Agripedia

ह्या विषयावर आम्ही सतत मागणी/पाठपुरावा करीत होतो. हे "फोरम ऑफ़ इंटलेकच्युअल्स"च्या प्रयत्नांचे पण यश आहे. माझ्या 2 एप्रील 2019 च्या एका लेखातील छोटा भाग (Extract):

Updated on 18 December, 2021 11:38 AM IST

"बैलगाडी शर्यत हा प्रश्न आर्थिकदृष्ट्या प्राधान्य क्रमाचा नसला तरी आमच्या सांस्कृतिक परंपरेचा व स्वातंत्र्याचा आहे. सर्व नियमे बंधने आम्हांलाच का? महाराष्ट्राच्या परंपरागत ग्राम देवताच्या उत्सवानिमित्त, यात्रे दरम्यान बैलगाडी शर्यत हे मुख्य आकर्षण असते. शेतकरी आपल्या सर्जा राजावर जीवापाड प्रेम करतो. 

 परंतु परदेशी मदतीवर पोसणाऱ्या 'पेटा' सारख्या संस्था शर्यतीला विरोध करतात. तुमच्यात हिमंत असेल तर शहरातील जुगार सट्टेबाजीला चालना देणाऱ्या शहरातील घोड्यांच्या रेसला बंदी आणा.
तामिडनाडु सरकारने जल्लीकुट्टू स्पर्धेबाबत चार दिवसात अध्यादेश काढुन परवानगी दिली. 
पण अशी धमक आपल्या सरकारने दाखविली नाही. गेली साडेचार वर्षे झाली साधा बैलगाडी शर्यतीचा प्रश्न सोडवता आला नाही. नुसतीच 'भु र्र र्र ' अशी जाहीरातबाजी केली."
आता पुढचा पाठपुरावा  "वन्य जीव संरक्षण अधिनियम (Wild Life Protection Act-1972)" मध्ये सुधारणा करुन वाघ,
बिबटे, लांडगे, कोल्हे, रानडुक्करे जे मानवजातीला घातक आहेत व शेतीचे नुकसान करतात त्यांना परिशिष्टच्या यादीतुन (Schedule I, Part I) वगळावे ह्या साठी करायचा आहे. 

सतीश देशमुख, B.E. (Mech), पुणे

अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स 9881495518 

एकच ध्यास- शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास!l

English Summary: We also contributed to the victory of the bullock cart race.
Published on: 18 December 2021, 11:38 IST