अजून पर्यंत पेरणी न झालेल्या तसेच पेरणी/उगवण झालेल्या पण पावसामुळे नुकसान झालेल्या भागासाठी आपत्कलीन पीक नियोजन.आपातकालीन पीक व्यवस्थान• मागील आठवड्यातील पाऊस लक्षात घेता काही ठिकाणी शेतात पाणी साचलेल्या स्थितीत प्राधान्याने शेतातून (उभे पीक, भाजीपाला, फळबागातून) अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.• वेळेवर पेरणी केलेल्या पावसाची उघडीप पाहून किटकनाशके/बुरशीनाशके फवारणी व
आंतरमशागतीची कामे वाफसा स्थिती असतांना करावी. योग्य वेळी एकात्मिक तण व कीड/रोग व्यवस्थापन उपयुक्त ठरते.• वेळेवर पेरणी केलेल्या कापूस, मका, ज्वारी पिकाला एक महिना झाला असल्यास पावसाची उघडीप पाहून तण मुक्त अवस्थेतच शिफारसीनुसार वर खत द्यावे.• कापूस पिकात मर किंवा मूळकुज दिसून येताच (झाडावरील पाने मलूल होऊन खालच्या दिशेने वाकतात व झाड मेल्यागत वाटते) व्यवस्थापनाकरीता कॉपर ओक्झीक्लोराइड ५० टक्के डब्ल्यू पी २५ ग्रॅम+
युरिया १०० ग्रॅम प्रती १० लीटर पाणी या प्रमाणे प्रादुर्भावग्रस्त झाडालगत साधारण १०० मि.ली. द्रावण पडेल Urea 100 grams per 10 liters of water about 100 ml per infested tree. The solution will fallयाप्रमाणे बांगडी पद्धतीने देऊन झाडाचे खोड व्यवस्थित दाबून घ्यावे.• सोयाबीन पिकामध्ये २० दिवसांच्या पीक अवस्थे पुढे आणि कपाशीमध्ये २५ दिवसांच्या पीक अवस्थे पुढे तणनाशकाचा वापर टाळावा.• अति पावसामुळे पिवळे पडलेल्या पिकावर १ टक्के अन्नद्रव्याची (N:P:K) आणि ०.५ टक्के सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करणे उपयुक्त ठरते.• हलक्या जमिनीत तीळ आणि बाजरी पर्यायी पीक म्हणून उपयुक्त ठरते.
• सलग तूर पिकासाठी पीकेव्ही तारा, विपुला,बीडीएन-७१६ , आशा (आईसीपीएल ८७११९) यापैकी उपलब्ध वाण वापरावा. लागवडीचे अंतर ९० x ३० सें मी किंवा १२० x ३० सें मी ठेवावे.• अर्ध रबी तूर, तीळ, सूर्यफूल या पिकांची लागवड १५ सप्टेम्बर पर्यंत करता येते.• पुनः पेरणीसाठी बियाण्याची उपलब्धता व उगवण क्षमता याची दखल घ्यावी.• जनावरांना चाऱ्यासाठी मका किंवा ज्वारीची लागवड करता येईल, मात्र बियाणे दर वाढवावा व लवकर येणारे वाण वापरावे.
कृषी विद्द्या विभाग
डॉ. पं दे कृ वि अकोला
Published on: 30 July 2022, 02:17 IST