कांदा आहे प्रमुख पिकांपैकी एक पीक आहे.परंतु रोगांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील पीक म्हणून ओळखली जाते.कांदा पिकावर पडणार्या रोगांमुळेकांद्याचे उत्पादन, दर्जा व साठवणूक इत्यादींवर विपरीत परिणाम होतो.विविध प्रकारच्या रोगामुळे कांदा उत्पादनात 50 ते 80 टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. या लेखामध्ये आपण कांदा पिकावर पडणार्या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव याबद्दल माहिती घेणार आहोत.
कांदा पिकावर पडणारे विषाणूजन्य रोग
- ओनियन येलो डॉर्फ व्हायरस:
या विषाणूजन्य रोगाची लागण OYDV या विषाणूंमुळे होते. या विषाणूचा प्रसार प्रामुख्याने मावा किडि द्वारे होतो. हा विषाणू प्रामुख्याने रोगग्रस्त कांदे व मागील वर्षीच्या रोपांवर आश्रय घेतो. यात विषाणूजन्य रोगाची सुरुवात ही सर्वात कोळ्या पानाच्या खालच्या भागापासून होते. अगदी सुरुवातीला कोवळ्या पानांवर हलकी पिवळसर ओरखडे दिसतात.त्यानंतर हळूहळू अशी पाने पिवळी पडतातव कोमेजतात. नंतर गुंडाळली जाऊन जमिनीकडे झुकतात. रोगग्रस्त रोपांची वाढ खुंटते व ही रोपे मररोग झाल्यासारखे दिसतात. बियाणे पिकास या रोगाची लागण झाल्यास फुलांचे दांडे आखूड बनतात व पिवळे पडतात.अशा रोगग्रस्त रोपं पासून तयार होणारे कांदे आकाराने लहान व निकृष्ट दर्जाचे असतात.
- आयरिश पिवळे डाग:
या विषाणूजन्य रोगाची लागण IYSV नावाच्या विषाणूमुळे होते. हा विषाणूजन्य रोग प्रामुख्याने रब्बी कांद्यावर तसेच बियाणे पिकावर मोठ्या प्रमाणात आढळतो. बियाणे पिकावर जर हा रोग पडला तर जवळजवळ 80 टक्क्यांपर्यंत नुकसान होते. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने फुलकिडे याद्वारे होतो तसेच मागील वर्षाच्या रोपांवर हा विषाणू आश्रय घेतो. सुरुवातीला पानांवर तसेच फुलांवर दांड्यावर पिवळ्या व पेंढ्या रंगाचे दंडगोलाकार चट्टे पडतात. तसेच हे चट्टे नवीन परिपक्व पानांवर तसेच फूलांच्या दांड्याच्या फुगीर भागावर आढळतात. स्वातीला लहान आकारात असलेले हे चट्टे कालांतराने मोठे होतात व एकमेकात मिसळतात. या रोगाची तीव्रता पिकावर जास्त वाढल्यास पाणी मृत होतात व त्यावर बुरशीची वाढ होते. अशी रोगग्रस्त रोपेशेतामध्ये विखुरलेले आढळतात.
अशा पद्धतीने करावे विषाणूजन्य रोगांचे व्यवस्थापन
- शेतामधील तणांचा व मागील वर्षीच्या रोपांचा नियमित बंदोबस्त करा व जमीन स्वच्छ ठेवावी. जेणेकरून विषाणूंचे आश्रयस्थान नष्ट होऊन रोगांचे व्यवस्थापन करणे सोपे जाते.
- सगळ्यात महत्वाचे म्हणजे कांदा लावताना लागवडीसाठी रोगमुक्त रोपांचा वापर करावा.तसेचकांदा बियाण्यासाठी लावायचा कांदा हा रोगमुक्त व सुधारित जातीचा असावा.
- शेतातील रोगग्रस्त रोपे उपटून नष्ट करावीत.
- विषाणूचे वाहक किडीच्या नियंत्रणासाठी कीडनाशकांचा वापर करावा. उदा.मिथोमिल(40 टक्के एसपी )0.8 ग्रॅम/लीकिंवा कार्बोसल्फान दोन मिली/लीकिंवा प्रोफेनोफोस एक मिली प्रति लिटर पाणी या किटकनाशकांच्या पंधरा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. सतत एकच कीटकनाशक फवारणी करण्याचे टाळावे.
- रोपांची पुनर्लागवड करण्यापूर्वी रोपांची मुळे कार्बोसल्फान 2 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे दोन तास उपचारित करून लागवड केल्याने 25ते 30 दिवसांपर्यंत किडींचा बंदोबस्त करता येतो.
Published on: 26 September 2021, 11:06 IST