डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्न असलेल्या समर्थ कृषी महाविद्यालयात देऊळगावराजा येथे मतदान जनजागृती पंधरवाडा २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी या दरम्यान साजरा करण्यात आला. महाविद्यालयामध्ये मतदान जनजागृतीसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
समर्थ कृषी महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन म्हेत्रे आणि रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.. शुभम काकड, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. किरण ठाकरे, प्रा. लिकेश मेश्राम यांच्या संकल्पनेतून निवडणूक साक्षरता मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मतदान जनजागृतीविषयी कार्यक्रमांचे आयोजन केले. ऑनलाइन वेबिनार, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, चित्रफीत तयार करणे, ऑनलाइन प्रश्नमंजूषा, वादविवाद, रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. प्राचार्य म्हेत्रे यांनी मतदान आणि त्यामध्ये युवकांचा सहभाग
याचे असणारे महत्त्व सांगितले. या वेळी महाविद्यालयाचे प्रा. मोहजितसिंह राजपूत, प्रा. विलास चव्हाण, प्रा. विलास सातपुते, प्रा. नारायण बोडखे, प्रा. अरविंद देशमाने, प्रा. विजय पवार, प्रा. देवानंद नागरे, प्रा. सचिन गोरे, प्रा. वैभव देशमुख, प्रा. मंगेश धांडे, प्रा. आश्विनी जाधव, प्रा. शीतल ढाकणे, प्रा. श्वेता धांडे, प्रा. प्राजक्ता शेळके, प्रा. सीमा चाटे आदी उपस्थित होते. करणारे उपक्रमशील शेतकरी अविनाश हरकळ, विठ्ठल मेरत उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयात देऊळगावराजा येथे मतदान जनजागृती पंधरवाडा २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी या दरम्यान साजरा करण्यात आला. महाविद्यालयामध्ये मतदान जनजागृतीसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
समर्थ कृषी महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
Published on: 16 February 2022, 02:13 IST