Agripedia

द्राक्ष बागेमध्ये सर्वात घातक रोग म्हणजे डाऊनी भुरी एकदा भुरीने कमी नुकसान होते पण डाऊनी इतका नुकसान करते की १००% पर्यन्त नुकसान होते काहीवेळा plasmalora viticola या उमायसीटिस या बुरशी कुळामधील ही बुरशी जगभरात डाऊनी हा द्राक्ष पिकावर ज्यास्त नुकसानकारक रित्या दिसून येतो उष्ण तापमान आद्रता ज्यास्त असते.

Updated on 17 November, 2021 8:47 PM IST

तेव्हा हा रुजते रोगाचा प्रसार हा लैंगिक उस्पोर्स आणि अलैंगिक झु स्पोर्सेस यामुळे होतो पानावर सुप्त अवस्थेमध्ये असलेले उ स्पोर्स पाण्याच्या संपर्कामध्ये आले की रुजतात व स्पोरंजिया तयार करतात त्यामधून असंख्य असे झुस्पोर्स तयार होतात पानाच्या खालील बाजूस असणाऱ्या पर्णरंध्रे द्वारे जर्मट्यूब तयार करतात पानामध्ये प्रवेश करतात त्या ठिकाणी अन्नरस ग्रहण करतात त्यामुळे त्या ठिकाणीचे हरितद्रव्य संपते आणि तेलकट डाग पडतो या क्रियाला १० दिवसांचा कालावधी लागतो म्हणजे डाऊनीची खरी सुरवात ही १० ते १२ दिवसापूर्वीच झालेली असते चला आत्ता आपण बघू की शेतकऱ्यांच्या यात काय चुका होतात सध्या द्राक्षामध्ये नवनवे तंत्र येत आहे काही जुने तंत्र पुन्हा नवीन नावाने येत आहे कॉन्टॅक्ट थेयरी वैगेरे पण मुळामध्ये द्राक्ष शेतीमध्ये दोन्ही नचा सुवर्ण मध्य गरजेचा आहे आता आपण हे पाहू की द्राक्ष बागायतदार शेतकरी कुठे चुकतो त्याला एक काम करता येत नाही ते म्हणजे डाऊनी या रोगाला हुलकावणी देता येत नाही आता मी हा शब्द का वापरला तर डाऊनीला पानामध्ये रुंजु न देणे हा महत्वाचा पॉईंट आधी एक डाऊनीची बुरशी मोठी चमत्कारिक आणि प्रतिकारशक्ती तयार करण्यास एक नंबर आधी विचार पक्का करायचा की मी डाऊनी येऊच देणार नाही त्या करता काही डाऊनीची औषधें ती मी वापरणार नाही त्यात (अमिस्टर, आर्गॉन, कॅब्रिऑटोप, सेकटिंन, इक्वेशन प्रो) हे औषधें जर द्राक्ष बाग डाऊनीने जाम झाला घडावर डाऊनी आला तर वापरावे आता बघू मग काय वापरावे मग कसे नियोजन करावे.

द्राक्ष बाग छाटणी केली वातावरण चांगले नाही या वर्षासारखे तर फवारणीचे नियोजन असे करा ६० % स्पर्षजन्य ४०% आंतर प्रवाही आत्ता नेमका का डाऊनी आला तर सांगतो ५०% दुकानदार यांना बुरशीनाशकचे ग्रुप माहीत नाही आणि ९०% शेतक-याना माहीत नाही आणि इथेच चूक झाली मी जे वर सांगितले की डाऊनीला पानामध्ये रुजन्या पासून चकवा द्यायचा तर बुरशीनाशकचे गट पाडा ग्रुप माहीत असणे गरजेचे जसे CAA ग्रुप जर आज ackrobat चा स्प्रे दिला, उद्या किंवा परवा मेलोडी duo चा दिला नंतर रिवसचा दिला तर या तिन्हीचा गट एक त्या ४ दिवसाच्या काळात एकच गट गेला मग डाऊनीची बुरशी प्रतिकारशक्ती तयार करते तुम्ही म्हणता की इतके औषधें मारले तरी डाऊनी आला जरी ३ औषधें मारले पण प्रत्यक्षात एकच स्प्रे दिला असे म्हणता येईल कारण एकच caa गट गेला मग बदल कसा करायचा तर असा अक्रोबॅट (मोरफॉलिन गट CAA) आज दिला तर उद्या स्पर्षजन्य कुमान त्यानंतर तिसऱ्या दिवशी गट change करा रिडॉमिल ( फिनिल अमाईड) हे वेगळ्या गटामधील औषधें द्या नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एक स्पर्षजन्य m45 द्या पुन्हा गट change करा करझेट घ्या (सायनोअसिटाअमाईड) नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी स्पर्षजन्य Z 78 द्या पुन्हा एलिएट (फॉस्फोनेट गट) पुन्हा दुसऱ्या दिवशी स्पर्शजन्य कवच पुन्हा म्हणजे तुम्ही डाऊनी ला हे ४ आंतरप्रवाही औषधें स्प्रे दिले.

(1 अक्रोबॅट -2 रिडॉमिल - 3 करझेट -4 एलिएट ) हे चारही औषधें 4 वेगळ्या गटातील आहेत यात साधारण तुमचा एक हप्ता निघून जातो वातावरणात खराब आहे असे आपण गृहीत धरले त्यात एक दिवसाआड तुम्ही स्पर्शजन्य घेणार आहेतच आत्ता पुन्हा असा गट वापरा (1मेलोडीduo - 2 प्रोफाइट - 3 रनमन - 4 मेरिओन ) हे चारही औषधें 4 वेगवेगळ्या गटातील आहेत या चारमध्ये स्पर्षजन्य तेच पाहिले रिपीट करा चला आत्ता तुमचा बाग हा बराचसा पुढे आला आहे आत्ता पुन्हा 4 वेगवेगळे गट { 1 रिवस +basilas -2 झामप्रो - 3 प्रोफायलर -4 लूना - 5 अकरिसीओ) यामध्ये तुमचा बाग फुलोरा पास झालेला असेन त्यामध्ये विशेष नोंद ही करा की स्पर्षजन्य स्प्रे घेता त्यात २२ व्या दिवशी orbit + कवच द्या कुज करता पुन्हा २५ व्या दिवशी orbit + रोको पुन्हा ३० व्या दिवशी प्रोफाइट + orbit असे orbit चे 2 स्प्रे द्या कुज अजिबात होणार नाही डाऊनी ही येणार नाही पोस्ट लिहायचा उद्देश हा की शेतकरी सारखे सारखे एकाच गटातील औषधें देतो आणि मग डाऊनी बुरशी मध्ये प्रतिकारशक्ती तयार होते त्यामळे वेगवेगळ्या गटातील औषधें गेली.

तर बुरशीला पानामध्ये रुजता येत नाही एलिएट हे फॉस्फोनेट गटातील आणि प्रोफाइट आणि संचार ४० हे पण त्याच गटातील त्यामुळे त्यामधे अंतर ठेवा फवारणीचे resiatance management सर्वात महत्वाचे आहे एकाच गटातील औषधें पाठोपाठ गेली की cross रेसिस्टन्स तयार होतो म्हणून गट बदलणे गरजेचे यात फक्त रिवस आणि अक्रोबॅटचा स्प्रे डबल घेऊ शकता यात folicur आणि score चा स्प्रे टाकू शकता म्हणजे एक स्प्रे द्याच आणि 55 ते 60 दिवसा नंतर ipl च्या किंवा कॅन बायोसिसच्या बॅक्टरीया चालू करा जसा त्यादिवशी रात्रभर पाऊस झाला अशावेळी बॅक्टरीया काम करतात

संकलन - प्रवीण सरवदे, कराड

English Summary: Vineyards and downy
Published on: 17 November 2021, 08:47 IST