Agripedia

पिकांवरील कीड नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांना बर्याचदा भरपूर संघर्ष करावा लागतो. बऱ्याचदा होते असे की पीक जोमात असते परंतु जास्त किडींच्या प्रादुर्भावामुळे पीक सोडून द्यावे लागतात.यासाठी जर विविध प्रकारचे सापळे वापरले तर एकात्मिक कीटक नियंत्रण करता येते.

Updated on 02 December, 2021 5:23 PM IST

पिकांवरील कीड नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांना बर्याचदा भरपूर संघर्ष करावा लागतो. बऱ्याचदा होते असे की पीक जोमात असते परंतु जास्त किडींच्या प्रादुर्भावामुळे पीक सोडून द्यावे लागतात.यासाठी जर विविध प्रकारचे सापळे वापरले तर एकात्मिक कीटक नियंत्रण करता येते.

कीटक, मादी अथवा नर आपल्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा रासायनिक द्रव्य हवेत  सोडतात.या द्रवाच्या गंधाने नर किंवा मादी कीटक मिलनासाठीएकमेकांकडे आकर्षिले जातात. याद्रव्याला फेरोमोनआणि यापासून बनवलेल्या सगळ्यांना फेरोमेन ट्रॅप असे म्हणतात. हे सापळे म्हणजे कृत्रिमरीत्या तयार केलेल्या फेरोमोन सच्या द्रावणाने भिजवलेले रबर असतात.  त्यांच्या गंधाने नर कीटक आकर्षित होऊन सापळ्यात आडकतात व त्यांचा नायनाट होतो.या लेखात आपणस्टिकीट्रॅप म्हणजे चिकट सापळा आणि वॉटर ट्रॅप याविषयी माहितीघेऊ.

 प्रभावी कीडनियंत्रणासाठी सापळे

स्टिकीट्रॅप/ चिकट सापळा- चिकट सापळे याच्या दोन्ही बाजूंना चिकट,  न सुकणारे द्रव्य लावतात. रस शोषणाऱ्या किडी विशिष्ट रंगामुळे आकर्षित होतात व चिकट तव्यावर घट्ट चिटकून मरतात चिकट सापळ्यांचा उपयोग प्रामुख्याने पांढरी माशी, फुलकिडे, तुडतुडे, मावा  आणि नाग अळी या किडींचे व्यवस्थापन साठी केला जातो.

  • हे चिकट सापळे गडद पिवळ्या, गडद निळ्या आणि काळ्या रंगाचे असतात. गडद पिवळ्या रंगाचे चिकट सापळे पांढरी माशी, तुडतुडे, मावा व नागअळीया किडींना आकर्षित करतात. गडद निळ्या रंगाचे चिकट सापळे फुलकिडे आणि मावा किडींना आकर्षित करतात. तर काळ्या रंगाचे चिकट सापळे टूटा नाग आळी लाआकर्षित करतात.

सापळ्यांचेप्रमाण

  • किडींचे प्रकार व संख्येने निरीक्षण करण्यासाठी एकरी सहा सापळ्यांचा उपयोग करावा.
  • सापळ्याच्या माध्यमातून कीडनियंत्रण करायचे असल्यास एकरी 12 ते 18 सापळे वापरावेत.
  • वॉटर ट्रॅप किंवा पाण्याचा सापळा-ल्युअरचा योग्य जागी वापर करून आकर्षक केलेले पतंग त्या खाली ठेवलेल्या पाण्यात पडून मरतील, अशा प्रकारची संरचना यामध्ये केलेली असते. यामध्ये नरसाळ्याच्या आकाराच्या प्लास्टिकच्या भांड्यात पाणी ठेवतात आणि त्यावर छोट्या दांड्यांची टोपी लावून तिच्या खाली ल्युअरबसवले जातात. नरसाळे काठीवर उभे करतात. फेरोमोन ल्युवरला आकर्षित झालेले पतंग नरसाळ्या तील पाण्यात पडल्यावर मरतात. पाण्याचा सापळा वांग्यावरील शेंडा व फळ पोखरणाऱ्या आळी, कोबी आणि फ्लॉवर मधील हिरव्या ठिपक्याच्या पतंग नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.
  • प्रति एकरी 16 ते 20 सापळे लावावेत.
English Summary: water trap and sticky trap is useful for insect management
Published on: 02 December 2021, 05:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)