण्याची व वाहण्याची क्षमता त्यांच्या 

 वयावर व प्रकारावर अवलंबून असते)

English Summary: We are love on our village and our soil
Published on: 21 April 2022, 12:36 IST