हरभरा पिकासाठी कमी पाणी दिले तर उत्पादनात घट होते, तसेच पाणी थोडे जास्त झाले तरी उत्पादनात घट ही होतेच. जास्त पाणी दिले गेले तर जमीन उभाळण्याचा धोका बनलेला असतो. त्यामुळे या पिकासाठी आपल्या भागात असलेल्या पाण्यानुसार, हवामानानुसार, जमिनीच्या पोतनुसार म्हणजे जमीन हलकी आहे की भारी यानुसार पाणी पडताना अंतर ठेवावे लागणार आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात हरभरा लागवड केली जाते, हरभरा उत्पादक शेतकरी यातून चांगल्या प्रमाणात नफा देखील कमविता. हरभऱ्याची लागवड रब्बी हंगामात विशेष उल्लेखनीय आहे. रब्बी हंगामात लागवड केल्या जाणाऱ्या हरभरा पिकासाठी पाण्याचे व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाची बाब असते. हरभरा पिकासाठी जास्त पाणी देखील घातक ठरते तर कमी पाण्यामुळे सुमारे 30 टक्के उत्पादनात घट होण्याचा धोका बनलेला असतो. त्यामुळे हरभऱ्याच्या पिकासाठी पेरणी झाल्यापासून तर काढणी होईपर्यंत पाण्याचे व्यवस्थापन करणे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे चॅलेंजिंग काम असते. हरभरा पिकाला वेळेत पाणी न मिळाल्यामुळे उत्पादनात कमालीची घट होत असते. पण या सर्व गोष्टींची जाणीव ही शेतकऱ्यांना पीक काढणीनंतरच होते, जर हरभरा पिकाला योग्य ते पाण्याचे नियोजन केले केले तर या पिकातून कमालीचे उत्पादन घेतले जाऊ शकते त्यामुळे आज आपण हरभरा पिकासाठी पाण्याचे व्यवस्थापन कसे असावे याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
हरभरा पिकासाठी असे करा पाण्याचे व्यवस्थापन
हरभरा पिकासाठी कमी पाणी दिले तर उत्पादनात घट होते, तसेच पाणी थोडे जास्त झाले तरी उत्पादनात घट ही होतेच. जास्त पाणी दिले गेले तर जमीन उभाळण्याचा धोका बनलेला असतो. त्यामुळे या पिकासाठी आपल्या भागात असलेल्या पाण्यानुसार, हवामानानुसार, जमिनीच्या पोतनुसार म्हणजे जमीन हलकी आहे की भारी यानुसार पाणी पडताना अंतर ठेवावे लागणार आहे. हरभरा पिकाला पाण्याचा ताण देताना विशेष काळजी घेणे गरजेचे असते, जमिनीला भेगा येईपर्यंत पाण्याचा ताण पिकाला घातक ठरू शकतो. या पिकासाठी सुमारे पंचवीस सेंटीमीटर पाण्याची आवश्यकता असल्याचे कृषी वैज्ञानिक नमूद करतात.
म्हणून या पिकासाठी पंचवीस सेंटीमीटर पाणी कसे मिळेल त्याचे योग्य ते नियोजन करणे फारच महत्त्वाचे आहे. कोरड जमिनीवर हरभरा लागवड केलेली असेल तर हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना पाणी दिले गेले असता पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळण्याची आशा व्यक्त केली जाते. तसेच जर हरभरा बागायती जमिनीत लावला असेल तर या क्षेत्रातील पिकासाठी दोनदाच पाणी पुरेसे होते
कृषी वैज्ञानिकांच्या मते, हरभरा पीक पूर्णतः पाण्यावर अवलंबून असते, जर या पिकाला एकच वेळेस पाण्याचा भरला केला तर यातून 30 टक्के पर्यंत उत्पादन मिळते, जर दोनदा पाणी दिले गेले तर हरभरा पिकातून 60 टक्के पर्यंत उत्पादन मिळू शकते याशिवाय जर पीकाला तीनदा पाणी दिले तर उत्पादनात कमालीची वाढ बघायला मिळू शकते. पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आपण अनुभवी शेतकऱ्यांचा तसेच कृषी वैज्ञानिकांचा सल्ला घेतला तर यातून चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त होऊ शकते.
Published on: 28 December 2021, 02:21 IST