Agripedia

वालाच्या वेलीची वाढ चार ते पाच मीटरपर्यंत होते.

Updated on 27 September, 2022 7:58 PM IST

वालाच्या वेलीची वाढ चार ते पाच मीटरपर्यंत होते. या पिकाला आधार व वळण दिल्यास अपेक्षित उत्पादन मिळते. वेलींची छाटणी करीत राहिल्यास हे पीक वर्षभर भरपूर उत्पादन देते. वेली ताटीवर पोचेपर्यंत 1.5 ते दोन महिन्यांचा कालावधी जातो, त्या दरम्यान वालाच्या दोन ओळींमध्ये पालेभाज्या मिश्रपीक म्हणून घेता येतात.भाजीसाठी (गार्डन बीन) लागवड करण्यात येणाऱ्या वालाचे अनेक स्थानिक प्रकार आहेत. त्यांची लागवड स्थानिक बाजारासाठी किंवा

परसबागेत केली जाते. त्या- त्या भागात ठराविक वाण लोकप्रिय आहेत.Certain varieties are popular in that area विशेषतः गुजरातमध्ये सुरती पापडी, वाल पापडी अशा स्थानिक जातींची लागवड होते.

शेतकरी बाणा हरवलाय मित्रांनो, तो परत मिळविण्याची जिद्द अंगी बाळगून कामाला लागा.

सध्या या पिकाची व्यापारी तत्त्वावर मोठ्या प्रमाणात लागवड सुरू झाली आहे. कृषी विद्यापीठांनी वालाच्या सुधारित जाती विकसित केल्या आहेत, यामध्ये वेलीसारख्या वाढणाऱ्या व झुडूपवजा वाढणाऱ्या जाती चांगले उत्पादन देतात.वाल लागवडीसाठी निचऱ्याची व ओलावा धरून ठेवणारी जमीन उत्तम असते. पाण्याचा निचरा न

होणारी भारी व चिकण मातीच्या जमिनी या पिकाला उपयुक्त नाहीत, कारण जमिनीत पाणी साचून राहिल्यास पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. जमिनीचा सामू (पी.एच.) 6.5 ते 8.5 असल्यास पीक चांगले येते.जमिनीची उभी- आडवी नांगरट करून हेक्‍टरी 15 ते 20 टन चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरून मिसळावे व नंतर कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन माती भुसभुशीत करावी.पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये हे पीक वर्षभर कुठल्याही हंगामात घेता येते. उन्हाळी हंगामासाठी जानेवारी-

फेब्रुवारीपर्यंत लागवड पूर्ण करावी. एक हेक्‍टर वाल लागवडीसाठी पाच किलो बियाणे लागते.लागवडीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिया करावी. वालाच्या मुळांवर नत्र साठविणाऱ्या गाठी असतात. या गाठींतील जिवाणू हवेतील नत्र शोषून घेतात. हा नत्र जमिनीत साठविला जाऊन नंतर झाडाला पुरविला जातो. अशा रीतीने हे पीक स्वतःच्या नत्राची गरज स्वतःच काही प्रमाणात भागविते. तेव्हा या पिकाच्या मुळांवर भरपूर गाठी येण्यासाठी बियाण्याला पेरणीच्या वेळी दहा किलो

बियाण्यास 100 ग्रॅम रायझोबियम जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करण्यासाठी एक लिटर पाण्यात 100 ते 120 ग्रॅम गूळ विरघळवून हे द्रावण 10 ते 15 मिनिटे उकळून घ्यावे. ते थंड झाल्यावर त्यात जिवाणूसंवर्धक मिसळावे, त्यानंतर हे द्रावण वालाच्या बियाण्यावर शिंपडावे आणि हलक्‍या हाताने संपूर्ण बियाण्यास हळुवारपणे लावावे.पेरणीपूर्वी असे बियाणे सावलीत वाळवून पेरणी ताबडतोब करावी. रायझोबियम जिवाणूसंवर्धक लावण्यापूर्वी वालाच्या बियाण्याला बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करावी.

English Summary: Wacha waal crop cultivation technology and information
Published on: 27 September 2022, 07:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)