Agripedia

पाण्याचे प्रदूषणही मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. मानवी जीवनात प्लास्टिकचा वापर वाढला आहे. हे प्लास्टिक मानव कोठेही फेकून देत आहे.

Updated on 01 February, 2022 6:21 PM IST

पाणी हा सजीवानां जीवंत राहण्यासाठी लागणारा प्रमुख घटक आहे. डार्विन सांगतात की, पाण्यामध्ये पहिला एक पेशीय अमीबा जन्माला आला. आणि त्यानंतर कालानंतराने त्यापासुन सर्व सजीव निर्माण झाले. याचा अर्थ आपल्या सर्वांची निर्मिती ही पाण्यापासुन झालेली आहे. परंतु येथे प्रश्न असा पडतो की, हे पाणी कसे आणि कधी निर्माण झाले.

विज्ञान सांगते की, H2O म्हणजे, हायड्रोजन वायूचे दोन अणू आणि ऑक्सिजन एक अणू यांचा संयोग होऊन पाण्याचा एक रेणू तयार होतो.अशा प्रकारे निसर्गात पाण्याची निर्मिती होते. ही एक नैसर्गिक पद्धती आहे.

पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण ७१% आहे. यामधील 96.3 % पाणी हे समृदामध्ये आहे. हे सर्व खारे पाणी असल्यामुळे हे पिण्यास योग्य नाही.अंटार्टिका हिमखंड, ज्यात पृथ्वीवरील सर्व ताज्या पाण्यापैकी ६१% भाग आहे. परंतु नियमित वापरासाठी हे मिळवणे शक्य नाही. पृथ्वीतलावर पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण फक्त ३% आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे.

पृथ्वीवर पाणी हे पावसापासुन मिळत असते. भारतामध्ये जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाळा असतो. या काळात कुठे कमी तर कुठे जास्त असा पाऊस पडतो. यापासुनच सजीव पाणी घेतात. हे पाणी ओढे, नदी यातून वाहत राहते. पाणी साठविण्यासाठी नाले, तलाव, धरण, बांध, बंधारा, विहीर अशा माध्यमाचा वापर होतो. त्यानंतर हे पाणी आपल्याला वर्षभर पुरते आणि मग परत पाऊस पडतो.

पाण्याचे प्रदूषणही मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. मानवी जीवनात प्लास्टिकचा वापर वाढला आहे. हे प्लास्टिक मानव कोठेही फेकून देत आहे. यामुळे हे पाण्यामध्ये मिसळत आहे. शहरांनामधून निघणारा मैला आणि सांडपाणी नदीमध्ये सोडले जात आहे. घरातील वेगवेगळे धार्मिक सामान आणि खराब अन्नपदार्थ, मंदिरामधील पूजेचे साहित्य नदीमध्ये टाकले जात आहे. यामुळे नद्या प्रदूषित झाल्या आहेत.

शेतीमाध्ये बेसूमार पद्धतीने रासायनिक बियाने, खते, औषधे वापरली जात आहेत, ही सर्व पाण्यात मिसळली जात आहेत. घरगुती वापरांमध्ये साबण, शाम्पू, पाण्यात मिसळून पाणी दूषित होत आहे. पाण्यावरती अनेक वर्ष कार्य केलेली श्री राजेंद्रसिह सांगतात की, "आज जमिनीवरती पिण्यायोग्य पाणी राहिलेले नाही.

"जमिनीमधील भुजल देखील आता वेगाने कमी होत आहे. अनेक मोठया धरणामध्ये प्रचंड गाळ साचला आहे. शेतकऱ्यांना नाले आणि ओढे बुजविले आहेत. नद्यांवरती अतिक्रमणे वाढत आहेत. कुपनलिका मोठ्या प्रमाणात वाढत आहेत यामुळे भुजलाची पातळी खोलवर गेली आहे.

प्रचंड वृक्षतोड होत आहे. जंगले नष्ट होत आहेत, यामुळे जमिनीत खोलवर पाणी मुरण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. यामुळे आज अनेक भागामध्ये पिण्यासही पाणी मिळत नाही. यासाठी धरणातील गाळ काढणे, प्लास्टिक बंदी, रसायन बंदी, कुपनलिका बंदी, प्रचंड प्रमानावर वृक्ष संवर्धन हे महत्वकांक्षी कार्य करावे लागणार आहेत. यासाठी सरकारने आणि विविध खाजगी संस्था कार्य करत आहेत.

परंतु यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केल्याशिवाय या अडचणी नष्ट होणार नाहीत. आपण "पाणी आडवा, झाडें वाढवा "यावर्ती कार्य केलेले पाहिजे. सर्वांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, प्लास्टिक कोठेही फेकू नये, कमीत कमी रसायनांचा वापर करा, पाणी आवश्यक आहे तेवढेच वापरा आणि किमान दर वर्षी एक झाड लावून त्याचे संगोपन करा.

लेखक :- रवींद्र हनुमंत गोरे, नागर फौंडेशन, रवळगाव. ता. कर्जत, जि. अहमदनगर. ई-मेल -ravigore24@gmail. com.

English Summary: "Water saving means water production"
Published on: 01 February 2022, 06:21 IST