Agripedia

सेंद्रिय शेतीमध्ये गांडुळे व गांडूळखताला फार मोठे महत्व आहे.गांडूळ खताप्रमाणेच त्याचा अर्कही उत्तम पिकवर्धक मानला जातो.त्यामध्ये मुख्य अन्नद्रव्यांसह सूक्ष्म मूलद्रव्ये अस्तित्वात असून,ते पिकांना त्वरित उपलब्ध होतात.परिणामतः

Updated on 30 November, 2020 1:07 PM IST

सेंद्रिय शेतीमध्ये गांडुळे व गांडूळखताला फार मोठे महत्व आहे.गांडूळ खताप्रमाणेच त्याचा अर्कही उत्तम पिकवर्धक मानला जातो.त्यामध्ये मुख्य अन्नद्रव्यांसह सूक्ष्म मूलद्रव्ये अस्तित्वात असून,ते पिकांना त्वरित उपलब्ध होतात.परिणामतः पिकांची प्रतिकारक्षमता वाढून उत्पादनाला चालना मिळते.सदर लेखामध्ये गांडूळखत अर्क तयार करणे व त्याचा वापर करणे या घटकाविषयी माहिती जाणून घेऊया.

  • साहित्य-
  • दोन माठ-एक लहान एक मोठा
  • तिपाई ( माठ ठेवण्यासाठी...)
  • अर्धवट कुजलेले शेणखत व काही सेंद्रिय पदार्थ
  • गिरिपुष्प,लुसर्नघास व कडूनिंबाचा कोवळा पाला
  • पूर्ण वाढ झालेले निरोगी गांडुळे (१००० किंवा अर्धा किलो)
  • गरजेइतके पाणी (आवश्यकतेनुसार...)
  • अर्क जमा करण्यासाठी चिनीमातीचे अथवा भांडे
  • पोयटा माती
  • कृती-
  • एक जुना माठ घेऊन त्याच्या तळाला बारीक छिद्र करून त्या छिद्रात कापडाची वात किंवा कापसाची वात टाकावी.तो माठ एका तिपाईवर ठेवावा.
  • माठाच्या तळाशी जाड वाळूचा ४ इंचाचा थर लावावा
  • त्यावर अर्धवट कुजलेल्या शेणखताचा थर लावावा, त्यावरून हलकेसे पाणी मारावे.
  • नंतर त्याच ओलाव्यात अर्धा किलो पूर्ण वाढ झालेली निरोगी गांडुळे सोडावीत.

 

  • गांडूळांना खाद्य म्हणून गिरिपुष्प,लुसर्नघास व कडूनिंबाचा कोवळापाला प्रत्येकी अर्धा किलो शेण स्लरीसह मिसळावा.
  • मोठ्या माठावर लहान माठ पाणी भरून ठेवावा.त्याखाली तळाला छिद्र करून वात बसवावी म्हणजे थेंब थेंब पाणी मोठ्या माठात पडेल.
  • तिपाईच्या खाली वर्मीवाश जमा करण्यास चिनिमातीचे अथवा काचेचे भांडे ठेवावे.
  • पहिल्या सात दिवसांत जमा झालेले पाणी पुन्हा वरील माठात टाकावे.त्यांनतर सात दिवसांनी जमा होणाऱ्या पाण्यास “गांडूळखतपाणी” किंवा “वर्मीवाश” असे म्हणतात.ते पिकांवर फवारण्यास योग्य असते.

 

  • गांडूळखत अर्क वापरण्याची पध्दत-

      पीक,फुल फळावर आल्यावर १० दिवसांच्या अंतराने वर्मीवाश (५ टक्के) (प्रमाण १०० लीटर पाण्यात ५ लीटर) या प्रमाणात दोन फवारण्या घ्याव्या.  

तक्ता क्र.१.१. गांडूळखत अर्कामध्ये अस्तित्वात असणारे घटक

अनु.क्र.

पौष्टिक घटक

गांडूळखतामधील अर्काचे प्रमाण

१.

सामू

६.८

२.

सेंद्रिय कार्बन(%)

०.०३

३.

नत्र(%)

०.००५

४.

स्फुरद(%)

०.००२५

५.

पालाश(%)

०.०६३

६.

कॅल्शिअम (मि.ग्रॅ./कि.ग्रॅ.)

७८६

७.

मॅग्नेसिअम (मि.ग्रॅ./कि.ग्रॅ.)

३२८

८.

गंधक (मि.ग्रॅ./कि.ग्रॅ.)

-

९.

लोह (मि.ग्रॅ./कि.ग्रॅ.)

०.१५१

१०.

मॅँगनीज (मि.ग्रॅ./कि.ग्रॅ.)

२१३

११.

जस्त (मि.ग्रॅ./कि.ग्रॅ.)

०.१३२

१२.

तांबे (मि.ग्रॅ./कि.ग्रॅ.)

०.११७

 

 

  • गांडूळखत अर्काचे फायदे-
  • पीकवाढीसाठी आवश्यक घटक गांडूळांच्या त्वचेमध्ये,विष्ठेमध्ये सापडतात.त्यामधून मिळणारे वर्मीवाश(अर्क)पिकांसाठी सर्वोत्तम पीकवर्धक आहे.
  • वर्मीवाश फुलोरा व फळपक्वतेच्या अवस्थेत फवारल्याने फुलगळ,फळगळ थांबवण्यास खूप मदत होते.
  • पिकांची वाढ जोमदार होते.पिके रसरशीत दिसतात.
  • विविध पिकांच्या किडीं व रोगांपासून प्रतिकार करण्याची क्षमता पिकांमध्ये वाढते.
  • पिकांच्या उत्पादनामध्ये निश्चितवाढ बघायला मिळते.
  • उत्तम प्रतीचे वर्मीवाश(अर्क) मिळवण्यासाठी-
  • शेणखत,घोड्याची लीद,लेंडीखत,हरभऱ्याचा भुसा,गव्हाचा भुसा, भाजीपाल्यांचे अवशेष,सर्व प्रकारची हिरवी पाने,व शेतातील इतर वाया गेलेले पदार्थ हे गांडूळाचे महत्वाचे खाद्य होय.
  • स्वयंपाकघरातील वाया गेलेले भाजीपाल्यांचे अवशेष,वाळलेला पालापाचोळा व शेणखत सम प्रमाणात मिसळले असता गांडूळाची संख्या वाढून उत्तम प्रतीचे गांडूळखत व गांडूळखत अर्क तयार होतो.
  • हरभरा किंवा गव्हाचा भुसा शेणामध्ये ३:१० या प्रमाणात मिसळल्यास गांडूळखताबरोबर उत्तम गांडूळखत अर्क तयार होतो.
  • गोबरगॅस स्लरी,प्रेसमड केक,शेण यांचा वापर केल्यास उत्तम प्रतीचे गांडूळखत अर्क(वर्मीवाश) तयार होते.

म्हणूनच सेंद्रिय शेती पद्धतींमध्ये गांडूळखता समवेत गांडूळखत अर्क म्हणजेच वर्मीवाश चा उपयोग अत्यंत महत्वाची भूमिका बजावतांना दिसत आहे. अश्याचप्रकारे याचा उपयोग केल्यास हे एक उत्तम पीकवर्धक म्हणून शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरतांना दिसेल.

लेखक:

प्रा.नितीन काशिनाथ गवळी

(सहाय्यक प्राध्यापक)

फळशास्त्र विभाग

उद्यानविद्या महाविद्यालय,सरळगाव (ठाणे)

Email Id- nitingawali664@gmail.com

 

कु. इंद्रायणी गुणाजी गवस

(पदव्युत्तर विद्यार्थिनी)

उद्यानविद्या विभाग

डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विदयापीठ,दापोली (रत्नागिरी)

Email Id- indrayanigawas14@gmail.com

 

संपर्क-:( +९१ ९४०३७२४०१३, +९१ ८३०८३२३४४५)

लेखाचा फॉन्ट – मंगल (Mangal)

English Summary: Vermiwash: An excellent Crop enhancer
Published on: 30 November 2020, 12:40 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)