Agripedia

राज्यातील बहुतांश शेतकरी कांदा लागवड करत असतात (Most of the farmers in the state are cultivating onions). नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त कांदा लागवड नजरेस पडते. खरीप तसेच रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात कांदा लागवड केली जाते. खानदेश मध्ये (Khandesh) देखील मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. नाशिक व खांदेशातील शेतकरी पूर्णतः कांदा पिकावर अवलंबून असतात या शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण हे कांदा पिकावरच आधारित असते. कांदा हे पीक खरीप तसेच रब्बी दोन्ही हंगामात (In both kharif and rabbi seasons) लावता येते.

Updated on 08 January, 2022 6:20 PM IST

राज्यातील बहुतांश शेतकरी कांदा लागवड करत असतात (Most of the farmers in the state are cultivating onions). नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त कांदा लागवड नजरेस पडते. खरीप तसेच रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात कांदा लागवड केली जाते. खानदेश मध्ये (Khandesh) देखील मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. नाशिक व खांदेशातील शेतकरी पूर्णतः कांदा पिकावर अवलंबून असतात या शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण हे कांदा पिकावरच आधारित असते. कांदा हे पीक खरीप तसेच रब्बी दोन्ही हंगामात (In both kharif and rabbi seasons) लावता येते.

कांद्याची मुळे हे जमिनीत दहा ते बारा सेंटीमीटर खोलवर शिरतात. म्हणून कांद्याच्या पिकाला नियमित पाणी देणे आवश्यक असते. असे असले तरी कांदा लागवड केल्यानंतर मुळे धरले की त्याला जास्त पाण्याची गरज नसते. मात्र जसजसे कांद्याचे पीक वाढू लागते तसतशी त्याला पाण्याची देखील गरज भासते. जर कांदा वाढण्याच्या काळात पाणी बंद केले आणि शेवटी पाणी दिले तर बेले कांदा अर्थात जोडकांदा जास्त येतो. तसेच यामुळे कांद्याचे वरचे पृष्ठभागाला कडे जातात. त्यामुळे या कांद्याला कमी बाजार भाव मिळतो तसेच याला मागणी देखील कमी असते. तसेच आता कांदा जास्त काळ साठवता येऊ शकत नाही. शिवाय अशा कांदाला खांडणी केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच कोंब यायला लागतात.

कांदा पिकाला जास्त पाणी देणे देखील अपायकारक ठरू शकते कांदा पिकाला जास्त पाणी दिले तर पात वाढते, आणि खाली कांदा पोसला जात नाही, त्यामुळे उत्पादनात घट होते. म्हणुन कांदा पिकाला पाणी व्यवस्थापन करणे महत्त्वाचे असते, कांद्याला पाणी हे पूर्णतः हवामानावर, तसेच कांद्याच्या वाढीवर, लागवडीच्या हंगामावर आणि ज्या शेतात कांदा लावला गेला आहे त्या जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असते. मात्र असे असले तरी कांदा लागवड केल्यानंतर लगेचच या पिकाला पाणी भरावे लागते. तसेच खरीप हंगामात लागवड केलेल्या लाल कांद्याला पावसाच्या अंदाजानुसार व जमिनीच्या ओलावानुसार पाणी देणे गरजेचे असते.

कांदा उत्पादक शेतकरी व कृषी वैज्ञानिकांच्या मते, रब्बी हंगामात लागवड केलेल्या कांद्याला  सुमारे 10 ते 12 दिवसांनी पाणी दिल्यास त्यातून दर्जेदार उत्पादन प्राप्त होते. तसेच उन्हाळी हंगामात लागवड केलेल्या कांदाला सुमारे आठ दिवसाच्या अंतराने पाणी देणे गरजेचे असते. तसेच खरीप हंगामात लागवड केलेल्या लाल कांद्याला मात्र चार वेळेस पाणी दिले तरी पुरेसे होते. कांदा पिकासाठी ठिबक पद्धतीने पाणी दिल्यास पाण्याची बचत होते. शिवाय ठिबक सिंचनाने पाणी दिल्यास उत्पादनात देखील वाढ होते. कांदा पिकाची पूर्ण वाढ झाली व माना पडू लागल्यानंतर पाणी बंद करावे साधारणता काढणी करण्यापूर्वी 20 दिवस अगोदर पाणी देणे बंद करावे. या अवस्थेत पाणी देणे बंद केल्यास बाथ मध्ये असणारा रस कांद्यात उतरतो आणि कांदा चांगला पोसला जातो. शिवाय यामुळे कांदा हा दर्जेदार प्राप्त होतो तसेच असा कांदा जास्त काळ साठवून ठेवता येतो. मात्र जर कांदा पिकाला शेवटपर्यंत पाणी देत राहिले तर कांदा सडतो वसा कांदा जास्त पोसला जात नाही.

English Summary: Water management for onion crop
Published on: 08 January 2022, 06:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)