बर्याच शेतकरया नी गांडुळ बेड व गांडुळ कल्चर माझे कडुन घेतले आहे खालील प्रमाणे तयार करावे
जागेला 1' फुटाचा उतार द्या वा शेड सावली करावी पाण्याची व्यवस्था करावी मुंगुस रानडुकरे कोंबड्या येणार नाही काळजी घ्यावी
बेड उभा करणे
बांबू ,लाकूड,पाईप चे 2/3 फुटाचे 8/10 तुकडे बेड अंथरुन पाॅकेट मध्ये खोचुन बेड उभा करावा उताराचे ठिकाणी तळाला जाळी आहे तेथे पाईप बसवुन बाहेर काढावा खड्डा करून कॅन ठेवावा पहिला थर मका कुट्टी,काडी कचरा चा 6"उंचीचा ओला करुन पसरावा दुसरा थर 6"चा अर्धवट कुजलेले शेणखताचा पसरावा
असे 4/5थरावर ने बेड भरावा 2/3दिवस ओला करावा थंड झाल्यावर गांडुळ कल्चर 4/5किलो सर्व दुर सोडावे वर शेणखताचा थर द्यावा 5/6दिवसानी गोणपाट ओले करून अंथरावे पावसाळा/हिवाळ्यात आठवड्यातून 1/2 वेळा 30लिटर पाणी शिंपडावे
उन्हाळ्यात 1दिवसा आड 30 लिटर पाणी शिंपडावे
भुरक्षक जिवाणू कल्चर
200 लिटर पाण्यात 2 किलो गुळ
व कल्चर टाकुन 4/5 दिवसात द्रावण तयार करतांना लोखंडी खिळे 1किलो तांब्याची तार अभ्रक पुरचुंडी बांधून ठेवावी तयार द्रावण 5/6 लिटर शिंपडावे
व्हर्मी वाॅश
तळाला कॅन मध्ये महीन्याला 25/30व्हर्मी वाॅश जमा होईल ह्यात ह्युमिक, अॅमिनो अॅसिड संजिवके असतात पंपास 1लिटर ठिबक मधुन 15/20 लिटर एकरी सोडावे
गांडुळ खत
70/80 दिवसात तयार होईल गाळणीने गाळून गांडुळ वेगळे करुन दुसरा बेड ह्या प्रमाणे तयार करून त्या वर गांडुळे सोडावे
वापर
फळझाडा साठी 2/3 किलो
भाजी पाला पिके साठी एकरी 8/10 क्विंटल
खरीप/रबी पिंका साठी एकरी 500 किलो पेरणी पुर्वी वापरावे ज्या शेतकरया ना गांडुळ बेड व गांडुळ कल्चर पाहिजे असल्यास खालील फोन वर मागणी करावी घरपोच पाठविणे ची व्यवस्था केली जाईल
विलास काळकर जळगांव
से वा नि कृ अ 9822840646
Published on: 02 February 2022, 06:21 IST